Thursday, November 9, 2023

 दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होणार कारवाई

·         जिल्हा प्रशासनावतीने धडक तपासणी मोहिम सुरु

नांदेड (जिमाका) दि. 9 :- दिवाळी सणामुळे दुग्धजन्य पदार्थाची खरेदी, विक्री मोठया प्रमाणात होते. या कालावधीत दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने अचानक धाड टाकून दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत दोषी आढळून येणाऱ्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष पी.एस. बोरगावकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात दुध व दुधजन्य पदार्थातील होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती मार्फत जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 31 ऑक्टोबर रोजी शहरातील वजिराबाद भागातील जनप्रिया मिष्ठान भांडार, नांदेड येथे धाड टाकून दुध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी केली. या तपासणीत दोन दुग्धजन्य पदार्थ बासुंदी व खवा असे दोन पदार्थाचे नमुने घेवून शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 तेलंगणा राज्याच्या सिमेलगत गावातील

मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- तेलंगणा राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2023 ची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तेलंगणा राज्याच्या सीमेपासून 5 कि.मी. परिसरातील नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. हा आदेश दिनांक 28.11.2023 रोजी सायं 5 वाजेपासून ते दिनांक 30.11.2023 रोजी मतदान संपेपर्यंत लागू राहिल. याचबरोबर मतमोजणीच्या दिवशी 3 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश लागू राहिल. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार हा आदेश निर्गमित केला आहे.  

या निवडणुकीचे मतदान 30 नोव्हेंबर 2023 रोजी तर मतमोजणी 3 डिसेंबर 2023 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.  

000000

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी

जिल्हाधिकारी व उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- मराठा समाजातील व्‍यक्‍तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्‍यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. कुणबी नोंदी असलेल्या कागदपत्रांची पडताळणी नागरिकांनाही करता यावी यासाठी  www.nannded.gov.in हे विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्‍ह्यातील विविध विभागाकडील सन 1967 पुर्वीच्‍या अभिलेखांची तपासणी करून, ज्‍या अभिलेखात कुणबी नोंदी आढळून आल्‍या आहेत ते अभिलेख या संकेतस्थळावर पाहता येतील. मराठा समाजातील नागरिकांनी या संकेतस्थळावरील नोंदी तपासून आपल्या वंशावळीची पाहणी करावी. तसेच त्या अभिलेखाचा संदर्भ देवून आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे कुणबी दाखला प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

मराठा समाजातील व्‍यक्‍तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्‍यासंदर्भात शासनाच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाने 31 ऑक्टोंबर 2023 रोजी जारी केलेल्‍या शासन निर्णयातील तरतूदीं विचारात घेवून कार्यवाही करण्‍याबाबतचे निर्देश सक्षम प्राधिकारी / संबंधीत तालुक्‍याचे उपविभागीय अधिकारी यांना देण्‍यात आले आहेत. त्‍याअनुषंगाने मराठा समाजातील नागरिकांना कुणबी दाखले देण्‍याची प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्‍वतंत्र विभाग सुरू केला आहे.

00000

प्रधानमंत्री पिक विमा योजेनेअंतर्गत

Wednesday, November 8, 2023

 पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार

मेळाव्याचे 16 व 17 नोव्हेंबर रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 16 व 17 नोव्हेंबर 2023 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र.02462251674 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपण्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी पास/ नापास उमेदवारांसाठी आर्यन असेथिंटीक प्रा.ली. नांदेड या कंपनीत टेलर या 10 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच नवकिसान बायो प्लानेटीक लि. कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह 30 रिक्त पदासाठी 10 वी, 12 व पदवीधर उमेदवारांसाठी व फक्त पदवीधर मुलींसाठी फ्रंन्ट ऑफिस एक्सक्युटीव्ह या एका पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नांदेड, लातूर , परभणी, सोलापूर या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉ. ऑफ इंडिया मध्ये लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 25 रिक्त पदासाठी इ. 10,12 व पदवीधर उमेदवारांना धर्माबाद, उमरी, नायगाव या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहेत. तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

 मातंग व तत्सम पोट जातीतील व्यक्तींनी 20 नोव्हेंबरपर्यत

महामंडळाच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मिनी, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादीगा या जातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा व्यक्तीनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नांदेड कार्यालयाशी 20 नोव्हेंबर 2023 पर्यत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि. आर. शिंदे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील जमीनधारकांनी महामंडळाच्या कार्यालयात  येवून अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो या माहितीसह 20 नोव्हेंबरपर्यत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत अर्जासह कागदपत्रे सादर करावीत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...