Monday, October 11, 2021

सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी सुरु   

नांदेड (जिमाका) दि. 11 :- पक्की अनुज्ञप्ती (Driving License) चाचणीसाठी उशीराने अपाँईंमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे. हा कालावधी कमी करून नागरिकांची गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने व लॉकडाऊन कालावधीत प्रलंबीत पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्यांच्या नियमन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16,23 व 30 ऑक्टोबर 2021 शनिवार या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिबिराचे आयोजन करून 11 ऑक्टोबर पासून अपॉईंमेंट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

त्यानुसार अर्जदारांनी ऑनलाईन उपलब्ध असलेली अपॉईंमेंट उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्यादिवशी चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000


 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 652 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 344 एवढी झाली असून यातील 87 हजार 674 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 18 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 18  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 41 हजार 472

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 37 हजार 961

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 344

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 674

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-18

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

Sunday, October 10, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षकांशी

सकाळी 10 ते 11 कालावधीत साधता येईल संपर्क 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से), आर. एन. एन. शुक्ला (खर्च), गोपेश अग्रवाल (पोलीस) हे नांदेड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. या निवडणूकीसंदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक यांच्याशी सकाळी 10 ते 11 यावेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

नांदेड येथील मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे इच्छुकांना सकाळी 10 ते 11 यावेळेत भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से) 9022820141, आर.एन.एन. शुक्ला (खर्च) 7498131456, गोपेश अग्रवाल (पोलीस) यांना 7498401148 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

00000

Saturday, October 9, 2021

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 814 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 336 एवढी झाली असून यातील 87 हजार 670 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, किनवट 1 असे एकुण 2 बाधित आढळले.आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एन.आर.आय.भवन व गृह विलगीकरण  1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 14  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 40 हजार 110

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 36 हजार 619

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 336

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 670

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

00000

Friday, October 8, 2021

 सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी सुरु   

नांदेड (जिमाका) दि. 8 :- पक्की अनुज्ञप्ती (Driving License) चाचणीसाठी उशीराने अपॉईंटमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे. हा कालावधी कमी करुन नागरिकांची गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने व लॉकडाऊन कालावधीतील प्रलंबित पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्यांचा नियमन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामर्फत 9, 16, 23 व 30 ऑक्टोबर 2021 शनिवार या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिबीराचे आयोजन करुन एक दिवस आगोदर अपॉईंटमेंट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार अर्जदारांनी ऑनलाईन उपलब्ध असलेली अपॉईंटमेंट घ्यावी व त्यादिवशी चाचणीसाठी कार्यालयात उपिस्थत रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 स्कुल बसेसाठी मानक कार्यपध्दती जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करणे शाळांना बंधनकारक असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. 

कोव्हिड -19 च्या अनुषंगाने स्कुल बस ऑपरेटर यांनी परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 20(1) (X) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने स्कुल बसच्या प्रत्येक फेरीनंतर वाहन स्वच्छ व निर्जंतुक करणे अत्यावश्यक आहे. कर्तव्यावर असणाऱ्या वाहन चालकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बस जिथे उभ्या राहतात तिथे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. स्कुल बसच्या चालकाचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत विद्यार्थ्याच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क जवळ ठेवावे. मास्क परिधान न केलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न नाकारता त्यांना उक्त मास्क वापरासाठी उपलब्ध करून घ्यावे. बसच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर ठेवावे.विद्यार्थ्यांना प्रवेश देताना हात निर्जंतुक करून घ्यावे बसमध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे थॅमल स्कॅनिंग करून घ्यावे. ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजाराचे लक्षण दिसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध करावा. अशा विद्यार्थ्यांना त्वरीत पालकांच्या ताब्यात दयावे. बस वाहनामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे 50 टक्के आसन क्षमतेप्रमाणे वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.स्कुल बसमध्ये चढताना किंवा उतरताना सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे याची दक्षता सहवर्ती चालकाने घ्यावी.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.तसेच वातानुकूलीत बसेसमध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सीअस इतके तापमान ठेवावे.बसमध्ये कचरा फेकू नये आणि बस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दयाव्यात .स्कुल बसचे निर्जतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवण्याची जबाबदारी परवानधारकाची असेल.सुचनाचे पालन न केल्यास परवानधारका विरूध्द मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई स्थानिक प्रशासन कारवाई करेल. केंद्र किंवा राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनाचे पालन करणे आवश्यक असल्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...