Sunday, June 30, 2024

 https://fb.watch/t22ioNI_zB/

कृषि विभाग महाराष्ट्र शासन, कृषि विभाग जिल्हा परीषद नांदेड, आत्मा नांदेड व पंचायत समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन या कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड Facebook पेज वर.

Friday, June 28, 2024

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

  वृत्त क्र. 543

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड दि. 28 :-  माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880/8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  प्रवेश  सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुध्दा उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी), स्वतंत्र अभ्यासिका, जिमखाना, भोजनालय कक्ष तसेच सकाळी पीटी आणि सायंकाळी रोल कॉल या सर्व सोयींनी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000 

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन

  वृत्त क्र. 542

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत

मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन   

 

नांदेड, दि. 28 :- राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त सन 2024-25 या वर्षात प्रवेशित इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र मुदतीत मिळाण्यासाठी  तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयस्तरावर 1 व 2 जुलै रोजी मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज स्विकृतीसाठी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या समान संधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधी (नोडल अधिकारी) यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रामार्फत सन 2024-2025 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज स्विकृतीसाठी 2 जुलै 2024 पर्यत महाविद्यालयामध्ये एक दिवशीय शिबिर आयोजित करुन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

  

सोमवार 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 ते 3.30 वाजेपर्यत आयोजित शिबिर याप्रमाणे आहेत. धर्माबाद व बिलोली तालुक्यासाठी लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे नोडल अधिकारी म्हणून वरिष्ठ लिपिक सिद्राम रणभिरकर व मनोज वाघमारे यांची नेमणूक केली आहे. भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यासाठी हुतात्मा जयवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, हिमायतनगर येथे कनिष्ठ लिपिक विठ्ठल बी. आडे व प्रकल्प सहाय्यक ओमशिवा चिंचोलकर यांची तर  देगलूर व नायगांव तालुक्यासाठी देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे पोलीस  कॉन्स्टेबल बालाजी शिलगिरे व प्रकल्प सहाय्यक राजेश मेथेवाड यांची नेमणूक केली आहे. लोहा व कंधार तालुक्यासाठी श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा येथे  संशोधन सहाय्यक वैजनाथ मुंडे यांची नेमणूक केली आहे.

 

मंगळवार 2 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 ते 3.30 आयोजित शिबिर पुढीलप्रमाणे आहेत. हदगांव व माहूर तालुक्यासाठी पंचशिल महाविद्यालय, हदगांव येथे व्यवस्थापक शिवाजी देशमुख व कार्या. सहाय्यक संजय अरगडे यांची नेमणूक केली आहे. मुखेड तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड येथे अभि. पाल बाबू कांबळे व प्र. सहायक राजेश मेथेवाड यांची नेमणूक केली आहे. नांदेड, अर्धापूर तालुक्यासाठी  यशवंत महाविद्यालय नांदेड येथे विधी अधिकारी साजीद हासमी व प्रकल्प सहायक माधव बेलके यांची नेमणूक केली आहे. उमरी व मुदखेड तालुक्यासाठी कै. बाबासाहेब देशमुख बोरटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमरी येथे  अभि. पाल बाबू काबंळे व प्रकल्प सहायक ओमशिवा चिंचोलकर यांची नेमणूक केली आहे.

 

सन 2024-25 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यानी, समान संधी केंद्र नियुक्त प्रमुख प्रतिनिधी व नोडल अधिकारी यांनी तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय स्तरावर आयोजित केलेल्या शिबिराच्या ठिकाणी माहितीसह उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने केले आहे.

00000

  वृत्त क्र. 541

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून

युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी

 

नांदेड, दि. 28 :- विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येते. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.  

 

या योजनेतर्गत अर्जदारांना उत्पादन व्यवसाय (उदा. बेकरी, पशुखाद्यनिर्मिती, फॅब्रीकेशन ) व सेवा उद्योग (उदा. वैद्यकीय सेवा, ब्युटीपार्लर, सलून) साठी अर्ज करता येतील. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या योजनेचे https://maha-cmegp.gov.in  संकेतस्थळ आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार हा सर्वसाधारण प्रवर्गात 18 ते 45 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 50 वर्षे असावा. अर्जदाराने केंद्र, राज्य शासनाच्या योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा. अर्जदारास आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड , शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी लोकसंख्येचा दाखला इ. वेबसाईटवर अपलोड करावेत.

 

तरी नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवती यांना नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे किंवा  व्यवसायवाढ करावयाची आहे त्यांनी https://maha-cmegp.gov.in   संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच ही योजना राबविण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही व त्रयस्थ/मध्यस्थ व्यक्तींकडून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता अर्जदारांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

Thursday, June 27, 2024

 वृत्त क्र. 540 

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी

30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज

 

नांदेड, दि. 27 : शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणा-या काही विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेमुळे ‘राईट टू गिव्ह अप’ हा विकल्प नजरचुकीने, अनावधानाने निवडण्यात आलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांकडून अनवधानाने अथवा नजरचुकीने राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे 30 जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.

 

विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॅाग ईनमधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॅाग इन मधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विहीत वेळेत यासंबंधाने आवश्यक कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड  संपर्क साधावा.

00000

 वृत्त क्र. 539 

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 27 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कार सन 2024 करीता ऑनलाईन माध्यमातून अर्ज, नामांकन मागविण्यात आले आहे. अर्ज 31 जुलै पर्यंत   www.awards.gov.in या संकेतस्थळावर  स्वीकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

वृत्त क्र. 538

 कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी

10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 27:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्यायावत आहे अशा संस्थांनी त्यांचे प्रस्ताव 10 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.  

 

बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागात शासन निर्णयान्वये कामवाटप समिती स्थापन करण्यात आली आहे . त्या अनुषंगाने कामवाटप समितीकडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय व त्याच्या अधिनस्त कार्यालयासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत करार पध्दतीने नियुक्त करण्याबाबत आयुक्तालयाचे कळविले आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती करावयाची आहे. या पदासाठी संस्थानी प्रस्ताव सादर करताना अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे ऑडीट रिपोर्ट सन २०२३-२४ , बँकेचे स्टेटमेंट संस्थानी प्रस्तावासोबत जोडावे. आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...