Thursday, July 21, 2022

 जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हयातील विविध कौशल्य विकास योजनेबद्दल आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातर्गंत उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, उपअधिष्ठाता हेमंत व्ही. गोडबोले, सहायक प्राध्यापक डॉ. आय. एफ. इनामदार व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, आरएमओ डॉ. मंजुषा यशवंत पाटील, डॉ.शितल ओमकारसिंग चव्हाण, सहायक प्राध्यापक डॉ. दिपाली रमाकांत शेरेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद देशपांडे यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या बैठकीस पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.आर.केंद्रे, महानगरपालिकेचे उपआयुक्त पंजाब खानसोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.बिरादार, जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बाऱ्हाते, मर्चन्ट ॲण्ड इंडीयन असोसीएशनचे अध्यक्ष हर्षद शाह, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सी.आर.राठोड, आत्मा कार्यालयाचे आर.बी.चलवदे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य यांची उपस्थित होती.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...