राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यासाठी 1408 कोटींच्या निधीची तरतूद
Tuesday, March 9, 2021
नांदेड जिल्ह्यात 225 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू
1 हजार 432 अहवालापैकी 1 हजार 163 निगेटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 9 :- मंगळवार 9 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 225 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 86 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 139 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 119 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 432 अहवालापैकी 1 हजार 163 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 971 एवढी झाली असून यातील 23 हजार 41 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 108 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
सोमवार 8 मार्च रोजी महसूल कॉलनी तरोडा बु नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 607 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 69, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 5, मुखेड कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, माहूर तालुक्याअंतर्गत 3, खाजगी रुग्णालय 10, किनवट कोविड रुग्णालय 9 असे एकूण 119 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.27 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 69, बिलोली तालुक्यात 1, किनवट 1, मुखेड 2, अर्धापूर 1, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 1, लोहा 5, मुदखेड 4, उमरी 1 असे एकूण 86 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 83, अर्धापूर तालुक्यात 2, बिलोली 1, धर्माबाद 6, हिमायतनगर 1, किनवट 9, माहूर 3, उमरी 4, परभणी 1, नांदेड ग्रामीण 7, भोकर 5, देगलूर 4, हदगाव 3, कंधार 2, लोहा 4, मुखेड 1, यवतमाळ 2, नागपूर 1 असे एकूण 139 बाधित आढळले.
जिल्ह्यात 1 हजार 108 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 53, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 78, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 65, किनवट कोविड रुग्णालयात 33, मुखेड कोविड रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 7, महसूल कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 477, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 195, खाजगी रुग्णालय 112 आहेत.
मंगळवार 9 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 135, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 42 हजार 374
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 12 हजार 896
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 971
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 41
एकुण मृत्यू संख्या-607
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.27 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-31
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-259
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 108
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-22.
0000
Monday, March 8, 2021
नांदेड जिल्ह्यात 208 व्यक्ती कोरोना बाधित तर
1 हजार 84 अहवालापैकी 845 निगेटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 8 :- सोमवार 8 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 208 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 113 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 104 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 84अहवालापैकी 845 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 746 एवढी झाली असून यातील 22 हजार 922 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 3 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 23 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 64, देगलूर कोविड रुग्णालय 2, मुखेड कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, माहूर तालुक्याअंतर्गत 12, खाजगी रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 4 असे एकूण 104 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.62 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 83, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद 1, कंधार 3, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, हदगाव 2, परभणी 1, यवतमाळ 1 असे एकूण 95 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 99, देगलूर तालुक्यात 2, कंधार 1, किनवट 2, नांदेड ग्रामीण 3, हदगाव 3, मुखेड 2, परभणी 1 असे एकूण 113 बाधित आढळले.
जिल्ह्यात 1 हजार 3 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 54, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 64, किनवट कोविड रुग्णालयात 35, मुखेड कोविड रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 8, महसूल कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 418, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 172, खाजगी रुग्णालय 100 आहेत.
सोमवार 8 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 134, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 41
हजार 280
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 12
हजार 150
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 746
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 922
एकुण मृत्यू संख्या-606
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.62 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-211
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार
3
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-23.
0000
लेख :
“ती”च्या योगदानाची गोष्ट
विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात तब्बल सोळा तालुके आणि विस्तारही तेवढाच मोठा आहे. एका बाजुला पार विदर्भ आणि तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट पासून ते थेट कर्नाटकाला भिडणाऱ्या देगलूर-मुखेड पर्यंत या जिल्ह्याने विविधता जपली आहे. या विविधतेला जपत स्वाभाविकच जिल्ह्याच्या प्रशासनाला ज्या मुलभूत सुविधा आवश्यक आहेत त्यात आरोग्याची सुविधा खूप महत्त्वपूर्ण आहे.
मागील वर्षभराच्या कालावधीत आव्हानात्मक ठरलेल्या कोरोनाच्या काळात हा जिल्हा डगमगला नाही. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील महिला शक्तीने तेवढीच प्रबळ झुंज देत आपली कर्तव्याची बाजू उजळून दाखविली. एकाबाजुला सर्वसामान्यांच्या मनात उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी असलेले भितीचे सावट तर दुसऱ्या बाजुला तेवढ्याच खंबिरतेने येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना बरे करण्यासाठी सरसावलेला आरोग्य विभागाचा स्टाफ, डॉक्टर्स ! कोरोना व्यतिरिक्त मानवी शरिराचे गुणधर्म लक्षात घेऊन व्यक्तीपरत्वे असलेले विविध आजार व त्यासाठी आवश्यक उपचार वेळीच होणे हे तसे पाहिले तर दुसरा पूर्नजन्मच !
