Friday, May 8, 2020


आतापर्यंत 1 हजार 376 स्वॅब निगेटिव्ह
63 व्यक्तींचा तपासणी अहवाल प्रलंबित  
बाधित 25 रुग्णांवर औषधोपचार सुरु प्रकृती स्थीर
नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  कोरोना विषाणु संदर्भात शुक्रवार 8 मे 2020 रोजी सायं 5 पर्यंत नांदेड जिल्ह्यात प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एकुण 93 हजार 623 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तर 1 हजार 502 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 376 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून 63 व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. तर यातील 38 व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
यापैकी सहा रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 25 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मृत झाले आहेत. शुक्रवार 8 मे रोजी रविनगर भागातील आणि एनआरआय भवन येथील 33 आणि इतर असे एकुण 63 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्याची आकडेवारी 
• आत्तापर्यंत एकूण संशयित – 1601 • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 1492 • क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 505 • अजून निरीक्षणाखाली असलेले – 105 • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 253 • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – 1239 • आज तपासणीसाठी नमुने घेतले- 62 • एकुण नमुने तपासणी- 1502 • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 38 • पैकी निगेटीव्ह – 1376 • नमुने तपासणी अहवाल बाकी- 63 • नाकारण्यात आलेले नमुने – 5 • अनिर्णित अहवाल – 19 • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 4 • नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 93 हजार 623 असून त्यांना त्यांच्या घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
00000


कंटेनमेंट झोन मधील नागरिकांच्या
समुपदेशनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड, (जिमाका) दि. 8 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील पाच कंटेनमेंट झोन मधील नागरिकांच्या समुपदेशानासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.  
महानगरपालिका हद्दीत कोविड 19 चे रुग्ण आढळून आल्यामुळे अशा क्षेत्रात संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कंटनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. या कंटनमेंट झोन पिरबुऱ्हाण येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) राजेंद्र शिंगणे. अंबानगर सांगवी येथे जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) व्ही. आर. पाटील. अबचलनगर येथे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, रहमतनगर येथे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर, लंगरसाहिब येथे मनपाचे सहाय्यक आयुक्त रितेश बैरागी या अधिकाऱ्यांची समुपदेशनासाठी नियुक्ती करण्यात आाली आहे.
कंटनमेंट क्षेत्रात रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशीलवार धोरण व करावयाचे उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आले असून त्याबाबत आरोग्य विभागाने कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने कंटनमेंट झोन मधील नगारिकांना मानसिक आधार देण्याच्यादृष्टिने समपुदेशन करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकारी हे वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांच्या अडचणीबाबत माहिती घेतील. नियुक्त समन्वय अधिकारी यांच्या समन्वयाने ते दूर करण्याची कार्यवाही करतील. नागरिकांना आजाराबाबत समुपदेशन करुन त्यांना मानसिक आधार देवून त्यांच्या कामाचे क्षणचित्रे काढतील. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या संनियंत्रणेत सोपविलेले कामे वेळेत जबाबदारीने पार पाडावीत. दररोज वेळोवेळी भेटी दिल्याचा अहवाल क्षणचित्रासह त्यांच्याकडे सादर करावा. तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय बिरादार, अव्वल कारकुन विजय महाजन हे याकामी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कक्षात सहाय्य करतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन


लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना  
वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी
राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-260621 असून  यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.  
कोराना विषाणुचा संसर्ग वाढू नये म्हणून  शासनाने 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्यात विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे.
तसेच नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. विभाग नियंत्रक अ. र. कचरे (कंसात भ्रमणध्वनी क्रमांक) कंसाबाहेर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक- (8275038417) 02462-260175. विभागीय वाहतूक अधिकारी सं. बा. वाळवे- (9422185619) 02462-260621. आगार प्रमुख (वरिष्ठ) नांदेड आगार पु. ता. व्यवहारे- (9070706024) 02462-234466.आगार प्रमुख भोकर सु. धु. पवार (8390168613) 02467-202633. आगार प्रमुख किनवट मि. पु. सोनाळे (9881391958) 02469-222050.आगार प्रमुख मुखेड सं. तु. शिंदे (9307786083) 02461-202547. आगार प्रमुख देगलूर अ. रा. चव्हाण (7588523782) 9422878417. आगार प्रमुख कंधार ह. म. ठाकुर (9823533890) 02466-223435.आगार प्रमुख हदगाव सं. बा. अकुलवार (9420461711) 02468-222344.आगार प्रमुख बिलोली च. र. समर्थवाड (8698094565), 02465-223323. आगार प्रमुख माहूर वि. तु. धुतमल (8668482504) 02460-268424 या संपर्क क्रमांकावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इच्छुक नागरिकांनी प्रवासाबाबत संपर्क साधावा, असेही आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
0000

