नांदेड जिल्ह्यात 229 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू
1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 निगेटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 7 :- रविवार 7 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 229 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 131 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 114 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 538 एवढी झाली असून यातील 22 हजार 818 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 899 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
शनिवार 6 मार्च 2021 रोजी अय्यप्पा स्वामी नगर किनवट येथील 78 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्याल विष्णूपूरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 81, देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, भोकर तालुक्याअंतर्गत 4, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 114 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 57, अर्धापूर तालुक्यात 8, हिमायतनगर 1, किनवट 6, मुखेड 3, उमरी 5, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 1, कंधार 4, लोहा 9, नायगाव 1, यवतमाळ 2 असे एकूण 98 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 101, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 1, कंधार 1, लोहा 10, मुदखेड 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, धर्माबाद 6, किनवट 2, माहूर 1, उमरी 1, हिंगोली 1 असे एकूण 131 बाधित आढळले.
जिल्ह्यात 899 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 55, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 68, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 55, किनवट कोविड रुग्णालयात 38, मुखेड कोविड रुग्णालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 58, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 330, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 170, खाजगी रुग्णालय 107 आहेत.
रविवार 7 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 134, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 40 हजार 437
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 11 हजार 502
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 538
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 818
एकुण मृत्यू संख्या-606
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-239
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-899
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-22.
0000
No comments:
Post a Comment