अशा या आव्हानात्मक काळात शासनाच्या आरोग्य विभागातील टीम खंबीरपणे पुढे येऊन स्वत:ला झोकुन देत जेंव्हा काम करते तेंव्हा तसे पाहिले तर सर्व आव्हानांवर एक विश्वासक मार्ग दिसून येतो. अशा या आरोग्य विभागाच्या टीममधील महिलांचे योगदान ठळक अक्षरात नोंदवून ठेवावे लागेल.
कोरोना संसर्गामुळे इतर आजार दूर झाले असे वरकरणी कदाचित कोणी म्हणू शकेल. मात्र कोरोनाचे आव्हानही कमी झाले नाही आणि इतर आजारांपासूनही मानवला सुटका मिळालेली नाही. आजाराच्या लक्षणाप्रमाणे त्यावर तातडीने इलाज करणे हाच त्यातून मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. इतर आजारांसमवेत डोळ्यांचे आजार हे अधिक नाजूक आणि आव्हानात्मक असतात. याकडे अधिक दुर्लक्ष झाले तर कायम अधुपणाची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोना व्यतिरिक्त इतर सेवा-सुविधासमवेत नेत्रविकार आणि विशेषत: मोतीबिंदू शस्त्रक्रियावरही तेवढाच भर दिला.
नांदेड जिल्ह्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मिशनची कोरोनाच्या काळात कमान संभाळली ती एका महिलेने. डॉक्टर रोशन आराखान तडवी आणि त्यांच्यासमवेत झटणाऱ्या साऱ्याजणी जेंव्हा मागील वर्षेभरातल्या आठवणी सांगत होत्या. या वर्षभराच्या विविध आव्हानात खंबीर साथ देऊन इतर सेवा-सुविधा पुरविणारा त्यांची स्टाफ नर्सपासून ते सफाई कामगारापर्यंतची शक्ती ही अर्थात महिलांचीच !
आरोग्य विभागामार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
अभियानांतर्गत कोरोनाच्या आव्हानावर मात करत दृष्टी गमविण्याच्या उंबरठ्यावर
असलेल्या सुमारे अकराशे (1100) वृद्ध
महिला-पुरुषांचे ऑपरेशन डॉक्टर रोशन आराखान आणि आरोग्य विभागाच्या टीमने यशस्वी
पूर्ण करून शासनाच्या वैद्यकिय सेवा क्षेत्राला उजळून टाकले.
“माणुस म्हणल्यावर भीती कोणाला नसते ? एकवेळ पुरुषांना घरातला वावर बाहेरून आल्यावर कमी करता येऊ शकेल मात्र महिलांना स्वयपाक घरापासून सर्वच कोपऱ्यात गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. एकीकडे कर्तव्य म्हणून, आपल्या पेशाचे उत्तरदायित्व म्हणून, जबाबदारीचे भान म्हणून आणि त्याही पलिकडे माणूस म्हणून जे वैद्यकिय सेवेचे व्रत आहे ते जपल्याशिवाय समाधान नाही” अशी साधी आणि सरळ संवेदना जागे करणारी उकल डॉक्टर रोशन आराखान तडवी यांनी करून देत या एक हजार शस्त्रक्रिया मागचे बळ उकलून दाखविले.
मागील मार्च पासून ते ऑगस्ट पर्यंतचा काळ एका भयाच्या सावटा खालचा म्हणता येईल. हे सावट अजूनही संपलेले नाही. कोरोना अजून गेलेला नाही. तो जीवघेणाच आहे. मात्र असे असले तरी त्याच्यापासून स्वत:चे संरक्षण कसे करायचे याची त्रिसुत्री मात्र प्रत्येकाच्या जवळ आहे. ही त्रिसुत्री अर्थात जबाबदारी, “मी जबाबदार” म्हणून प्रत्येकाने स्विकारली पाहिजे. साधे गणित आहे हात वेळोवेळी स्वच्छ धुणे, मास्कचा सतत वापर करणे आणि इतर व्यक्तीपासून थोडे सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकिय क्षेत्राच्या बाहेर असलेल्या व्यक्तींनी एवढी खबरदारी घेतलीच पाहिजे, असे कोरोना वार्डात काम करणारी स्टाफ नर्स संतोषी रतनसिंग मंगोत्रा सांगत धीर देवून जाते.
