Wednesday, August 14, 2024
#स्वातंत्र्यदिन
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावरील शुभेच्छा संदेश प्रसिद्धीसाठी
पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनिक, सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मी अभिवादन करतो.
आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. लाखो लोकांच्या बलिदानानंतर हा दिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. आपली लोकशाही हळूहळू प्रौढ होत असून आम्ही आणखीन जाणीव, जबाबदारीने काम करावे, असे संकेत यातून दिले जात आहेत.
स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन आमची वाटचाल असली पाहिजे. घटनेच्या परिघात राहून स्वातंत्र्याचा समान उपभोग घेणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात स्वातंत्र्य ही जबाबदारीही आहे. देशातील समस्या, देशातील परिस्थिती यावर टीकाटिपणी करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सोबतच आपण नेमके देशासाठी काय करू शकतो? किती सुलभतेने समस्या सोडवू शकतो आणि आपण आपल्या देशासाठी काय दायित्व देऊ शकतो याचे आत्मचिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. देशासाठी सिमेवरच लढावे लागते असे नाही तर आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकतेने, सचोटीने करणे ही देखील देशसेवा आहे.
राज्य शासनाने लोकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी काही नव्या योजना यावर्षी सुरू केल्या आहेत. महिलांना आर्थिक बळ, आर्थिक स्वातंत्र्याचा पाया घालण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यात राबविली जात आहे. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मातृ वंदना योजना, आनंदाचा शिधा योजना, वेगवेगळ्या घरकुल योजना अशा कितीतरी योजना राज्यात सध्या सुरू आहेत.या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनासोबत सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या अशा या योजना आहेत. या योजनांची उत्तम अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असून त्याला तसाच प्रतिसाद जनतेकडून मिळावा ही अपेक्षा आहे.
#नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक परिस्थिती उत्तम आहे. सोबतच आपण गेल्या वर्षभरात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भूगर्भात पाणी पातळी वाढत आहे. ही धरणी, ही पृथ्वी, आपली आई असून पुढच्या पिढीसाठी तिच्या संगोपनाची, तिच्या उज्वल भविष्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठवाड्यासारख्या प्रदेशांमध्ये प्रत्येक शेतातील विहिरीला मुबलक पाणी असावे, प्रत्येक शेताला पाणी मिळावे यासाठी जलसंधारणाच्या कामाला सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. शासन त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांची ही साथ मिळावी अशी अपेक्षा आहे.
यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एका वेब पोर्टलची सुरुवात 15 ऑगस्ट पासून आम्ही करत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत किंवा नगरपालिका नगर परिषदांपर्यंत पोहोचून जनतेला आपला हक्क मागण्यासाठी मोठी ससेहोलपट करावी लागते त्यावर मात म्हणून हे पोर्टल काम करणार आहे प्रशासनातर्फे गतिशील पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला जाईल अशा पद्धतीची रचना आम्ही करतो आहे मात्र हे पोर्टल पुढच्या काळातही उत्तम प्रकारे सुरू राहावेत व प्रशासन व सामान्य जनतेच्या मधला दुवा बनावेत यासाठी सामान्य जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात आम्ही अपेक्षा करत आहे लवकरच या संदर्भातील लिंक आम्ही माध्यमांमधून जाहीर करणार आहोत.
लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका अनिवार्य आहे. या निवडणुकांमधून मतदानाद्वारे आपले लोकप्रतिनिधी निवडणे नागरिकांचे कर्तव्य आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला मतदान करायचे आहे. त्यासाठी 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या नावाबाबतची खातरजमा करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वावर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सतरा व अठरा तारखेच्या विशेष मतदार नोंदणी अभियानात सहभागी होण्याचे मी आवाहन करीत आहे.
आजचा दिवस हा देशासाठी नव्याने प्रण करण्याचा दिवस आहे. आपला देश अधिकाधिक प्रगत होईल, यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या घरापासून याची सुरुवात होऊ शकते. सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, धर्म, पंथ, समुदाय, जात यावरून भेदाभेद न करणे, सार्वजनिक मालमत्तेप्रती आपले दायित्व आणि परस्परांबद्दलच्या शुभचिंतनातून देखील मोठे कार्य सिध्दीस जाऊ शकते. त्यामुळे सकल समाजाचा सामाजिक पुरुषार्थ वाढीस लागो, अशी अपेक्षा आपण करू या.
मी पुन:श्च एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
जय हिंद जय महाराष्ट्र
शुभेच्छांसह..
गिरीश महाजन
ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री नांदेड
0000
#नांदेड मुख्य शासकीय समारोह : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हर्षोल्लासात साजरा झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी झेंडावंदन केले. कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #स्वातंत्र्यदिन
#नांदेड मुख्य शासकीय समारोह : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हर्षोल्लासात साजरा झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी झेंडावंदन केले. कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #स्वातंत्र्यदिन
वृत्त क्र. 721
राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजननांदेड दि. 14 ऑगस्ट :- राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट, 2024 रोजी साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त खेळाडुनी आपल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत व नावे 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलम्पिक वीर कै.खाशाबा जाधव यांचे स्मरण करून, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नांदेड जिल्ह्य़ातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राविण्य प्राप्त खेळाडुचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगष्ट, 2024 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड द्वारा सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात येणार आहे.राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार होत असून अर्थात खेळाची प्रगती साध्य होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यालयाच्या वतीने 26 ते 31 ऑगष्ट,2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.1) चालण्याची शर्यत व बुध्दीबळ (19 वर्षे मुले-मुली) –26 ऑगस्ट 2024 वेळ स. 7 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड2) बॅडमिंटन (19 वर्षे मुले-मुली)- दि.27 ऑगस्ट 2024 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड वखो-खो- तालुका क्रीडा संकुल, सिडको-नांदेड3) टेबल टेनिस व बास्केटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 28ऑगस्ट 2024 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड4) व्हॉलीबॉल (19 वर्षे मुले-मुली)- दि.29 ऑगस्ट 2024- महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर, नांदेड5) हॉकी पॅनल्टी शुट आऊट (19 वर्षे मुले-मुली)- दि.29 ऑगस्ट 2024 – खालसा हायस्कुल, नांदेड6) मिनी फुटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 30 ऑगस्ट 2024- इंदिरा गांधी मैदान स्टेडियम परीसर, नांदेड7) टेनिसबॉल क्रिकेट (19 वर्षे मुले-मुली)- 31 ऑगस्ट 2024- इंदिरा गांधी मैदान स्टेडियम परीसर, नांदेड000000
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...




.jpeg)


.jpeg)

.jpeg)



.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)






.jpeg)

.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
