विशेष वृत्त
- एक हजार मुलींनी घेतली प्रेरणा
विशेष वृत्त
न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचा 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा
नांदेड, (जिमाका) दि. 16 :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) न्यायाधीश उच्च न्यायालय व समिती सदस्य यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
बुधवार सकाळी 10.50 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे बैठकीस उपस्थिती. दुपारी. 1 ते 2 वा. राखीव. दुपारी 2 ते 4 वा. नागरिकांकडून पुरावे स्वीकारणे. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड . सायं. 4.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 4.30 वा. राखीव.
0000
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोंबर 2023 रोजी 91 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील कार्यालये, शासकिय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाज कल्याण विभागाचा वर्धापन दिन साजरा करणेबाबत निर्देश दिले आहे.
त्याअनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी-जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुनिल महिंद्रकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.ना.गोडबोले, सेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक व डॉ.भिमराव हटकर-सामाजिक कार्यकर्ते, एल.जी.कदम-सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी व सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी आर.व्ही.पुराणिक हे होते.
यावेळी महामानवाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. तसेच याप्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच या प्रसंगी सामजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेचा संपूर्ण इतिहास सांगून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सामाजिक न्याय विभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे ऋण व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी /कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थींनी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे से.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अ.ना.गोडबोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भिमराव हटकर यांनी सामाजिक न्याय विभागाचे स्थापनेबाबतची माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनामित्त मनोगत व्यक्त केले. समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांनी समाज कल्याण विभागाच्या स्थापनेपासून आजतागायत वाटचालीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर-अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक न्याय विभागाचे महत्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी एल.जी.कदम, आर.व्ही.पुराणिक व कर्मचारी सिद्धराम वनशेटे, नारायण सदावर्ते, संजय खिरे हे उपस्थित होते तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयातील सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसचंलन गजानन पंपटवार, तालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एल.एस. गायके, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी केले.
0000
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 16 ऑक्टोंबर 2023 रोजी जळगाव विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 10.45 वा. आगमन व शासकीय वाहनाने ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र 2023 या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. स्थळ क्रिकेट मैदान, गोदावरी ढवळकेवाडी तांडा अहमदपूर रोड, गंगाखेड जिल्हा परभणी. दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.
00000
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे नांदेड जिल्हा दौरा येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार 16 ऑक्टोंबर 2023 रोजी जळगाव विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 10.45 वा. आगमन व शासकीय वाहनाने ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र 2023 या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. स्थळ क्रिकेट मैदान, गोदावरी ढवळकेवाडी तांडा अहमदपूर रोड, गंगाखेड जिल्हा परभणी. दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.
00000
शेतीपूरक उद्योग व्यवसाय व सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक*
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...