Thursday, May 7, 2020


रक्तदाब, मधुमेह रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी ;
एकुण 1 हजार 329 जणांचा अहवाल निगेटिव्ह  
तर 482 व्यक्तींचा क्वांरटाईन कालावधी पूर्ण ;
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 218 जण निगेटिव्ह  
नांदेड, (जिमाका) दि. 7 :- कोरोना विषाणु संदर्भात गुरुवार 7 मे 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी पुढीलप्रमाणे दिली आहे. जिल्ह्यात प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 92 हजार 86 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 1 हजार 440 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 329 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून 51 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. या स्वॅब पैकी 35 व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकुण 1 हजार 457 क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींपैकी 482 व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधीत पूर्ण झाला आहे.
पॉझिटिव्ह 35 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 22 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित 7 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मृत झाले आहेत तर तीन रुग्ण फरार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या 35 पॉझिटिव्ह रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील 304 व्यक्तींपैकी 265 रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या व्यक्तीपैकी 218 व्यक्तींचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होत. त्यापैकी 218 व्यक्तींचे थ्रोट स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
000000


मनपा क्षेत्रातील तीन कार्यालय वगळता ;
सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात
दस्तांची नोंदणी आजपासून पूर्ववत सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील बंद केलेली दस्त नोंदणी नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील तीन कार्यालय वगळता इतर उर्वरित सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयामध्ये दस्तांची नोंदणी शुक्रवार 8 मे 2020 पासून पूर्ववत सुरु करण्यात येत असल्याबाबतचा आदेश सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी आज निर्गमीत केला आहे.  
या आदेशात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोना विषाणु (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन नांदेड जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय रविवार 17 मे 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. परंतू स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार पुर्ववत सुरु करुन दस्त नोंदणी पुर्ववत सुरु करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देशीत केले आहे. 
            त्यानुसार सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी नांदेड महानगरपालिका अंतर्गत असलेले सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निंधबंक श्रेणी 1 कार्यालय नांदेड क्र. 3 हे तीन कार्यालय वगळता उर्वरित सर्व दुय्यम निबधंक श्रेणी-1 कार्यालयामध्ये कलम 144 चे पालन करुन शुक्रवार 8 मे 2020 पासुन दस्तांची नोंदणी पुर्ववत सुरु करण्याकरीता पुढील अटी व शर्तींच्या आधारे परवानगी दिली आहे.  
सह दुय्यम निबंधक वर्ग -2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निंधबंक श्रेणी-1 कार्यालय नांदेड क्र. 3 या तिन कार्यालयाच्या कंटेन्मेंट झोन घोषीत केलेल्या क्षेत्राचा प्रतिबंधीत कालावधी पुर्ण झाल्यानंतर दस्तांची नोंदणी पुर्ववत सुरु करावी. कार्यालये प्रथमतः सुरु करण्याच्या दिवशी व नंतर किमान प्रत्येक 7 दिवसानंतर संपुर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करुन घेण्यात यावे. नागरिकांनी दस्तनोंदणीसाठी जिल्हा मु्ख्यालयाचे ठिकाणाचे कार्यालयासाठी eStep-in व्दारे व इतर ठिकाणी eStep-in किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर/ समक्ष संपर्क साधुन वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील अशा इतर कार्यालयात दुरध्वनीवर / समक्ष टोकन बुकींग साठी प्रथम आलेल्यास प्रथम प्राधान्य (FIFO) या तत्वाचा अवलंब करावा. नागरीकांनी दस्त नोंदणीसाठी आरक्षित वेळेलाच कार्यालयात यावे.  दस्तछाननी, सादरीकरण (Stamp I व II) झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुलीजबाब देण्यासाठी नावाचे क्रमवारीनुसार प्रवेश दयावा. एका दस्तामध्ये जास्त पक्षकार असल्यास एकावेळी जास्तीतजास्त चारच पक्षकारांना आत प्रवेश दयावा. पक्षकारांनी केवळ फोटो काढण्यापुरता मास्क चेहऱ्यावरुन खाली घ्यावा.प्रत्येक दस्त नोंदणी व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर बायोमेट्रीक उपकरणाचे निर्जतुकीकरण (Sanitize) करण्यात यावे. सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयातील कर्मचा-यांना मास्क , ग्लोव्हज, सॅनिटायझर इ. साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहे त्याचा वापर करण्यात यावा. बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इ. चे सातत्याने निर्जतुकीकरण (Sanitization) करत रहावे. सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयातील कर्मचा-यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कर्मचाऱ्यानी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी नागरिकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. बायोमेट्रीक उपकरण निर्जतुक (Sanitize) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा. दस्त नोंदणी कार्यालयातील दोन कक्षांमधील/टेबलांमधील अंतर किमान 2 मिटर राहील याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांना त्यांचे नाव व तोंडावर मास्क/स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कीग करण्यात यावी तसेच कमीत कमी पक्षकारांनी दस्त नोंदणीस उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. आवश्यकता असल्यास पोलीसांची मदत घेण्यात यावी. दस्त नोंदणी कार्यालीयाने एक दस्त नोंदणीसाठी आवश्यक तेवढयाच नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी द्यावी. प्रवेश केलेल्या नागरिकांचे काम झाल्याशिवाय पुढील नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन व्यक्तीमध्ये रांगेत पाच फूट अंतर ठेवावे.
तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या परिपत्रकातील सर्व सुचनाचे काटेकोरपणे पालन करावे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हाधिकारी नांदेड यांनी याविषयी जेवढी परिपत्रके, आदेश, सूचना, काढले असतील त्या सर्व परिपत्रके, आदेश, सूचना यांचे योग्यरित्या पालन करावे. यात कोणतीही हयगय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, अधिसुचना क्र.कोरोना 2020/ प्र.क्र./58/आरोग्य-5 दिनांक 14 मार्च 2020 मधील तरतुदीनुसार "महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020" चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी नमूद केले आहे.
0000000

