रेतीचे उत्खनन, वाहतूकीच्या तक्रार निवारणासाठी
तक्रार निवारण कक्ष स्थापन
नांदेड, दि. 14 :- राज्य
महसुल व वन विभाग मुंबई यांचा शासन निर्णय 3 जानेवारी 2018
मधील तरतुदीनुसार वाळु, रेतीचे अवैध उत्खनन व
वाहतुकीच्या तक्रारी, निनावी तक्रारीचे निवारण करण्यासाठी
तक्रार निवारण कक्ष करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारीसंदर्भात तक्रार निवारण कक्ष स्थापन
करण्यात येत आहेत. या तक्रार निवारण कक्षामध्ये 24 तास कर्मचारी यांच्या नियुक्त्या
करण्यात आल्या आहेत. तक्रार निवारण कक्षासाठी मोबाईल क्रमांक 8007424242 व 8007434343 असे दोन क्रमांक देण्यात आले होते.
या दोन मोबाईल क्रमांकाच्या व्हाट्सअपवर
तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या ठिकाणावरुन अवैध गौण खनिज
उत्खनन व वाहतुक प्रत्यक्ष सुरु आहे. याबाबतचे फोटो किंवा व्हीडीओ (Live Photo & Video) अशाच
तक्रारी अर्जदार यांनी व्हाट्सअपवर नोंदविण्यात यावी. तसेच तक्रारीच्या अनुषंगाने
तक्रारीचे स्वरुप ज्यामध्ये व स्थळाचे नाव, गावाचे नाव व
तालुका इत्यादी व त्यासोबत आवश्यक ते पुरावे जोडुन पाठवावेत.
सदर तक्रार संबंधीत अधिकारी यांच्याकडे पाठवुन 48 तासाच्या
आत तक्रार निकाली काढुन संबंधीतास कळविण्याणत येईल, असे
जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment