Friday, March 1, 2024

वृत्त क्र. 193

शासकीय तंत्र निकेतन येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबीलिटी गुजरात यांचा रोजगार मेळावा संपन्न

·   रोजगार मेळाव्यात 117 विद्यार्थ्यांची निवड

नांदेड दि. 1 :- शासकीय तंत्र निकेतन नांदेड येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबीलिटी गुजरात या कंपनीचा पूल कॅम्पस (रोजगार मेळावा) नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विद्युतयंत्रउत्पादन व ऑटोमोबाईल पदविकाधारक पात्र होते. या मेळाव्यास धाराशिव, हिंगोलीपरभणीजिंतूर येथून व नांदेड जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनग्रामीणसहयोगमातोश्री तंत्रनिकेतन या संस्थेचे एकूण 170 विद्यार्थी हजर होते. या मेळाव्यात 117 विद्यार्थी मुलाखतीत कंपनीकडून निवडले गेले आहेत असे संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी कळविले आहे.

या मुलाखती माहिती तंत्रज्ञान बिल्डिंगमध्ये स्थापत्य विभागात घेण्यात आल्या. सुकाणू समितीचे अध्यक्ष विभाग प्रमुख वि. वि. सर्वज्ञप्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा.संजय कंधारेडॉ एस. एस. चौधरीप्रा. ढोले, प्रा. अब्दुल हैदि, प्रा. मोहसीनप्रा. मेश्रामप्रा. कदम, प्रा. कटकेअफसरपाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व्यवस्थापन केले . संस्थेचे प्रभारी प्राचार्य सकळकळे यांनी जनरल मॅनेजर जस्मिन पांचाळश्री. रेड्डी यांचे स्वागत केले.

00000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...