Friday, February 7, 2020


पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 7 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2 वा. संस्कृति संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्ष समारोप समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड. सायं 5.30 वा. नक्श मेन्स ॲव्हॅन्यु या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सन्मान प्रेस्टीज समोर रेल्वे स्टेशन रोड नांदेड. सायं 7 वा. धम्मपरिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- लहान ता. अर्धापूर जि. नांदेड.
रविवार 9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वा. अशोक चव्हाण चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम नांदेड. दुपारी 12.30 वा. अखंड शिवनाम सप्ताह व परम रहस्य पारायण समाप्ती सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- निवघा ता. मुदखेड जि. नांदेड. दुपारी 2 वा. मुदखेड नगरपालिका आढावा बैठक. दुपारी 3 वा. मुदखेड नगरपालिका अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- नगरपालिका मुदखेड मागील प्रांगण मुदखेड. सायं 4 वा. अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव. स्थळ शासकीय विश्रामगृह मुदखेड.
00000


महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका
नांदेड दि. 7 :-जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या मार्फत विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी ग्रंथालय विभागामध्ये प्रवेदेणे सुरु आहे. या ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध असुन सर्व प्रकारची वर्तमानपत्रे वाचनासाठी  व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना स्वंतत्र्य स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था आहे. त्यासाठी अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे चालु असुन स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिला उमेदवारांनी शासनाच्या या मोफत अभ्यासिकेचा जास्तीतजास्त लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन प्र. सो. खंदारे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन  केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000

Thursday, February 6, 2020


राष्ट्रीय लोकअदालतीचे
जिल्ह्यात शनिवारी आयोजन
नांदेड दि. 6 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी मो. अ. दावा. , भुसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बँकाची प्रकरणे आदी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ आणि विविध कंपनीचे अधिकारी, भुसंपादन अधिकारी, मनपा, महसूल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता
देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 6 :-  महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाण राहील.
शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.05 वा. मोटारीने परभणीकडे प्रयाण. सायं 4.30 वा. परभणी येथून मोटारीने नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं 4.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

Wednesday, February 5, 2020


अनुसूचित जातींच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना
90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजना
अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत
नांदेड दि. 6 :-  अनुसूचित जातींच्या स्वयंसाहय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण मूळ कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे प्रस्तुत शाखेस 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.    
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे  अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाकडून यापूर्वीच दोन वेळेस सर्व बचत गटांना त्रुटी पूर्ततेची संधी देण्यात आली होती. ज्या काही बचतगटांनी त्रुटीची पूर्तता अद्याप पर्यंत केली नाही अशा बचत गटांची  यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे.
बचतगटांनी  त्रुटींची पूर्तता करण्यासाठी  नांदेड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ज्या बचत गटांनी त्रुटी पूर्तता करावयाची राहिली आहे त्या सर्व बचत गटांनी 7 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. मुदतीनंतर आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग नसेल तसेच आपला कुठलाही दावा, तक्रार किंवा विनंती मान्य करण्यात येणार नाही.      
00000



दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन
नांदेड, दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता 12 वीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860212898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000


अखिल भारतीय व्यवसाय
परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 6 :-  अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 110 वी प्रक्रिया (शिकाउ उमेदवारी योजना) गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली आहे.  या परिक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क 6 ते 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीत भरुन आस्थापनेमार्फत बी. टी. आर. आय. विभागात विहित कालमर्यादेत सादर करावे. ऑनलाईन परिक्षा 20 ते 22 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बी. टी. आर. आय. केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे क. प्र. सल्लागार एस. एस. ठक्के (भ्रमणध्वनी क्र. 9420541404) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे. 
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...