वैद्यकिय क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींना स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच दवाखाण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेणे हे आलेच. इतरांसाठी जी त्रिसुत्री आहे ती इथे पाळण्यासमवेत वेळप्रसंगी एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याच्याजवळ जाऊन त्याला धीर देणे, उपचार करणे क्रमप्राप्त आहे. अशावेळेस आहे ती सर्व खबरदारी व शासनाने दिलेल्या सर्व निर्देशाचे पालन करुन बळ एकटवणे तसे पाहिले तर सोपे नाही. परंतू कर्तव्याची भावना हिंमत देते. ही हिंमत कदाचित महिलांमध्ये आई म्हणून, बहिण म्हणून अधिक ठेवावी लागेल, असे आयुर्वेदिक कॉलेजच्या नेत्रविभाग प्रमुख डॉक्टर कल्पना वाकोडे सांगतात.
आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दोन पातळ्यांवर दक्ष असावे लागते. एक पातळी म्हणजे कर्तव्यपूर्तीतून मिळणारा आनंद व दुसरा भाग म्हणजे एक गृहिणी म्हणून सांभाळावयाची घरची जबाबदारी. गेले वर्षभर मला कोरोना वार्डात समुपदेशनाचे काम करावे लागले. एका बाजुला पेशंटला न भेटता येणारे त्यांचे जवळचे नातलग तर दुसऱ्या बाजुला दवाखाण्यात ॲडमिट असलेल्या रुग्णाच्या मनात जे काही वादळ सुरू असते त्याला शांत करुन धीर देणे आणि त्याचा आत्मविश्वास वाढविणे. कोरोनाच्या या काळातील या दोघांमध्ये असलेला दुवा म्हणून काम करतांना स्वत:लाही एक माणूस म्हणून खूप वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. हे शब्द आहेत कोरोना बाधित रुग्णांवर समुपदेशनाचे काम करणाऱ्या ज्योती पिंपळे हिचे.
घरी असलेल्या छोट्या बाळाची काळजी घेत घर
सोडतांना घरच्या भावना या घरी सोडायच्या आणि दवाखाण्यात आल्यावर हेच आपले घर समजून
आपल्या कर्तव्यावर एकाग्रता साधायची हे सूत्र ज्योती सांगून जाते. ही दुहेरी
जबाबदारी कदाचित महिला म्हणूनच पार पाडता आली की काय असा सवाल उपस्थित करुन ज्योती
पिंपळे नकळत आरोग्य विभागातील महिला ज्या काही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत
त्याकडे लक्ष वेधून घेते.
डॉक्टर मसरत सिद्दीकी ही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या टिममधील एक सहकारी आहेत. कोरोनाच्या काळात तिच्या स्वत:च्या घरावर संकटे येऊन गेली. जवळच्या आप्तेष्टांना काळाने तिच्यापासून ओढून नेले. घर भयावह झालेले असतांना ही हिंमत घेऊन आपले कर्तव्य बजवायला पुढे सरसावली. या संपूर्ण वर्षेभराच्या काळात एक व्रत घेऊन ती आरोग्याच्या सेवा सामान्यांपर्यंत विश्वासाने पोहचाव्यात यासाठी काळजी घेत आहेत. “आमचे तसे पाहिले तर कामच आहे. घरावर आलेल्या आव्हानाचा विचार करता मी जर भिऊन घरीच थांबले असते तर माझे मी स्वत:ला कधीच माफ केले नसते. घरी कोरोनाने आप्तेष्ट गमावूनही मला माझ्या आईने धीर दिला. बाहेर पडायला बळ दिले म्हणून मी या लढाईत आरोग्य विभागाच्या टिमची एक सदस्य म्हणून लढू शकले हे अभिमानाने सांगायला डॉ. मसरत कमी करीत नाहीत.”
काळ सर्वांना खूप काही शिकवतो. काळाने दिलेला धडा मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहिलच याची शाश्वती देता येत नाही. प्रत्येक रुग्णालयात अशा डॉ. मसरत, डॉ. कल्पना, डॉ. रोशनी, नर्स नंदा, ज्योती, विशाखा, संतोषी अशा कित्येक धैर्यवान महिला आहेत. त्यांच्या योगदानाला आधोरेखीत करणारा हा काळ आहे.
