Thursday, June 27, 2024

 वृत्त क्र. 540 

रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी

30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज

 

नांदेडदि. 27 : शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेस पात्र असणा-या काही विद्यार्थ्यांकडून अनभिज्ञतेमुळे ‘राईट टू गिव्ह अप’ हा विकल्प नजरचुकीनेअनावधानाने निवडण्यात आलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांकडून अनवधानाने अथवा नजरचुकीने राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे 30 जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.

 

विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॅाग ईनमधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॅाग इन मधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विहीत वेळेत यासंबंधाने आवश्यक कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण विभागनांदेड  संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...