जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकास मान्यतेची बैठक आता 5 मार्चला
Sunday, March 3, 2024
वृत्त क्र. 198
वृत्त क्र. 197
जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन
· 2 हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस
नांदेड दि. 3 :- संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. या मोहीमेत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षाखालील बालकांना एकूण 3 लाख 99 हजार 698 पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. आज या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस पाजून संपन्न झाले.
यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेभाऊ बुट्टे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे, प्रा.आ.कें. वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, विस्तार अधिकारी लतीफ पठाण, सिकलसेल समन्वयक दिपाली इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भाग तसेच महानगरपालिका क्षेत्रातही लस 5 वर्षापर्यतच्या बालकांना देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने राज्य नोडेल ऑफिसर तथा सह संचालक डॉ. रेखा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बुथला भेट देवून पाहणी केली आहे. या मोहिमेत ग्रामीण भागातून 2 हजार 236 शहरी भागातून 255 तर महानगरपालिका भागात 276 असे एकूण 2 हजार 767 बूथ उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत असून 25 हजार 862 लसीचे व्हायल उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
0000
Saturday, March 2, 2024
बेनामी वाहनांचा आरटीओ मार्फत लिलाव
उत्सुकांसाठी नोटीस फलकावर यादी
नांदेड दि. 2 :- मोटार वाहन कर जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुली योग्य असलेल्या रकमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा वाहनधारकांना तीन नोटीस देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यांना सदर पत्र अपूर्ण पत्ता, वा इतर कारणाने पत्र पोच झाले नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची परवानगी घेवून दावा न केलेल्या प्रकरणामध्ये समाविष्ट करण्याच्या मंजूरीस्तव व न्यायालयाची परवानगी घेवून या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोटीस बोर्डवर अशा बेनामी वाहनांची यादी लावण्यात आली आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.
00000
Friday, March 1, 2024
वृत्त क्र. 195
5 मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन
नांदेड दि. 1 :- जिल्हयातील उद्योजकांसाठी व उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन 5 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वा. हॉटेल मिडलॅड येथे करण्यात आले आहे. या परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, औद्योगिक समुह, सनदी लेखापाल, उद्योग व्यवसायाशी संबंधित शासकीय विभाग यांनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी कळविले आहे.
या गुंतवणूक परिषदेतंर्गत जिल्हयातील प्रमुख उद्योग क्षेत्र असलेल्या कृषी क्षेत्रातील उद्योगांमध्ये तसेच इतर उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या उद्योगांना गुंतवणूकीच्या संधीबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच याअंतर्गत एक खिडकी योजना प्रस्तावित असून सेवा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक प्रकल्प इ. पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांना उद्योगांसाठी लागणारे विविध परवाने, अनुदान इ. अनुषंगिक बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जातील.
या परिषदेचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. ही परिषद 5 मार्च रोजी हॉटेल मिडलॅड हॉटेल, स्टेशन रोड, नांदेड येथे घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातील होतकरु व उत्सुक उद्योजक संघटना, औद्योगिक समुहातील उद्योग घटक व इतर उद्योग व्यवसायाशी संबंधीत सर्व संस्थांनी उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी येणाऱ्या अडचणी व संधी इ. बाबींच्या माहिती व चर्चेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 194
जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
· पोलिओ लसीकरणासाठी 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत
· मोहीमेच्या दिवशी वंचित राहीलेल्या बालकांना गृहभेटी देवून लस देण्यात येणार
नांदेड दि. 1 :- सन 2023-24 या वर्षात 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सर्व जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आली आहे. या मोहीमेसाठी बीओपीव्ही ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लस आवश्य पाजवून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील 2 लाख 52 हजार 916 बालके व शहरी भागातील 64 हजार 213 बालके तसेच मनपा भागातील 82 हजार 569 बालके असे एकूण 0 ते 5 वर्ष वयोगटातील 3 लाख 99 हजार 698 बालके अपेक्षित लाभार्थी आहेत. या मोहिमेत ग्रामीण भागातून 2 हजार 236 व शहरी भागातून 255 तर मनपा भागात 276 असे एकूण 2 हजार 767 पोलिओ बूथ उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यासाठी 25 हजार 862 लसीचे व्हॉयल्स उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.
मोहीमेच्या दिवशी बूथवर लस पाजविल्या नंतरही वंचित राहिलेल्या बालकांसाठी नंतर ग्रामीण भागातून 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस याप्रमाणे कर्मचारी गृह भेटी देवून बालकांना लस देतील. या लसीकरण मोहीमेसाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी निता बोराडे यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे देशात 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच देशाला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये मिळालेले आहे.
00000
वृत्त क्र. 193
शासकीय तंत्र निकेतन येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबीलिटी गुजरात यांचा रोजगार मेळावा संपन्न
· रोजगार मेळाव्यात 117 विद्यार्थ्यांची निवड
नांदेड दि. 1 :- शासकीय तंत्र निकेतन नांदेड येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबीलिटी गुजरात या कंपनीचा पूल कॅम्पस (रोजगार मेळावा) नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विद्युत, यंत्र, उत्पादन व ऑटोमोबाईल पदविकाधारक पात्र होते. या मेळाव्यास धाराशिव, हिंगोली, परभणी, जिंतूर येथून व नांदेड जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, ग्रामीण, सहयोग, मातोश्री तंत्रनिकेतन या संस्थेचे एकूण 170 विद्यार्थी हजर होते. या मेळाव्यात 117 विद्यार्थी मुलाखतीत कंपनीकडून निवडले गेले आहेत असे संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी कळविले आहे.
या मुलाखती माहिती तंत्रज्ञान बिल्डिंगमध्ये स्थापत्य विभागात घेण्यात आल्या. सुकाणू समितीचे अध्यक्ष विभाग प्रमुख वि. वि. सर्वज्ञ, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा.संजय कंधारे, डॉ एस. एस. चौधरी, प्रा. ढोले, प्रा. अब्दुल हैदि, प्रा. मोहसीन, प्रा. मेश्राम, प्रा. कदम, प्रा. कटके, अफसर, पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व्यवस्थापन केले . संस्थेचे प्रभारी प्राचार्य सकळकळे यांनी जनरल मॅनेजर जस्मिन पांचाळ, श्री. रेड्डी यांचे स्वागत केले.
00000
वृत्त क्र. 192
नांदेड जिल्ह्यात उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली,
रास्ता रोको आंदोलन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित
नांदेड दि. 1 :- अतिमहत्वाचे व्यक्ती हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सर्व ठिकाणी, तसेच कार्यालयांच्यासमोर 1 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 5 मार्च 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलने इ. आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 1 मार्च 2024 रोजी निर्गमित केले आहेत.
0000
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...


.jpg)




.jpg)



