अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे लवकर होणार
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 20:- नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी पीक पंचनामे करण्यास अडथळे येत आहेत.अनेक ठिकाणी विमा प्रतिनिधी यांना त्रास देत दमदाटी करत असल्याचे लक्षात आले असे कोणी करीत असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अर्जाची संख्या पाहता पंचनामे लवकरात लवकर पूर्ण
करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधीबाबत काही तक्रार असल्यास
संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना रितसर माहिती द्यावी. जिल्ह्यातील पिकांचे
पंचनामे वेळेत व विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व शेतकरी व नागरिकांनी विमा
कंपनी प्रतिनिधी यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.विपिन इटनकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment