Thursday, January 16, 2025

 बेसबॉल छायाचित्र







 

  वृत्त क्र. 66

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत

दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व 

नांदेड दि. 16 जानेवारी : राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. शहरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड व सायंन्स कॉलेज नांदेड येथे सुरु आहे. 

या स्पर्धेत दि.16 जानेवारी,2025 रोजी झालेल्या सामन्याचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे. 19 वर्षे मुले- आंध्रप्रदेश- विद्याभारती (06-05 गुण), तामीलनाडू- पंजाब  (00-13 गुण), आंध्रप्रदेश- सीबीएसईडब्लूएस (05-07 गुण), दिल्ली- हरीयाणा (04-01 गुण), चंदीगड- जम्मू कश्मिर (11-01), मध्यप्रदेश- आसाम (11-01), केरला- गुजरात (12-01), आसाम- केरला (00-10), दिल्ली-पंजाब (05-06),  आसाम- गुजरात (05-06), मध्यप्रदेश- केरला (01-06), महाराष्ट्र- सीबीएसईडब्लूएस (01-01 गुण)  तर  19 वर्षे मुली- छत्तीसगड- मध्यप्रदेश (10-00), आंध्रप्रदेश- जम्मु कश्मिर (12-02), आंध्रप्रदेश- हरियाणा (01-10), आसाम-पंजाब (00-12), चंदीगड- केरला (03-02), महाराष्ट्र- जम्मु कश्मिर (10-00), केरला- पंजाब (04-05), दिल्ली- गुजरात (13-02), चंदीगड- आसाम (16-01), चंदीगड-पंजाब (05-06) असा आहे. 

या स्पर्धेकरीता तांत्रीक समिती सदस्य इंद्रजित नितनवार (अमरावती),शंकर शहाणे (परभणी), संतोष खेंडे (सोलापूर) हे आहेत तर पंच म्हणुन गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर), आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदी काम करीत आहेत. 

सदर राष्ट्रीय स्पर्धा पिपल्स कॉलेज व सायंन्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी, रसीक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 65 

व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला  

कृषिक्षेत्रातील विविध योजनेचा आढावा

 

नांदेड दि. 16 जानेवारी :- सामुहिक शेततळेहरितगृहशेडनेटगृहपॅहहाऊसकांदाचाळप्लास्टिक मल्चींग बाबींची शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांना कृषि क्षेत्रातील विविध योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावेअशी सूचना कृषि विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी दिली.

 

1314 जानेवारी रोजी दोन दिवसीय नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटेदेगलूर उपविभागीय कृषि अधिकारी विठ्ठल गीतेकिनवट उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीरजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचकेशेतकरी प्रतिनिधी प्रसाद देवजिल्‍ह्याती तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

 

फळेभाजीपाला व फुले क्लस्टर तयार केल्यास यातून स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. काढणीत्तोर व्यवस्थापन घटकातून रोजगार निर्मिती होईल. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या विविध बाबींचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी केली. जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईलअसेही त्यांनी सांगितले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनेच्या खर्चाचा व नविन कृति आराखड्याचाही आढावा त्यांनी घेतला.

  

व्यवस्थापकीय संचालक श्री. महिंद्रकर यांनी 14 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या. त्यात नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील शेतकरी बापुराव पुयड यांच्या शेतातील हरितगृहाची व त्यातील जर्बेरा लागवडीची पाहणी केली. त्यानंतर मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतातील शेडनेट हाऊसशेडनेट हाऊस मधील रोपे उत्पादन व जिल्ह्यातील प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवड केली असल्याचे त्यांनी पहाणी केली. त्यानंतर अर्धापुर तालुक्यातील धामदरी येथील श्रीमती गंगाबाई रामदास कदम यांच्या शेतातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटीका व त्यातील भाजीपाला रोपे उत्पादन याची पहाणी केली.

 

या दौरा कार्यक्रमात नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईतनांदेडचे तालुका कृषि अधिकारी संजय चातरमलअर्धापूरचे तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे हे उपस्थित होते.

00000

 वृत्त क्र. 64 

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन

 

नांदेड दि. 16 जानेवारी :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावेअसे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावेअसेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 63 

जिल्ह्यात जमावबंदीशस्त्रबंदी आदेश लागू

 

नांदेड दि. 16 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात 17 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 31 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहेअशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 जानेवारी सकाळी 6 वाजेपासून ते 31 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील.

 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारीशासकीय कर्मचारीविवाहअंत्ययात्राधार्मिक कार्यक्रमयात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठीसभामिरवणुकामोर्चा काढणेध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्र. 62 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी आवाहन

 

·     शुक्रवार 17 जानेवारीला स्थानिक सुट्टी 

 

नांदेड दि. 16 जानेवारी :- शुक्रवार 17 जानेवारी रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दैनंदिन सर्व कामकाज बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने 17 जानेवारी रोजी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी घेण्यात आलेली अपॉईमेंट पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स्थलांतरीत करण्यात आली आहे.

 

अर्जदारांनी आपले अपॉईटमेंट ऑनलाईन सारथी प्रणालीवर तपासून सदर दिवशी कार्यालयीन वेळेत शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी उपस्थित रहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000


  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...