प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी
शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन
नांदेड दि. 27 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी केले आहे.
तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 3 जुलै, 2 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 4 नोव्हेंबर, 4 डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धर्माबाद येथे 8 जुलै, 7 ऑगस्ट, 6 सप्टेंबर, 7 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर, 6 डिसेंबर या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. किनवट येथे 10 जुलै, 9 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर, 10 डिसेंबर या दिवशी शिबिराचे आयोजन केले आहे. मुदखेड येथे 15 जुलै, 14 ऑगस्ट, 13 सप्टेंबर, 14 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर, 13 डिसेंबर रोजी तर माहूर येथे 18 जुलै, 19 ऑगस्ट, 19 सप्टेंबर, 18 ऑक्टोबर, 18 नोव्हेंबर, 18 डिसेंबर या दिवशी तर हदगांव येथे 22 जुलै, 21 ऑगस्ट, 23 सप्टेंबर, 21 ऑक्टोबर, 20 नोव्हेंबर, 20 डिसेंबर रोजी शिबिर ठेवण्यात आले आहे. धर्माबाद येथे 24 जुलै, 23 ऑगस्ट, 25 सप्टेंबर, 23 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर, 23 डिसेंबर यादिवशी शिबिर ठेवण्यात आले आहे. हिमायतनगर येथे 29 जुलै, 28 ऑगस्ट, 27 सप्टेंबर, 25 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 27 डिसेंबर, तर किनवट येथे 31 जुलै, 30 ऑगस्ट, 30 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर, 28 नोव्हेंबर, 30 डिसेंबर या दिवशी शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वरील शिबिराच्या दिवशी स्थानिक सुटटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्य तारखेमध्ये बदल होवू शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment