Tuesday, March 17, 2020

शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा रद्द
प्रशासनाच्या आवाहनाला मंदिर ट्रस्टचा सकारात्मक प्रतिसाद

               सातारा, दि.17 (जिमाका) :  कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे.  कोरोनाचे संसर्गाचे संकट रोखण्यासाठी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन भाविकांसह सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले.
                     शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधी असून यात्रेसंदर्भात शिंगणापूर याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, माणचे तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मानकरी भाविक उपस्थित होते.
                    शिंगणापूर यात्रेसाठी दरवर्षी 8 ते 10 लाख भाविक येत असतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होवू नये यासाठी  प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी यात्रेसंदर्भात प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. श्रीमती जिरंगे म्हणाल्या, प्रशासन लाखो भाविकांच्या भावनांचा आदर करीत आहे, मात्र कोरोनाचे संकट ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याने त्यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात येत आहे.
                     यात्रा काळातील सर्व धार्मिक उत्सव संबंधित स्थानिक पुजारी, सेवाधारी यांनी करावेत अशा सूचना देवस्थान समिती व पुजारी मंडळींना दिल्या. याशिवाय यात्रेसाठी ध्वज आणणे तसेच कावडी आणण्यावर प्रतिबंध असल्याचे प्रांताधिकारी जिरंगे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यात्राकाळात एसटी मार्फत कोणतीही जादा बसवाहतूक केली जाणार नसून यात्रेच्या अनुषंगाने कोणत्याही सुविधा पुरविण्यात येणार नाहीत. कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनी यात्राकाळात शिंगणापूरमध्ये गर्दी करू नये. असे आवाहन श्रीमती जिरंगे यांनी यावेळी केले.
                    शिंगणापूर यात्राकालावधीत गर्दी रोखण्यासाठी 144 कलमानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी सांगितले. भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून भाविकांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन श्री. महामुनी यांनी केले.
                    कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या शिंगणापूर यात्रा बंदीच्या निर्णयास शिंगणापूर सरपंच अभय मेनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, सर्व सदस्य, व्यावसायिक, सेवाधारी, देवस्थान समिती यासह कावडीधारक, ध्वज मानकरी, भाविकांनी पाठींबा दिला. यात्रेच्या दृष्टीने प्रशासन घेत असलेल्या निर्णयास सहकार्य करण्यात येईल, असे  ग्रामस्थ व भाविकांनी बैठकीमध्ये सांगितले. 
00000

कोरोंना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी करु नये
नांदेड दि. 17 :- जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, मुखेड, बिलोली, देगलूर येथील केंद्रावर तूर खरेदी व चणा नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
गर्दी टाळण्याबाबत योग्य खबरदारी घेण्याच्यादृष्टीने खरेदी केंद्रावर एकावेळी पाचपेक्षा कमी व्यक्तीने प्रवेश करावा व इतरांनी केंद्राच्या बाहेर दोन ते तीन फुटाच्या अंतरावर थांबण्याची काळजी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

Monday, March 16, 2020


जिल्हा परिषद अनुकंपा धारकांची
प्रतिक्षा यादी प्रसिद्ध ;
आक्षेप पुराव्यासह सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :-  अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 379 अनुकंपा धारकांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद नांदेडच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध  केली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या व नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील आवाराच्या भिंतीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पूर्ण / अपुर्ण प्रतिक्षा यादी 31 डिसेंबर 2019 अखेरपर्यंत प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवाराचे प्रस्ताव अपूर्ण आहेत अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अथवा जेष्ठतेबाबत काही आक्षेप असल्यास संबंधीत अनुकंपा धारकांनी सोमवार 23 मार्च 2020 पूर्वी त्यांचे म्हणणे लेखी पुरवानिशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास सादर करावी. त्यानंतर आलेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित
नांदेड दि. 16 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपाय योजनेचा एक भाग म्हदणुन बुधवार 18 मार्च, 2020 रोजी नांदेड जिल्ह्या तील एकुण 1 हजार 309 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थमगित करण्याणत आला आहे. या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा दिनांक यथावकाश कळविण्या त येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
शासन आदेशान्व्ये नांदेड जिल्ह‍यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण बुधवार 18 मार्च 2020 रोजी सकाळी 110 वा. सर्व संबंधित तालुका मुख्यादलयी आयोजित करण्यात करण्यापबाबत आदेशित करण्या त आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपायोजनेचा एक भाग म्हचणुन नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याणबाबत शासनाकडून निर्देश देण्या त आले आहेत.
बुधवार 18 मार्च, 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील एकुण 1 हजार 309 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्या-त्या तालुक्याच्या मुख्यालयी होणार होती. त्याठिकाणी तालुक्यातील सर्व सरपंच, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असे त्या तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतीच्या 10 पट नागरीक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


कोरोना आजाराचा प्रादुर्भाव :
राज्य माहिती आयोगाकडील
द्वितीय अपील सुनावणी कार्यक्रम रद्द
नांदेड दि. 16 :- मा. राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद द्वितीय अपील सुनावणी दि 17, 18 व 19 मार्च 2020 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित कार्यक्रम सद्यस्थितीस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात दिलेले सूचनांचे अनुषंगाने द्वितीय अपील सुनावणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
सदर सुनावणीसाठी पुढील तारीख सर्व संबधितांना आयोगातर्फे यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, मा. राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद यांनी निर्देश दिले आहेत. असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

Sunday, March 15, 2020


करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी
कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये,  
सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील शासनाचे आदेश होईपर्यंत बंद ठेवावेत  
-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचे निर्देश  
            नांदेड दि. 15 :-  कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय,व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी  कक्षामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक / मालक यांची बैठक घेण्यात आली  त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, बा.क. जि.प.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी एस.व्‍ही.शिंगणे, जिल्‍हा महिला बाल कल्‍याण अधिकारी श्रीमती आर.पी.काळम, उपशिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक / मालक  यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.  
महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू केला असून सदरील कायद्याची दिनांक 14 मार्च, 2020 पासून महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 लागू केलेली आहे. त्यानुसार महानगरपालिका, सर्व नगरपालिका , सर्व नगर पंचायत क्षेत्रातील, सर्व सरकारी व खाजगी अंगणवाड्या, सर्व सरकारी व खाजगी शाळा,तसेच महाविद्यालय, आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे याच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्था दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगितले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रिडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला असून यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा समान, दुध, भाजीपाला, औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून)  दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी सांगितले.
कोणत्याही व्यक्तीस, संस्था, संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॅानिक किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर व दंडनिय कारवाई करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी यावेळी दिल्या.  
मागील 14 दिवसांत ज्या व्यक्तींनी करोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे, त्यांनी स्वत: याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 020-26127394 , एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष 020-27290066 व टोल फ्री क्रमांक 104 किंवा जिल्हा रुग्णालय नांदेड येथील नियंत्रण कक्ष 02462-249279 संपर्क साधावा.
करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे. त्यास मज्जाव, प्रतिबंध, अडथळा आणण्याविरुध्द दंडनिय कार्यवाही करण्यात येईल.  
0000


Saturday, March 14, 2020


रेतीचे उत्खनन, वाहतूकीच्या तक्रार निवारणासाठी
तक्रार निवारण कक्ष स्थापन
नांदेड, दि. 14 :- राज्य महसुल व वन विभाग मुंबई यांचा शासन निर्णय 3 जानेवारी 2018 मधील तरतुदीनुसार वाळु, रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी, निनावी तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारीसंदर्भात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. या तक्रार निवारण कक्षामध्ये 24 तास कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तक्रार निवारण कक्षासाठी मोबाईल क्रमांक 8007424242 व 8007434343 असे दोन क्रमांक देण्यात आले होते.
या दोन मोबाईल क्रमांकाच्या व्हाट्सअपवर तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या ठिकाणावरुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रत्यक्ष सुरु आहे. याबाबतचे फोटो किंवा व्हीडीओ (Live Photo & Video) अशाच तक्रारी अर्जदार यांनी व्हाट्सअपवर नोंदविण्यात यावी. तसेच तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारीचे स्वरुप ज्यामध्ये व स्थळाचे नाव, गावाचे नाव व तालुका इत्यादी व त्यासोबत आवश्य‍क ते पुरावे जोडुन पाठवावेत. सदर तक्रार संबंधीत अधिकारी यांच्याकडे पाठवुन 48 तासाच्या आत तक्रार निकाली काढुन संबंधीतास कळविण्याणत येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...