Thursday, August 1, 2024
वृत्त क्र 662
मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील
युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी
शुक्रवार सायंकाळपर्यंत सर्व विभागांनी आपली मागणी कळवण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 ऑगस्ट : राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून तरुण रक्ताचे सुशिक्षित बेरोजगार युवक शासकीय यंत्रणेला मिळणार आहे. युवाशक्तीचा उपयोग प्रशासन आणखीन गतिमान करण्यासाठी करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे व्यक्त केली.
मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांची नियुक्ती, त्यांना द्यावयाची कामे, आणि नव्याने सरकारी आस्थापनावर नियुक्ती होताना घ्यावयाची काळजी, यासंदर्भातील जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यासहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सादरीकरण केले. तसेच कशाप्रकारे नियुक्ती करण्यात यावी ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले.
त्यानंतर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने येणारे उमेदवार ही पदभरती नसून युवकांना पुढील आयुष्यात ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी प्रशासन, प्रशासनाचे कार्य आणि प्रशासनाची बांधिलकी याबाबतचे योग्य मत तयार करण्याची संधी आहे. शासनामध्ये काम करताना अनेक कामांसाठी आपले मनुष्यबळ लागत असते काही दुय्यम कामांमध्ये आपले मनुष्यबळ खर्ची होते. शासनाच्या अनेक ऑनलाईन योजना आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे. त्यांच्या प्रसिद्धीची कामे आहेत.अशा कामांमध्ये या नव्या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे. येणारे उमेदवार हे आपल्या शासकीय यंत्रणेचे सदस्य नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कायद्यानुसार पद निहाय कोणतीही कामे देता येणार नाही. मात्र त्यांचे योग्य प्रशिक्षण करणे हे आपले कार्य असून त्यासाठी नियोजन करावे. उद्यापर्यंत सर्व कार्यालयाने या संदर्भात नोंदणी नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले.
00000
वृत्त क्र 661
जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी
नांदेड दि. 1 ऑगस्ट : महसूल सप्ताहाचा आता महसूल पंधरवाडा करण्यात आला असून या संपूर्ण पंधरा दिवसांमध्ये राज्य शासनाने दिलेल्या उपक्रमाप्रमाणे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावे. तसेच या सर्व उपक्रमांना सामान्य जनतेला जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी हे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आज मंत्रालयातून बैठकीद्वारे संपूर्ण महसूल यंत्रणेला जनतेमध्ये जाऊन काम करण्याचे आदेश दिले आहे. नंतर जिल्ह्यातील सर्व यंत्रणेची संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवस 'महसूल पंधरवाडा -24' पथदर्शी योजना आणि जनसंपर्क मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन केले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय,पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी,6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर 7 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 8 ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद, 9 ऑगस्ट रोजी महसूल इ प्रणाली, 10 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन 12 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाडा वार्तालाप तर पंधरवड्याचा अखेर असणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.
पंधरा दिवसांचा हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये व्यवस्थित राबविण्यात यावा, प्रत्येकाने त्याचा अहवाल ठेवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रत्येक दिवसांसाठी वेगवेगळे कार्यक्रमांचे नियोजन व ते वेगळेपणाने साजरे करणे यावर भर देण्याबाबतही त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे.
0000
वृत्त क्र 660
आज ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन
· कार्यक्रमाच्या लिंकसाठी कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन
· दर शुक्रवारी होणार शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड दि. 1 ऑगस्ट :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु यांच्या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे उद्या शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सद्यपरिस्थितीत ‘सोयाबीन, कपाशीवरील किड व्यवस्थापन’ या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, संबंधित कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाची लिंक प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पिकावरील किड याबाबत योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. हा शेतकरी संवाद कार्यक्रम दर शुक्रवारी ऑनलाईन होणार असून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाची लिंक उपलब्ध करुन घेण्यासाठी दर आठवड्याला गावातील संबंधित कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
00000
सुधारीत वृत्त क्र 659
शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन
नांदेड दि. 1 ऑगस्ट :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अवयवदान जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने 3 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे आयोजन समाजामध्ये अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.
ही रॅली 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. सुरू होऊन महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. कॉर्नरपासून शहरातील विविध मार्गांवरून परत ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नांदेड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
अवयवदानामुळे अनेकजणांना नवीन जीवन मिळू शकते. एक अवयवदाता आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि इतर अवयवदान करून अनेकजणांचे जीवन वाचवू शकतो. अवयवदान हे समाजाच्या हितासाठी केलेले एक उत्तमकार्य असून त्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते. या रॅलीमध्ये अवयवदान प्रक्रियेवरील चित्रफलक, पोस्टर, माहितीपत्रके आणि घोषनांव्दारे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
नांदेड शहरातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी सदरील रॅलीमध्ये मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.
000000
वृत्त क्र 658
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु
· नारीशक्ती दूत ॲपवर भरलेले अर्ज पुन्हा संकेतस्थळावर भरण्याची गरज नाही
नांदेड दि. 1 ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन वेबसाईट (संकेतस्थळ ) सुरू झाले आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही पात्र लाभार्थ्याचा अर्ज शेवटी ऑनलाइन करावाच लागतो. तो एक तर स्वतः किंवा यंत्रणेद्वारे ऑनलाईन केला जातो जिल्ह्यामध्ये ज्यांना ऑनलाईन करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र आता संकेतस्थळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ज्यामुळे त्वरेने आणि सुलभरीत्या अर्ज अपलोड होतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जवळपास सहा लाखावर पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. उर्वरित महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. या योजनेतील महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत यासाठी शासनाच्यावतीने डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन अर्थात www.ladkibahin.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सध्या जिल्ह्यात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत असून याबाबत जिल्हा यंत्रणा अधिक सक्रीयपणे काम करीत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना पहिला लाभ रक्षाबंधनाला मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत अर्ज भरला नसेल तर त्यांनी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात केलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या संकेतस्थळावर पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही असेही प्रशासनाने कळविले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु असून अर्ज भरण्यासाठी महिलांनी घाई, गडबड करु नये. प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरुन घेण्यात येणार आहे आणि अर्ज भरलेल्या सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेतील अर्जाच्या छाननीचे कामही सुरू असून छाननीनंतर पात्र महिलांची यादी तयार करण्यात येवून महिलांना येत्या रक्षाबंधनापर्यत लाभ देण्याची कार्यवाही होण्याच्या दृष्टीने प्रशासन दक्षता घेत आहे. तरी ज्या महिलांनी अद्यापपर्यत या योजनेचे आपले अर्ज भरले नाहीत त्यांनी आजपासून सुरू केलेल्या www.ladkibahin.
000000
वृत्त केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

.jpeg)
.jpeg)


.jpeg)



