Thursday, July 21, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.70 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 654.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-12 (632.20), बिलोली-16.70(692), मुखेड- 27.70 (608.20), कंधार-12.80 (640.40), लोहा-11.70 (596.20), हदगाव-11.20 (599.70), भोकर-36.90 (767.10), देगलूर-26.70 (579.10), किनवट-13 (666.50), मुदखेड- 19.70 (828.70), हिमायतनगर-21 (846.30), माहूर- 4.90 (552.20), धर्माबाद- 46.60 (709.40), उमरी- 43(818.60), अर्धापूर- 9 (616.80), नायगाव-20.50 (603.50) मिलीमीटर आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 145 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, अर्धापूर 1, किनवट 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 59 एवढी झाली असून यातील 1 लाख 312 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 55 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 7  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 6 असे एकूण 13 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 19, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 30, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, अश्विनी हॉस्पिटल 1 असे एकुण 55 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 455
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 91 हजार 31
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 59
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 312
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-55
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हयातील विविध कौशल्य विकास योजनेबद्दल आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातर्गंत उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, उपअधिष्ठाता हेमंत व्ही. गोडबोले, सहायक प्राध्यापक डॉ. आय. एफ. इनामदार व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, आरएमओ डॉ. मंजुषा यशवंत पाटील, डॉ.शितल ओमकारसिंग चव्हाण, सहायक प्राध्यापक डॉ. दिपाली रमाकांत शेरेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद देशपांडे यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या बैठकीस पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.आर.केंद्रे, महानगरपालिकेचे उपआयुक्त पंजाब खानसोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.बिरादार, जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बाऱ्हाते, मर्चन्ट ॲण्ड इंडीयन असोसीएशनचे अध्यक्ष हर्षद शाह, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सी.आर.राठोड, आत्मा कार्यालयाचे आर.बी.चलवदे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य यांची उपस्थित होती.

0000

“हर घर तिरंगा” उपक्रमात

उर्त्स्फूत सहभाग घेण्याचे आवाहन

- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत

नांदेड (जिमाका) दि. 21 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त "हर घर तिरंगा" उपक्रम प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी "हर घर तिरंगा" या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे सांगितले. ज्यामुळे नांदेड जिल्ह्याचा नाव लौकीक होईल. तसेच याबाबतची नोंद https://harghartirangananded.in या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले.

सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी “हर घर तिरंगा” या उपक्रमासाठी 100 भारतीय ध्वज देणगी स्वरुपात वितरणासाठी उपलब्ध करुन दिले. यावेळी कार्यालयात अनुज्ञप्ती व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये ध्वज वाटप करण्यात आले. विक्रीसाठी ध्वज प्रादेशिक परिवहन कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड (महाराष्ट्र शासन अंगीकृत) चे सावित्री महिला लोक संचलित साधन केंद्र नांदेड यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.

0000

 सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सरदार पटेल राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा करण्यात येतो. देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व योगदान देणाऱ्या आणि उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थाना राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सन 2022 साठी ऑनलाईन अर्ज 31 जुलै पर्यंत मागविण्यात आले आहे. या प्रस्तावाबाबत संपूर्ण माहिती www.awards.gov.in चे वेबसाईट वर उपलब्ध आहे.  राष्ट्रीय एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी ज्यांनी कार्य केले किंवा सशक्त भारत निर्माणात सहभाग असलेल्या व्यक्ती, संस्था व  संघटनानी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी केले आहे.

0000

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी

181 पात्र उमेदवारांची सुधारीत यादी प्रसिद्ध 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 181 पात्र उमेदवारांची यादी www.zpnanded.in या संकेतस्थळावर आणि जिल्हा परिषदेच्या सर्व पंचायत समिती कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधीर ठोंबरे यांनी कळविले आहे. 

दिनांक 30 जुन 2022 अखेर पर्यंत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची पुतर्ता करून यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवारांच्या प्रस्तावात काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपाधारकांनी शुक्रवार 29 जुलै 2022 पर्यंत आपले म्हणणे लेखी पुराव्यासह जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागास समक्ष अथवा dyceogadzpnanded@gmail.com वर सादर करावे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

 नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज 21 जुलै रोजी 70 टक्के क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग 346 क्यमेक्स (12218 क्युसेस) विसर्ग सकाळी 10 वाजता नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवीताचे, पशुधनाचे, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जनचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी केले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...