Saturday, March 14, 2020


 कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी
नागरिकांनी काळजी घ्यावी ; जिल्हा प्रशासन सुसज्ज
-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर  
            नांदेड दि. 14 :- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत जिल्हा प्रशासन सुसज्ज असून कोरोना संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करुन विषाणुंच्या संसर्गात वाढ होऊ न देता त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्‍यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक दत्‍तराम राठोड, जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक, शासकीय वैद्यकीय महावि‍द्यालय अधिष्‍ठाता डॉ. चंद्रकांत मस्‍के, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, जि.प. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी एम.शिंदे, डॉ.शं.च.शा.वै.म.नांदेड  वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्‍हाण, डॉ. शंकरराव चव्‍हाण वैद्यकीय महाविद्यालय डॉ.एस.आर.मोरे, बा.क. जि.प.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी एस.व्‍ही.शिंगणे, मनपा नगर सचिव तथा विधी अधिकारी संधू अजितपालसिंग,  जिल्‍हा महिला बाल कल्‍याण अधिकारी श्रीमती आर.पी.काळम, अन्‍न व औषध प्रशासन अधिकारी सहा.आयुक्‍त, टी.सी.बोरकर, जि.प. शिक्षणाधिकारी शाखा अधिकारी राजन रेड्डी, उपशिक्षणाधिकारी, डी. डी. सिरसाट, सहायक समाज कल्‍याण आयुक्‍त टी. एल. माळवदकर यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणुबाधीत रुग्‍ण आढळत आहेत. विमान प्रवासाव्‍दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्‍यामुळे हा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणे व विषाणुंचे संसर्गात वाढ होऊ न देता त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाय योजना आखल्या आहेत.
जिल्‍ह्यात आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा, 2005 लागु असल्याने Incident Commander  म्‍हणून जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. एन. आय. भोसीकर  9890130465 व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे 9970054408 यांना संनियंत्रक म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार प्रत्‍येक विभागाने आपल्‍या अधिनस्‍त अधिकारी, कर्मचारी यांना यांचेशी समन्‍वयाने व जिल्‍हा प्रशासन यांचेकडील आदेशानुसार पुढील प्रमाणे दर्शविलेली कामे पार पाडावीत असेही निर्देशीत केले.
प्रास्‍ताविकात निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगीतले की, मुख्‍यमंत्री महोदयांनी घेतलेली व्‍हीडीओ कॉन्‍फरन्स व औरंगाबाद विभागीय आयुक्‍त यांच्या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आलेल्‍या दिनांक 17 फेब्रुवारी, 2020 व दिनांक 09 मार्च, 2020 रोजीच्‍या बैठकीत दिलेल्‍या निर्देशाच्‍या अनुषंगाने करावयाच्‍या कार्यवाही बाबत आजची आढावा बैठक घेण्‍यात येत असल्‍याचे सांगीतले.   
गृह विभाग पोलीस अधिक्षक परदेशातून आलेल्‍या नागरीकांची माहिती हॉटेल मॅनेजर, नातेवाईक यांचेकडून प्राप्‍त करुन घेऊन जिल्‍हा रुग्‍णालयास कळविण्‍यात यावी. कोरोना विषाणु संसर्गाबाबत Social Media च्‍या  माध्‍यमातुन अफवा, गैरसमज पसरविणा-यावर योग्‍य ती कार्यवाही सायबरसेल मार्फत तसेच अफवावर नियंत्रण ठेवण्‍यात यावे. ज्‍या हॉटेलमध्‍ये विदेशी नागरीक व परदेशावरुन येणारे नपागरीक मुक्‍कामी असतील त्‍या ठिकाणी भेटी देऊन खात्री करण्‍यात यावी.  गर्दीच्‍या ठिकाणी आवश्‍यक प्रमाणावर स्‍वंयसेवी संस्‍थेच्‍या माध्‍यमातून जनजागृती करावी व त्‍यांचे सहकार्य घ्‍यावे. परदेशी नागरीक अथवा परदेशातुन प्रवास करुन आलेले भारतीय नागरीक या बाबत संबंधित पोलीस स्‍टेशन प्रभारी यांना IC यांना माहिती वेळोवेळी देण्‍यात याव्‍यात. शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करु नये यापासून परावृत्‍त करण्‍यात यावे. आपल्‍या अधिनस्‍त अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्‍यात यावे. जिल्‍हा रुग्‍णालयाशी समन्‍वय ठेवण्‍यात यावा. पोलीस विभागाचे नियंत्रण कक्षाचा फोन क्रमांक 02462-234720 असा आहे. पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 9689609999 असून दत्‍तराम राठोड अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक नांदेड भ्रमणध्‍वनी क्रमांक 7774077100 संपर्कासाठी असेल असे सांगीतले. नांदेड शहर व तालुक्‍यांमध्‍ये कोरोना विषाणुपासून संसर्ग रोगासंदर्भात संशयित रुग्‍णास ठेवण्‍यासाठी निश्चित करण्‍यात आलेल्‍या शाळा, कॉलेज, मंगल कार्यालय व इतर कुठलीही शासकीय, निमशासकीय इमारतीमध्‍ये ठेवण्‍यास विरोध करणाऱ्या नागरीकांना या संदर्भात सविस्‍तर माहिती देऊन त्‍यांना यापासून कुठलाही इतरांच्‍या आरोग्‍यावर परिणाम होत नसल्‍याचे सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्‍यात यावे, असे निर्देश देण्‍यात आले.
कोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपध्‍दती SOP तयार करण्‍यात यावा.   कारोना विषाणुवर उपाययोजना करण्‍यासाठी पुरेसा औषधी साठा, मास्‍क उपलब्‍धता, कारोना विषाणु संशयित रुग्‍ण आढळून आल्‍यास त्‍यांचेवर निदान व उपचार स्‍वॉप तपासणीस्‍तव पाठविण्‍यासाठीची सुविधा उपलब्ध आहे.  शासकीय व खाजगी सुसज्‍ज शहरात व तालुकास्‍तरावर दवाखान्‍याची माहिती काढण्‍यात यावी. कोरोना विषाणुचा संसर्गा बाबत आरोग्‍य विभागाने तयार केलेल्‍या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन, माहिती पुस्तिकांचे वितरण व प्रचार प्रसिध्‍दी करण्‍यात आली आहे. स्‍वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी व औषधीसाठ्यासह सुसज्‍ज तयार आहे, असे आरोग्य विभागाल सुचना दिल्या.  
कॉरटाईन आणि आयसोलेशन युनिट स्‍थापन करण्‍यात आले आहेत. वैद्यकीय महाविदयालय स्‍तरावर मास्‍क तयार करण्‍याची कार्यवाही सुरु आहे. महानगरपालिका-नगरपालिका नगरपरिषदा  कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्‍यावयाची दक्षता व काळजी या संदर्भात माहितीची जनजागृती करण्‍यात येत आहे. वॉर्डनिहाय स्‍वच्‍छता ठेवण्‍यात येत असून शहरातील केरकचरा साचणार नाही तसेच सार्वजनिक शौचालयाची स्‍वच्‍छता ठेवण्‍यात आली आहेत. नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहील यादृष्‍टीने नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. कार्यक्षेत्रातील रेल्‍वे परिसर, बसस्‍टॅण्‍ड, मॉल, चित्रपटगृहे/नाट्यगृहे, स्‍वयंचलित जिने, येथे स्‍वच्‍छता ठेवण्‍याबाबत सुचित केले. संशयित रुग्‍णासाठी स्‍वतंत्र अॅम्‍ब्‍युलन्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्‍यावयाची दक्षता व काळजी संदर्भात शहरातील दर्शनी भागात मोठे फलक लावण्‍यात आली आहेत.  
कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्‍यावयाची दक्षता व काळजी संदर्भात माहितीची जनजागृती करण्‍यात येत असून जिल्‍ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, पं.स. यांचे अधिनस्‍त आरोग्‍य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्‍यात यावे. शाळा सुरु होण्‍यापूर्वी एकत्रित प्रार्थना घेण्‍यात येऊ नये. परंतु वर्गामध्‍ये या रोगापासून संरक्षिततेच्‍या दृष्‍टीने हात धुणे, स्‍वच्‍छता पाळणे इ त्‍यादी बाबी सांगण्‍यात यावेत. शाळा संपल्‍यानंतर वर्गातील मुलांना गर्दी न करता सोडण्‍यात यावे. शाळेकडून कुठल्‍याही प्रकारच्‍या सहली, सांस्‍कृतीक कार्यक्रम आयोजित करण्‍यात येऊ नयेत. कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्‍यावयाची दक्षता व काळजी संदर्भात शहरातील दर्शनी भागात मोठे फलक लावण्‍यात यावेत, अशी सुचना जिल्हा परिषदेला देण्यात आली.
कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्‍यावयाची दक्षता व काळजी संदर्भात माहितीची जनजागृती करण्‍यात आले आहे. तालुका स्‍तरावर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, पं.स. यांची संयुक्‍त बैठकीव्‍दारे आवश्‍यक ते नियोजन करुन तालुकास्‍तरावर नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. तालुकास्‍तरावर विविध संस्‍था, संघटना व व्‍यक्‍तीकडून प्राप्‍त होणारी परदेशी नागरीकांची माहिती संकलीत करण्‍यात येवून जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जि.प.नांदेड यांचेकडे तात्‍काळ माहिती कळविण्‍यात येत आहे. तालुकास्‍तरावर संशयित रुग्‍ण आढळून आल्‍यास त्‍यांना त्‍या ठिकाणी निदान करणेसाठी मंगल कार्यालय किंवा शाळा खोलीची माहिती पाठविण्‍यात यावी. तालुक्‍यात कोणतेही सामाजिक कार्यक्रमापासून गर्दी होणार नाही, शाळेचे गॅदरीग होणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी. तसेच कुठल्‍याही प्रकारच्‍या अफवा पसरविल्‍या जाणार नाहीत व ज्‍यांनी अफवा पसरवत आहेत त्‍यांचेवर कायदेशिर कार्यवाही करण्‍यात यावी व तसा अहवाल सादर करावा. दिनांक 15 मार्च 2020 रोजी कोचिंग क्‍लासेस, सिनेमागृह व मंगल कार्यालयाचे व्‍यवस्‍थापक यांची बैठक ठेवण्‍यात यावी. जेणे करुन त्‍यांना कोरोना विषाणु पासून संसर्क रोगापासून बचाव करणे शक्‍य होईल.नांदेड शहरामध्‍ये तसेच तालुकास्‍तरावर रामनवमी व गुढी पाडवा निमित्‍त व इतर कार्यक्रमामुळे मिरवणुक काढण्‍यात येणार असल्‍यास त्‍यांचे संयोजकाशी चर्चा करुन त्‍यांना मिरवणुक न काढण्‍यासाठी परावृत्‍त करण्‍यात यावे अशी सुचना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्‍यात आली.
औषध विक्रेते यांनी मास्‍क विक्री जास्‍त भावाने करीत असल्‍यास, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणे इ.बाबी निदर्शनास आल्‍यास तात्‍काळ IC यांना माहिती देण्‍यात यावी व संबंधितावर कार्यवाही करावी. कोरोना विषाणुपासून संसर्ग रोगाबाबत जास्‍तीत जास्‍त दक्षता घेण्‍याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. औषध विक्रेताची बैठक घेण्‍यात येऊन मास्‍क ची विक्री एमआरपी रेटने विक्री करणे बाबत व मास्‍कचा साठा असतांना नसल्‍याचे सांगत असल्‍यास त्‍याबाबत खातरजमा करण्‍यात येऊन आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात यावी, अशी सुचना अन्‍न व औषध प्रशासन विभागाला दिली.
कोरोना विषाणुपासून संसर्ग झाल्‍याचे संशयित रुग्‍ण आढळून आल्‍यास  रुग्णांना ठेवण्‍यासाठी समाज कल्‍याण विभागाकडील निवासी शाळा व कॉलेज, सामाजिक न्‍याय भवन आहेत त्‍या उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात. यासाठी माहिती त्वरीत सादर करावी. माहूर, हदगाव, उमरी, नायगाव तालुक्‍यात निवासी शाळा आहेत. त्‍या उपलब्‍धतेचा अहवाल सादर करावा, याची दक्षता समाज कल्याण विभागाने घ्यावी.
कोरोना विषाणुपासून संसर्ग झाल्‍याचे संशयित रुग्‍णांना उपचारास्‍तव ठेवण्‍यासाठी आदिवासी विकास विभागाकडील शाळा, निवासी शाळा असल्‍यास याबाबतची माहिती प्राप्‍त करुन घेण्‍यात यावी असे निर्देश देण्‍यात आले. नांदेड क्‍लब, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्‍वीमिंग पुलावर येणा-या व्‍यक्‍तींना कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून बचाव होण्‍यासाठी प्रवेश बंदीचे आदेश त्वरीत काढण्यात यावेत. मा. मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी आदेशित केल्‍यानुसार कोरोना विषाणुपासून संसर्ग रोगाबाबत बचाव करणेस्‍तव येणा-या खर्चासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात यावा अशी विनंती अधिष्‍ठाता, शासकीय वैदयकीय महाविद्यलय नांदेड यांनी जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनी केली.  तसेच जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलेल्‍या निर्देशानुसार सर्व संबंधित विभागांनी कार्यवाही पार पाडावी. यामध्‍ये कुठल्‍याही प्रकारची निष्‍काळजीपणा व विलंब होणार नाही याची दक्षता घ्‍यावी, असेही निर्देश यावेळी दिले.  
000000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...