Thursday, June 27, 2024

वृत्त क्र. 538

 कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी

10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 27:- जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती (शिपाई पदासाठी कामवाटप) करावयाची आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्यायावत आहे अशा संस्थांनी त्यांचे प्रस्ताव 10 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.  

 

बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागात शासन निर्णयान्वये कामवाटप समिती स्थापन करण्यात आली आहे . त्या अनुषंगाने कामवाटप समितीकडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय व त्याच्या अधिनस्त कार्यालयासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत करार पध्दतीने नियुक्त करण्याबाबत आयुक्तालयाचे कळविले आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रासाठी सहा महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर शिपाई पदाची भरती करावयाची आहे. या पदासाठी संस्थानी प्रस्ताव सादर करताना अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्रसंस्थेचे ऑडीट रिपोर्ट सन २०२३-२४ बँकेचे स्टेटमेंट संस्थानी प्रस्तावासोबत जोडावे. आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीतयाची कृपया नोंद घ्यावी, असेही जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...