Wednesday, May 6, 2020


स्थानिक गुन्हे शाखेने 34 लाख रुपयाचा गुटखा पकडला

 नांदेड दि. 6 :-  एका ट्रकमध्ये कर्नाटक राज्यातील हूमनाबाद येथून हिमायतनगर येथे गुटखा विक्रीसाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर व त्यांचे टिमने बुधवार 6 मे रोजी सकाळी 5.30 ते 6 यादरम्यान दुध डेअरी वसरणी चौक येथे सापळा रचला होता. सापळया दरम्यान ट्रक क्रमांक एमएच 26 बीई 4064 या ट्रकला पकडून तपासणी केली असता या ट्रकमध्ये पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी वरील बाजूस कांदा भरुन त्याखाली गुटखा लपविण्यात आला होता. या ट्रकमध्ये सागर पान मसाला कंपनीचा 34 लाख रुपयाचा 60 बोरीगुटखा व 12 लाख रुपये किंमतीचा ट्रक असे एकूण 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात कोणीही चोरटया मार्गाने अथवा इतर मार्गाने कोणत्याही प्रकारची मद्य विक्री व गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह सपोउपनि चव्हाण, पोहेकॉ / भानुदास वडजे, दशरथ जांभळीकर, पदमा कांबळे, तानाजी येळगे, बालाजी मुंडे व बजरंग बोडके यांनी पार पाडली आहे.
राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दिनांक 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम ,1897 लागू करण्यात आलेला आहे. दिनांक 14 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात मार्च महिन्यापासून शासनाने लॉकडाऊन घोषीत केलेला आहे. सदर लॉकडाऊन काळात देशी, विदेशी दारु विक्रीचे दुकानांना  विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयाने दिली आहे.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...