“हर घर तिरंगा” उपक्रमात
उर्त्स्फूत सहभाग
घेण्याचे आवाहन
- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत
नांदेड (जिमाका) दि. 21 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त "हर घर तिरंगा" उपक्रम प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी "हर घर तिरंगा" या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे सांगितले. ज्यामुळे नांदेड जिल्ह्याचा नाव लौकीक होईल. तसेच याबाबतची नोंद https://harghartirangananded.in या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले.
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी “हर घर तिरंगा” या उपक्रमासाठी 100 भारतीय
ध्वज देणगी स्वरुपात वितरणासाठी उपलब्ध करुन दिले. यावेळी कार्यालयात अनुज्ञप्ती व
इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये ध्वज वाटप करण्यात आले. विक्रीसाठी ध्वज
प्रादेशिक परिवहन कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड (महाराष्ट्र शासन
अंगीकृत) चे सावित्री महिला लोक संचलित साधन केंद्र नांदेड यांच्यामार्फत उपलब्ध
करुन देण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment