Monday, February 22, 2021

                                   वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत

औरंगाबाद, दि.22, (विमाका) :- शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करणे आवश्यक होते. परंतू यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे 27 अश्वशक्ती पेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदतवाढ दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे.

            या मुदतवाढीमध्ये जर संबंधित यंत्रमागांनी ऑनलाईन नोंदणी करीता अर्ज सादर केला नाही तर सदर यंत्रमाग नोंदणी करीत नाही तो पर्यंत त्यांची वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असे शीतल तेली-उगले, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

माझी जबाबदारी भक्कम पार पाडण्यासाठी 

नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी  

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाय योजना हाती घेतल्या असून आता नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊन जे प्रवाशी नांदेड जिल्ह्यात येत आहेत त्यांची या छावणीत अँटिजेन कोरोना चाचणी केली जाईल. जे बाधित आढळतील त्यांना उपचारासाठी ते जेथून आले आहेत तिथे पाठविण्यात येईल व ज्यांचे अहवाल बाधित आले नाहीत त्यांना प्रवेश दिला जाईल. बाधितांवर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जाईल याउद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. या छावणीद्वारे यवतमाळ येथून येणाऱ्या प्रवाशांचे वेळप्रसंगी समुपदेशनही छावणीच्या पथकातील सदस्य करतील. कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकिय पथक याठिकाणी काही दिवस ठेवू असे  ते म्हणाले. 

“माझे कुटूंब माझी जबाबदारी” समवेत आता नागरिकांनी यापुढे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे “मी जबाबदार” या कर्तव्याच्या भावनेतून प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले होते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधून नांदेड जिल्हावासियांना काळजी घेण्यासमवेत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास व घराबाहेर पडण्याचे टाळले तर निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जनतेने प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट करुन नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.  

0000

 

रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेला रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार 24 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे. 

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रास असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गटनंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 59 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

611 अहवालापैकी 546 निगेटिव्ह 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सोमवार 22 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 59 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 30 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 611 अहवालापैकी 546 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 208 एवढी झाली असून यातील 22 हजार 29 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 375 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 21 फेब्रुवारीला देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील 47 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 593 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, माहूर तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, लोहा तालुक्यात 2, परभणी 2, नांदेड ग्रामीण 1, नायगाव 1, हिंगोली 3 असे एकुण 30 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, किनवट तालुक्यात 2, हिंगोली 1, हदगाव 4, मुखेड 1 असे एकूण 29 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 375 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 44, किनवट कोविड रुग्णालयात 15, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 186, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 47, खाजगी रुग्णालय 4 आहेत.   

सोमवार 22 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 153, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 60 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 23 हजार 168

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 95 हजार 520

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 208

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 29

एकुण मृत्यू संख्या-593                             

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-375

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.                       

0000

Sunday, February 21, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 60 व्यक्ती कोरोना बाधित

1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 241 निगेटिव्ह 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- रविवार 21 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 60 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 241 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 149 एवढी झाली असून यातील 22 हजार 4 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 342 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 592 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, किनवट कोविड रुग्णालय 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, लोहा तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 23, धर्माबाद तालुक्यात 1, किनवट 8, मुदखेड 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1, माहूर 1, हिंगोली 1, आदिलाबाद 1 असे एकुण 39 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, हिमायतनगर तालुक्यात 1, देगलूर 1, किनवट 5, हदगाव 3, उमरी 1 असे एकूण 21 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 342 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 38, किनवट कोविड रुग्णालयात 6, हदगाव कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 174, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 45, खाजगी रुग्णालय 39 आहेत.   

रविवार 21 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 66 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 22 हजार 647

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 95 हजार 63

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 149

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 4

एकुण मृत्यू संख्या-592                             

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-342

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.                      

0000

Saturday, February 20, 2021

लेख :

 सहकार मंत्री यांचे लोकराज्य अंकासाठी मनोगत  

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन विकास

शेतकरी  आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा

          राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. सहकारासंस्था, बाजारसमित्या, थेट शेतकऱ्यांशी निगडीत असल्याने कृषी-औद्योगिक अर्थकारण ग्रामीण पत क्षेत्रात सहकार आणि पणन क्षेत्राला अधिक  सक्षम करण्यासाठी शासनाने सामान्य माणूस, शेतकरी बांधव केंद्रस्थानी ठेऊन विकासावर लक्ष्य केंद्रित केले आहे.  मागील चार वर्षापासून शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्त करणारी सहज, सोपी आणि पारदर्शक अशी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी सुरू  आहे. कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत सुध्दा ग्राहकांना आणि शेतकरी बांधवांना अडचणी येऊ नयेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना  करून बाजार समित्यांचे व्यवहार सुरू ठेवले आणि ग्राहकांना सुध्दा भाजीपाला पुरवठा सुरू ठेवला.   

‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’

          दि. 1 एप्रिल, 2015 ते दि.31 मार्च,2019 पर्यतच्या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्व अल्पमुदत पीककर्ज,पुनर्गठीत/फेर पुनर्गठीत झालेले पीककर्ज, ज्यांची थकबाकी दि. 30 संप्टेबर, 2019 रोजी रू 2 लाख पर्यंत होती, ती कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या  बॅक खात्यात थेट जमा करण्यात आली. आतापर्यंत जवळपास  30.77  लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रू. 19643  कोटींची रूपये जमा करण्यात आले आहे.जवळपास  97 टक्के लाभार्थ्यांना  जुलै, 2020  पर्यंत राज्यात लॉकडाऊन असतांना देखील  कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला.

          सन 2020-21 या वर्षातील खरीप हंगामासाठी राज्याचा रु.45,785 कोटी एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला होता. दि. 1 एप्रिल 2020 ते 30 संप्टेंबर 2020 या कालावधीत. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण 76.26 टक्के असून मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्के जास्त आहे. 

          जुलै व ऑगस्ट 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते.यात कोल्हापुर, सांगली , सातारा, पुणे, सोलापुर,अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती व नागपुर या  जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्यात आले.

          शेतकऱ्यांच्या हितासाठी  या वर्षात शेतकऱ्यांना  हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विक्री  करण्याची वेळ येऊ नये, यासाठी  लॉकडाऊन असतांना सुध्दा कापूस खरेदी संदर्भात तातडीने उपाययोजना करून गेल्या दहा वर्षातील विक्रमी अशी कापूस खरेदी केली. पावसाळ्यामध्ये देखील  मान्सून शेड उभारून बहुतांश  कापूस हा खरीप २०२०--२१ च्या पेरणी पूर्वी खरेदी करून शेतकऱ्यांची देयके देखील वेळेत देण्यांत आली.

          कोवीड-19 च्या रुग्ण संख्येत दररोज होणारी वाढ विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. तसेच सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण करण्यास आणि संस्थेची वार्षिक साधारण सभा घेण्यास सुध्दा मुदतवाढ देण्यात आली. अशा परिस्थितीत संचालक मंडळाच्या नियंत्रणापलीकडील बाबीमुळे निवडणुक होवु न शकल्यास अशा संस्थेचे नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत सध्या कार्यरतअसलेल्या  संचालक मंडळास काही महत्वाचे निर्णय घेण्याचे सुध्दा अधिकार देण्यात आले आहे. तसेच सहकार संस्था , बाजार समित्या, निर्यात  क्षेत्रावर झालेला लॉकडाऊनचा परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर करेल आणि शासनाच्या वतीन आवश्यक उपाययोजना करण्यात येथील त्यामुळे अर्थव्यवस्थेचे अर्थचक्र पुन्हा सुरू होण्यास  मदत होईल.

          कोवीड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठया शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना थेट फळे व भाजीपाला पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र विकास महामंडळाच्या स्तरावर वेबसाईटद्वारे जीवनावश्यक वस्तुंच्या ऑनलाईन बुकींगची व्यवस्था केली.या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाशी संलग्न असलेल्या 75 शेतकरी उत्पादक कंपन्या / सहकारी संस्थांमार्फत सुमारे 414 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील 11,899 सभासदांना 1464 क्विंटल एवढा जीवनावश्यक वस्तुंचा माफक दरात पुरवठा केला.

          या हंगामात सहकारी साखर कारखाने सुरु करण्यासाठी कारखान्यांना पुरेशा प्रमाणात कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत आत्मनिर्भर योजना तयार करण्यात आली आहे.आतापर्यंत बँकेकडे 19 कारखान्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तसेच  ज्या सहकारी साखर कारखान्यांचे उक्त मुल्य व एनडीआर उणे आहे अशा ३२ सहकारी साखर कारखान्यांना नाबार्डच्या धोरणा नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अथवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुरवठा करु शकणार नाहीत. अशा 32 सहकारी साखर कारखान्यांच्या रुपये 516.२० कोटी  अल्पमुदतकर्ज घेण्यास  शासन हमी. 

      सॉफट लोन योजनेस पात्र 147 कारखान्यांसाठी 4 वर्षाचे व्याजाचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.  सदर योजनेअंतर्गत 54 पात्र सहकारी साखर कारखान्यांना सन 2017-18 मधील सॉफट लोन व्याज अनुदानाची उर्वरित रक्कम रु. 33.83 कोटी  वितरीत करण्यात आली आहे.

          देशपातळीवर पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर सद्यस्थितीत 6% च्या आसपास असुन सन 2022 पर्यंत हे प्रमाण 10% करण्याचे व सन 2030 पर्यंत 20%/ वाढविण्याचे उद्दीष्ट आहे.राज्यातील इथेनॉल निर्मितीची वार्षिक क्षमता 166 कोटी लिटर्स असली तरी राज्यासाठी सन 2020-21 साठी इथेनॉल पुरवठा करण्याचे लक्ष 108 कोटी लिटर्स निश्चित करण्यात आले आहे. 

              सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतुन कारखान्यांनी किमान 25 बेडचे हॉस्पीटल उभारण्याचे व त्यामध्ये कोरोनाच्या उपचाराशी संबंधित सुविधा देण्याची काही साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखाना, सहयाद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांनी कोव्हीड सेंटरची उभारणी केली आहे.

          आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क- MAGNET (Maharashtra Agribusiness Network)  या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प एकूण 142.9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे रु. 1000 कोटी) इतक्या रक्कमेचा असून त्यापैकी 70% निधी (100 दशलक्ष डॉलर्स) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात, 30% निधी (42.9 दशलक्ष डॉलर्स) राज्य शासनाचा स्वत:चा निधी असणार आहे. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादनास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल आणि राज्यात  पुढील 5 वर्षांपर्यंत फळ भाजी पाल्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता या मॅग्नेट नेटवर्कमधून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. तसेच शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होते.

          यामध्यामातून शेतक-यांना ऑनलाईन कर्जाची सुविधा फक्त एक ते दोन दिवसात पुर्ण केली जात आहे. तारण कर्जाची मर्यादा प्रति शेतकरी  5 लाखापर्यत असून तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी व्याजदर आहे. 

          महाराष्ट्र राज्य पणन मंडळामार्फत जानेवारी 2020 ते जून 2020 अखेर सुविधा केंद्रावरून 9912 मे टन शेतमाल आखाती देश व युरोपिय देशांमध्ये निर्यात करण्यात आलेला आहे.त्यामध्ये प्रामुख्याने फळे फुले भाजीपाला पशुखाद्य कांदा इ. चा समावेश आहे. रासेच या केंद्रामध्ये एकूण 1173 जणांना प्रत्यक्षा रोजगार मिळालेला आहे. लॉकडाऊन कालावधीत आंतरराज्यीय फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण कक्ष’सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून शेतमाल बाहेरील राज्यात पाठविण्यात यश आले  आंतरराज्यीय फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यत आले होते. मोठ्या महानगरात भाजीपाला-धान्य-फळांचा तुटवडा निर्णाम होऊ नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समिती आवारात स्वछता, सामाजिक अलगिकरणाचे (SocialDistancing) सर्व नियम पाळले, बाजार आवरात येणाऱ्या व्यक्तीसाठी प्रवेश द्वाराजवळच, तसेच बाजार आवारात ठीक ठिकाणी पुरेशा प्रमाणात  हात धुण्यासाठी व्यवस्था,पाण्याचा नळ आणि निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरची व्यवस्था करून बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवले.कोरोनाचा सामना करत शेतकरी हितासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने महाराष्ट्र घडलेला आहे सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून या महाराष्ट्राची जडणघडण झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री सातारा जिलह्याचे भूमीपुत्र यशवंतराव चव्हाण यानी पुरोगामी महाराष्ट्राची ही घडी अधिक मजबूत केली. पुढे वसंतराव नाईक वसंतदादा पाटील, मा. नामदार शरद पवार यांच्या सारख्यांच्या नेतृत्वात या राज्याने प्रगतीचे नवनवे यशो शिखर निर्माण केली तीच विकासाची परंपरा कायम ठेऊन आमचे सरकारने कार्य करत आहे. 

     शब्दाकांन काशीबाई थोरात-धायगुडे

 

नांदेड जिल्ह्यात 56 व्यक्ती कोरोना बाधित

541 अहवालापैकी 469 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  शनिवार 20 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 56 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 33 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 23 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  33  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 541 अहवालापैकी 469 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 89 एवढी झाली असून यातील 21 हजार 968 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 318 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 592 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 21, हदगाव कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, भोकर तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 33 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.14 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, हदगाव तालुक्यात 3, उमरखेड 1, भेाकर 1, लोहा 1 असे एकुण 33 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 17, किनवट तालुक्यात 2, परभणी 1, देगलूर 1, माहूर 2 असे एकूण 23 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 318 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 32, किनवट कोविड रुग्णालयात 12, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 171, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 34, खाजगी रुग्णालय 39 आहेत.  

शनिवार 20 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 160, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 21 हजार 998

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 94 हजार 490

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 89

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 968

एकुण मृत्यू संख्या-592

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.14 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-318

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.                       

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...