Thursday, March 4, 2021

 नांदेड जिल्ह्यात 125 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

1 हजार 799 अहवालापैकी 1 हजार 658 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 4 :- गुरुवार 4 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 125 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 60 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 81 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 799 अहवालापैकी 1 हजार 658 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 31 एवढी झाली असून यातील 22 हजार 516 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 698 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

बुधवार 3 मार्च 2021 रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 603 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 58, मुखेड कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 12 असे एकूण 81 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 45, लोहा तालुक्यात 7, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 3, माहूर 1, यवतमाळ 1 असे एकुण 60 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 36, भोकर तालुक्यात 1, धर्माबाद 4, माहूर 2, किनवट 1, उमरी 1, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 3, देगलूर 6, लोहा 3, मुखेड 4, हिंगोली 2, यवतमाळ 1 असे एकूण 65 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 39, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 29, किनवट कोविड रुग्णालयात 19, मुखेड कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 52, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 274, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 109, खाजगी रुग्णालय 97 आहेत. 

गुरुवार 4 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 146, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 35 हजार 470

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 7 हजार 123

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 31

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 516

एकुण मृत्यू संख्या-603

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-201

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-698

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-18.

0000

 

वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत

नांदेड (जिमाका) दि. 4 :-:- शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत देण्यात आली होती. याबाबत या उद्योगाच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने या कालावधीत वाढ करण्यात येत असुन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मे, 2021 पर्यंत देण्यात येत आहे. या मुदतीत जर संबंधित यंत्रमागांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जो पर्यंत ते यंत्रमाग घटक नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात येईल.

शासन निर्णयान्वये 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारक ऑफलाईनद्वारे सादर करावयाचा अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करुन आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे सादर करु शकतात असे शीतल तेली-उगले, भा.प्र.से. आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.

*****

 

Wednesday, March 3, 2021

 जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 5 मार्चला

नांदेड (जिमाका) दि. 3:- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

                                                      नांदेड जिल्ह्यात 69 व्यक्ती कोरोना बाधित तर

       1 हजार 474 अहवालापैकी 1 हजार 385 निगेटिव्ह  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- बुधवार 3 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 69 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 50 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  50 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 1 हजार 474 अहवालापैकी 1 हजार 385 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 906 एवढी झाली असून यातील 22 हजार 435 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 655 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 20 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 602 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 19, देगलूर कोविड रुग्णालय 2, खासगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 2 असे एकूण 50 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.85 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, हिमायतनगर तालुक्यात 2, मुदखेड 1, किनवट 7, लोहा 1, हिंगोली 2 असे एकुण 19  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 30, अर्धापूर तालुक्यात 1, माहूर  2, मुखेड 2, किनवट 7, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 2 , मुदखेड 1, लोहा 3, धुळे 1 असे एकूण 50 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 655 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 43, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 77, किनवट कोविड रुग्णालयात 24, मुखेड कोविड रुग्णालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 52, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 256, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 105, खाजगी रुग्णालय 76 आहेत.  

 

बुधवार 3 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 142, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 28 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 33 हजार 961

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 5 हजार 758

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 906

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 435

एकुण मृत्यू संख्या-602                           

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.85 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-188

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-655

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-20.    

0000

Tuesday, March 2, 2021

जातीय तंटे आणि वादापेक्षा गावाचा समग्र विकास अधिक मोलाचा

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 

▪ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी मौ. शिवनी जामगा गावात जाऊन पिडीत कुटूंबांची केली विचारपूस 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. असे हल्ले हे मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून यात कोणाचा तरी जीव जाणे ही प्रवृत्ती गंभीर आहे. जातीपातीच्या पलीकडे गावातील एकात्मता आणि सौहार्दता हाच विकासाचा मुळ पाया असून अशा वादांपेक्षा प्रत्येक गावाने विकासाच्या मुद्दयावर एकत्र येवून खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावणे अधिक महत्वाचे आहे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात अवघ्या 3  हजार 500 लोकसंख्या असलेल्या मौजे शिवणी जामगा येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सांयकाळी किरकोळ वादावरुन निर्माण झालेल्या वादात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला.  या तरुणावर औरंगाबाद येथे पुढील उपचार सुरु असून या पिडीत कुटूबिंयाना भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आज दुपारी मौजे शिवणी जामगा गावात आले होते. त्यांनी पिडीत कुटूबिंयांशी चर्चा केल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधला. पिडीत कुटूबिंयाना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली असून उर्वरित रक्कम आणखी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तेजस माळवदकर, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार बोरगावकर, गावचे सरपंच छत्रपती स्वामी महाराज, उपसरपंच तुकाराम जामगे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सामाजिक एकोप्यावर अधिक भर दिला. मी या गावात तणाव निवळण्यासाठी आलो असून यात निर्दोष असलेला कोणताही व्यक्ती भरडला जावू नये. याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाच्यावतीने हा प्रश्न योग्य तऱ्हेने हाताळला असून पोलीस कार्यवाहीबद्दलही मी समाधानी आहे. विनाकारण ज्यांचा सबंध नाही अशा गावकऱ्यांविरुध्द कार्यवाही करणे योग्य नाही. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनीही जे यात सहभागी होते. तेवढ्याच लोकांची नावे दिली असून त्यांच्याविरुध्द पोलीस प्रशासनाने कार्यवाही केल्याचेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.  

आपल्या दौऱ्यात त्यांनी नांदेड येथे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांच्या समवेत बैठक घेऊन कोरोना व विविध सामाजिक विकास योजनांची माहिती घेतली. 

00000






 

नांदेड जिल्ह्यात 93 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू   

       1 हजार 411 अहवालापैकी 1 हजार 315 निगेटिव्ह  

नांदेड (जिमाका) दि. 2 :- मंगळवार 2 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 93 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 49 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 411 अहवालापैकी 1 हजार 315 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 837 एवढी झाली असून यातील 22 हजार 385 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 636 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

सोमवार 1 मार्च 2021 रोजी नांदेड तरोडा बु येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मंगळवार 2 मार्च 2021 नांदेड समिराबाग येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 602 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 29, देगलूर कोविड रुग्णालय 1, मुखेड  कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, किनवट कोविड रुग्णालय 4, कंधार तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 10 असे एकूण 56 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, लोहा तालुक्यात 3, मुखेड 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, कंधार 2, हिंगोली 1, परभणी 1 असे एकुण 44  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 37, कंधार तालुक्यात 1, मुखेड 1, हदगाव 1, किनवट 5, यवतमाळ 4 असे एकूण 49 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 336 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 42, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 71, किनवट कोविड रुग्णालयात 21, मुखेड कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 53, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 256, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 93, खाजगी रुग्णालय 79 आहेत.   

मंगळवार 2 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 143, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 34 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 32 हजार 537

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 4 हजार 458

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 837

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 385

एकुण मृत्यू संख्या-602                           

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-150

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-636

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-18.    

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...