Sunday, November 14, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 751 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 442 एवढी झाली असून यातील 87 हजार 763 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, खाजगी रुग्णालयातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 63 हजार 945

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 60 हजार 111

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 442

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 763

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 कोविड-19 मधून सावरताना जसे एकमेकांना सावरले

तिच एकात्मता व मानवता आपण जपू यात  

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नुकत्याच झालेल्या अनूचित घटना व कायदा हातात घेऊन जो विध्वंस करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला त्यामुळे नांदेडच्या शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचला. कोविड-19 च्या अतिशय आव्हानात्मक काळात भाईचारा, संहिष्णुता, मानवता जपून नांदेड जिल्ह्याने जे एकात्मतेचे प्रतिक जगापुढे ठेवले त्या एकात्मतेला तुरळक घटनांनी आव्हान निर्माण होणार नाही. नांदेड जिल्ह्यातील नागरीक हे शांतताप्रिय असून नुकतीच सुरू झालेली गोरगरिबांची रोजीरोटी दंगलीच्या नावाखाली कोणी हिरावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर पावले उचलू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. 

दि. 12 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे काही ठराविक लोकांनी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील 40 गुन्हेगारांना ओळखून अटक केली आहे. उर्वरीत लोकांची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरू असून 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत समाजकंटकांना कठोर शासन करून नांदेड येथील शांतता व सुव्यवस्थता जपण्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन अधिक दक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या घटनेच्या निषेधार्थ आम्हाला 10 ते 12 विविध संघटनांनी भेटून येत्या मंगळवारी शांती मोर्चा काढण्याबाबत निवेदन दिले होते. त्याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने विचार करुन सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सुसंवाद साधला. दोषींविरुद्ध कोणतीही कायदात कसूर केली जाणार नाही व त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तींकडून झालेले नुकसान वसूल करण्याबाबतही प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल, अशा विश्वास विविध संघटनांना दिल्यानंतर त्यांनी मोर्चा संस्थगीत केला आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्व मिळून एकदिलाने एकात्मता व शांतता टिकविण्यासाठी दक्ष राहू, असे सर्वांनुमते निश्चित करण्यात आले. 

नांदेड जिल्हावासियांनी कोरोनाच्या काळात खूप संयम दाखवून आपशी भाईचारा निभावला आहे. तोच भाईचारा नांदेडकर यापुढील काळातही निभावून गोरगरिबांच्या रोजीरोटीसाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतील अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

00000  

 

Saturday, November 13, 2021

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 753 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 441 एवढी झाली असून यातील 87 हजार 761 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 27 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, धर्माबाद 1 असे एकुण 4  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 27 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 27 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 63 हजार 186

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 59 हजार 356

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 441

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 761

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-27

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 पोलीस शिपाई भरती परीक्षा केंद्र

परिसरात कलम 144 लागू 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- मुंबई शहर पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात 23 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये याबाबत आदेश निर्गमीत केले आहेत. 

या परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात रविवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यात  शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती  अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 2021 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून 30 नोव्हेंबरच्या 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत.   

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना या आदेशात नमूद असलेल्या कृत्ये सार्वजनिक परिसरात किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी तसेच परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी सभा, मिरवणुका मोर्चा, काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलिस अधिक्षक नांदेड यांना प्राधिकृत केलेल्या इतर पोलिस अधिकारी यांना राहतील.

00000

 राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 13 : राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2019-20 साठी नामांकन अर्ज / प्रस्ताव हे  https://innvate.mygov.in/national-youth-award-2020/ या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे. ज्या व्यक्तींना नामांकनासाठी अर्ज सादर करावयाचा आहे त्यांनी प्रथम तो प्रस्ताव ऑनलाईन भरावयाचा आहे. हे नामांकन केंद्र शासनाकडे 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अचूक भरुन पाठवावेत. या प्रस्तावाच्या दोन सारख्या प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

0000

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

सोमवार 15 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई  येथून खासगी विमानाने सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने जुना मोंढा पुर्णा जिल्हा परभणीकडे प्रयाण करतील. परभणी येथून मोटारीने नांदेड विमानतळ येथे सायं 7.15 वा. आगमन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. 

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...