आपण नागरिक म्हणून नेमके कुठे आहोत हा खरा प्रश्न आहे. एका बाजुला स्वत:चे घरदार विसरून प्रत्येक रुग्णालयात झुंजणारी आरोग्य विभागाची टिम तर दुसऱ्या बाजुला कोपऱ्या-कोपऱ्यावर, सार्वजनिक ठिकाणी आवश्यकता नसतांना गर्दी करून धोके वाढवणारे आपण आहोत का ? आरोग्याची त्रिसुत्री न पाळणारे आपण आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाने विचारून काळजी घेतली तर सर्वांचेच जगणे सुसह्य होईल. आरोग्य सेवेत दिवसाची रात्र करुन सेवा देणाऱ्या वैद्यकिय क्षेत्रातील सर्व स्टाफला, महिला शक्तीला आपण काळजी घेऊन आश्वस्त करु यात.
- विनोद रापतवार, जिल्हा
माहिती अधिकारी नांदेड
0000000
जिल्हाधिकारी
कार्यालयात महिला दिन साजरा
कोरोनाच्या आव्हानात्मक काळात
1 हजार 54 मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला महिलांच्या कार्याचा गौरव
नांदेड (जिमाका), दि. 8 :- आजच्या काळातील कोणतेही असे क्षेत्र सुटले नसून सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा उमटवला आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महिलांनी आपले कसब व योगदान पणाला लावून जे आव्हान पेलून दाखविले त्याला तोड नाही या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभसंदेशात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रम व वैद्यकिय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोरोना वॉरीयर्स यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार व जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभागातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
कोरोनासमवेत इतर वैद्यकिय सेवा-सुविधा सामान्य जनतेसाठी तत्पर ठेवणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेत ग्रामीण भागात सेवा-सुविधा पोहचविण्यासमवेत आरोग्य विभागाने तब्बल 1 हजार 58 कॅट्रॅक्स आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून यासाठी योगदान देणाऱ्या डॉ. रोशन आरा तडवी यांच्यासह इतर महिला अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गौरव केला. कोरोनाच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभाग सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना वाकोडे, डॉ. सुजाता राठोड, डॉ. खान साबा अशरफ, डॉ. अर्चना बजाज, प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योती बागल, परिचारिका मालती वाघमारे, जयश्री वाघ, अहवाल नोंदणी विभागातील शुभधा गोसावी, अर्पणा जाधव, रुग्ण व्यवस्थापक डॉ. मसरत सिद्दीकी, स्वच्छता विभागातील किरण हटकर, कोमल दुलगच, समुपदेशक ज्योती पिंपळे, संतोषी रतनसिंघ मंगोत्रा, विशाखा आर. बापटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हॅपी क्लबचे कार्यकर्ते मोहमंद शोएब यांच्या आई शबाना बेगम यांचाही प्रातिनिधक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिना सोलापूरे यांनी केले. यावेळी महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी
दिपाली मोतियळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर, अपर
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी
प्रदिप कुलकर्णी, शरद मंडलिक, अनुराधा
ढालकरी, संतोषी देवकुळे व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात
आले.
0000
Sunday, March 7, 2021
जिल्ह्यात जमावबंदी,
शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यात 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च, 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 8 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच
पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी,
सभा, मिरवणुका, मोर्चा
काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार
जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी
प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000
नांदेड जिल्ह्यात 229 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू
1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 निगेटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 7 :- रविवार 7 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 229 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 131 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 114 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 538 एवढी झाली असून यातील 22 हजार 818 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 899 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
शनिवार 6 मार्च 2021 रोजी अय्यप्पा स्वामी नगर किनवट येथील 78 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्याल विष्णूपूरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 81, देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, भोकर तालुक्याअंतर्गत 4, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 114 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 57, अर्धापूर तालुक्यात 8, हिमायतनगर 1, किनवट 6, मुखेड 3, उमरी 5, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 1, कंधार 4, लोहा 9, नायगाव 1, यवतमाळ 2 असे एकूण 98 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 101, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 1, कंधार 1, लोहा 10, मुदखेड 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, धर्माबाद 6, किनवट 2, माहूर 1, उमरी 1, हिंगोली 1 असे एकूण 131 बाधित आढळले.
जिल्ह्यात 899 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 55, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 68, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 55, किनवट कोविड रुग्णालयात 38, मुखेड कोविड रुग्णालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 58, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 330, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 170, खाजगी रुग्णालय 107 आहेत.
रविवार 7 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 134, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 40 हजार 437
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 11 हजार 502
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 538
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 818
एकुण मृत्यू संख्या-606
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-239
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-899
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-22.
0000
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...








