Monday, September 20, 2021

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 524 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 306 एवढी झाली असून यातील 87 हजार 630 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 व ॲटिजेन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण निरंक असे एकुण 2 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 25 कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 25 हजार 888

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 22 हजार 576

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 306

एकुण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 630

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.03 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

 

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 21 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, अरब गल्ली, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, खडकपुरा, अरबगल्ली रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 19 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 12 लाख 76 हजार 682 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 10 लाख 71 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 13 लाख 73 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे लवकर होणार

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 20:- नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी पीक पंचनामे करण्यास अडथळे येत आहेत.अनेक ठिकाणी विमा प्रतिनिधी यांना त्रास देत दमदाटी करत असल्याचे लक्षात आले असे कोणी करीत असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

अर्जाची संख्या पाहता पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधीबाबत काही तक्रार असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना रितसर माहिती द्यावी. जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे वेळेत व विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व शेतकरी व नागरिकांनी विमा कंपनी प्रतिनिधी यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.विपिन इटनकर यांनी केले आहे.

00000

 शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 20 :- शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.


मंगळवार 21 सप्टेंबर 20201 रोजी दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे मोटारीने प्रयाण.सायंकाळी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सांयकाळी 6.50 वाजता नांदेड रेल्वे स्थानकातून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

00000

Sunday, September 19, 2021

 ई-पीक पाहणी माहिती ॲपद्वारे नोंदविण्यासाठी मंगळवारी विशेष मोहिम  

 

· जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे गाव न. नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांची “ई-पीक पाहणी” नोंदविण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश देऊन ही मोहिम यशस्वी करू अशा विश्वास व्यक्त केला आहे. 

महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 30 जुलै 2021 नुसार “ई-पीक पाहणी” प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी गुरुवार 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील एक महिन्यात 1 लाख शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करुन नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा पीकपेरा मोबाईल ॲपद्वारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी 21 सप्टेंबर 2021 रोजी मोहिमेवर भर दिला आहे. या मोहिमेची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन केले गेले आहे. 

नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 556 गावे ऑनलाईन असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत असलेल्या दिनांक इतक्या संख्येत म्हणजेच 2 लाख 10 हजार 921 इतक्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तालुका निहाय गावाची संख्या व उद्दिष्ट पुढीलप्रमाणे नेमून दिले आहे. 

अर्धापूर तालुक्यात 64 गावे आहेत. प्रत्येक गावासाठी 10 किंवा उद्दीष्टानुसार कमी अधिक याप्रमाणे स्वयंसेवकांची संख्या निश्चित केली आहे. याप्रमाणे एकुण 640 स्वयंसेवकामार्फत हे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल.  प्रत्येक स्वंयसेवकाने 20 शेतकऱ्यांची नोंदणी केल्यास पूर्ण होणारे काम (उद्दीष्टानुसार कमी अधिक) 12 हजार 800 याप्रमाणे होईल. याच धर्तीवर उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, नायगाव, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, लोहा, हदगाव, हिमायतनगर या सर्व तालुक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती केली जात आहे. तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्र चालक, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करुन त्यांचे सहाय्य गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन घेतले जाणार आहे. 

नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांना मास्टर ट्रेनर्स मार्फत “ई-पीक पाहणी” ॲपचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या सर्व टिमबद्दल विश्वास व्यक्त करुन या मोहिमेचे उद्दीष्ट निश्चित पूर्ण करु असे स्पष्ट केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 623 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 308 एवढी झाली असून यातील 87 हजार 628 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 28 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे किनवट तालुक्यांतर्गत 1 व ॲटिजेन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 2 असे एकुण 3 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 28 कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 25 हजार 367

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 22 हजार 56

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 308

एकुण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 628

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.03 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-28

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

Saturday, September 18, 2021

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त

जिल्ह्यात 55 हजार नागरिकांनी लस घेत जपली बांधिलकी

 

·         लसीकरणाच्या अभूतपूर्व यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून गौरव   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने दिनांक 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 75 हजार कोविड-19 लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी जिल्ह्यात 55 हजार 33 व्यक्तींनी लस घेऊन कोरोना लसीकरणाच्या साक्षरतेत आपले योगदान दिले. या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक करून ही मोहिम अधिक सर्वसमावेशक व व्यापक करण्याच्या प्रयत्नांना व नांदेड जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या  मुख्य  कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, आरोग्य विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, विविध सेवाभावी संस्था यांच्या योगदानातून साकारलेल्या या भव्य लसीकरण मोहिमेला नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

दिनांक 17 सप्टेंबर रोजी झालेल्या या लसीकरण मोहिमेत नांदेड मनपा क्षेत्रात 5 हजार 102, ग्रामीणमध्ये 39 हजार 778,  नगरपालिका क्षेत्रात 10 हजार 153 असे एकुण 55 हजार 33 लसीकरण झाले.  लसीकरणासाठी आरोग्य खात्याशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्स यांनी विशेष परीश्रम घेतले. या सर्वांचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अभिनंदन करुन लसीकरण करून घेतलेल्या नागरीकांचेही त्यांनी आभार मानले. यापुढच्या काळातही असे उपक्रम राबवले जाणार आहेत. अशा समाजउपयोगी उपक्रमामध्ये सर्व नांदेड जिल्हावासीयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.  

000



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...