Monday, June 12, 2023
जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 13 जून 2023 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
0000
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 12 :- महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांची आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांनी डाक कार्यालयात गुंतवणूक केल्यास त्यांना वार्षिक 7.5 टक्के व्याज चक्रवाढ पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अधिक आर्थिक लाभ होणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महिला व मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर राजीव पालेकर यांनी केले आहे.
शासनाने सर्व डाक कार्यालयामार्फत महिला सन्मान बचत पत्र ही नवीन योजना एप्रिल 2023 पासून सुरु केली आहे. ही योजना दोन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. ही योजना प्रामुख्याने महिलांसाठी व मुलीसाठी आहे. महिला या योजनेत 2 वर्षांसाठी किमान 1 हजार ते जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यत गुंतवू शकतात. कोणतीही महिला किंवा मुलगी या योजनेत खाते उघडून 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेत सरकारने घोषित केलेला व्याज दर वार्षिक 7.5 टक्के आहे. व्याज हे चक्रवाढ असेल व व्याज तिमाही आकारले जाते. नांदेड जिल्ह्यातील मुख्य डाक घरासाहित सर्व 417 शाखा डाक कार्यालये व 53 उप डाक घरात ही सुविधा उपलब्ध आहे. अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात 14 जून 21 जून व 28 जून 2023 रोजी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 30 जून 2023 पर्यत डाक विभागामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे डाक विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
00000
Sunday, June 11, 2023
वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 11 :- सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी पथकाचा जून 2023 चा नांदेड दौरा कार्यक्रम 12 ते 14 जून 2023 या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे पथक नांदेड जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी उपस्थित राहील. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी ही संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. दौऱ्याच्या ठिकाणी जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले व डिसेंबर 2030 पर्यंत सेवानिवृत्त होणार अधिकारी-कर्मचारी व न्यायालयीन, मयत, लोकायुक्त प्रकरणे यांच्या सेवापुस्तकास प्राधान्य देण्यात येईल.
सेवापुस्तक शासन निर्णय परीपत्रक वित्त विभाग 20 जानेवारी 2001 सोबतचे जोडपत्र (चेकलिस्ट) प्रमाणे परीपुर्ण पुर्तता करून जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे. सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना शासन निर्णय वि. वि. 14 मे 2019 नुसार वेतनिका प्रणाली मार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावयाचे आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबद्ध / आप्रयोच्या लाभ दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांच्या मुळसेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे, असेही असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
00000
Saturday, June 10, 2023
कृपया सुधारित वृत्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड (जिमाका) दि. 10 :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, संजय कोडगे, व्यंकटराव गोजेगावकर, चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
000000
छाया : सदा वडजे
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन
नांदेड (जिमाका) दि. 10 :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
00000
एमएच-बीएससी नर्सिग सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
एमएच-बीएससी नर्सिग सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड (जिमाका) दि. 10 :- एमएच-बीएससी नर्सिग सीईटी परीक्षा-2023 रविवार 11 जून 2023 रोजी तीन सत्रात जिल्ह्यात 2 परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 ते सायं 4.30 या वेळेत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी काढले आहेत.
या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 11 जून 2023 रोजी सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...










