वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 11 :- सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी पथकाचा जून 2023 चा नांदेड दौरा कार्यक्रम 12 ते 14 जून 2023 या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे पथक नांदेड जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी उपस्थित राहील. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी ही संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. दौऱ्याच्या ठिकाणी जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले व डिसेंबर 2030 पर्यंत सेवानिवृत्त होणार अधिकारी-कर्मचारी व न्यायालयीन, मयत, लोकायुक्त प्रकरणे यांच्या सेवापुस्तकास प्राधान्य देण्यात येईल.
सेवापुस्तक शासन निर्णय परीपत्रक वित्त विभाग 20 जानेवारी 2001 सोबतचे जोडपत्र (चेकलिस्ट) प्रमाणे परीपुर्ण पुर्तता करून जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे. सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना शासन निर्णय वि. वि. 14 मे 2019 नुसार वेतनिका प्रणाली मार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावयाचे आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबद्ध / आप्रयोच्या लाभ दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांच्या मुळसेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे, असेही असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment