Monday, February 11, 2019

टंचाईग्रस्त गावांना दिलासा
देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
-         पाणी पुरवठा राज्यमंत्री खोत  
नांदेड, दि. 11 :- राज्य शासनाने
 
दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून टंचाईग्रस्त गावांना मदत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, अशी ग्वाही राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
बिलोली व देगलूर उपविभागातील कृषि, पाणीपुरवठा व दुष्काळ परिस्थितीचा आढावा राज्यमंत्री श्री. खोत यांनी बिलोली पंचायत समिती सभागृहात आज घेतला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मिनलताई खतगावकर, पंचायत समिती सभापती श्री बोधणे, विशेषकार्य अधिकारी मधु गिरगावकर, विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तहसिलदार विक्रम राजपुत, अरविंद बोळगे, सुरेखा नांदे, अतुल जटाळे, राजेश लांडगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, टंचाई काळात गावातील माणसाला पाण्याबरोबर जनावराला चारा व हाताला कामाची गरज असते. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपल्यास्तरावर निर्णय घेऊन एकोप्याने कामे त्वरीत पूर्ण करावीत. टंचाई काळात उपाय योजनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा व विभागस्तरावर दिले आहेत. पाणी पातळी घटलेल्या गावातील पिण्याचे प्रश्न सुटतील असे प्रस्ताव त्वरीत तयार करावेत व जुन्या कामाचे दुरुस्ती प्रस्तावाला लागणारा निधी दिला जाईल. बोगस कामे केलेल्या पाणी पुरवठा कंत्राटदारांची यादी करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी. पाणी पुरवठा योजनेपासून गावे वंचीत राहणार नाहीत तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी गावपातळीवर होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे. दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी बिलोली व देगलूर उपविभागातील पाणी पुरवठा प्रश्नासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कृषि, पाणी पुरवठ्यासह विविध विषयांवर आमदार सुभाष साबणे व आमदार राम पाटील रातोळीकर यांनी चर्चा करुन उपयुक्त सुचना केल्या.
बैठकीस विविध गावातील सरपंच, पदाधिकारी, नायब तहसिलदार संजय नागमवाड, ओमप्रकाश गोंड, पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक शुभांगी गोंड, उपअभियंता पाणी पुरवठा श्री. गायकवाड, वनअधिकारी कोळी, तालुका कृषि अधिकारी घुगे, शितोळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागेश लखमावाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री पवार यांचेसह इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
000000

पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना
देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार  
-         कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत  
नांदेड, दि. 11 :- शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतली असून या माध्यमातून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार असल्याचे राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 
संस्कृति संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2019 चे कृषि विभाग नांदेड व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शेतकरी व महिला मेळाव्याचे आयोजन शारदानगर सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वसुंधरा सभागृह मैदानावर केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. खोत यांचे हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, विशेषकार्य अधिकारी मधु गिरगावकर, रयतक्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे, तहसिलदार विक्रम राजपुत, विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, विभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, जिल्हा रेशीम अधिकारी पुंडलिक नरवाडे, तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंगिनी सरंबेकर, माविमचे प्रकल्प संचालक चंदनसिंह राठोड उपस्थित होते.
दुष्काळात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेती शिवारात जावून काम पाहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेव असल्याचे नमूद करुन राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले, शेतकरी व नागरिकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयाची राज्यात चांगली अंमलबजावणी होत आहे. शेतकऱ्यांचे तूर, हरभरा खरेदी व बोंडअळीचे पैसे जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीत नवीन तंत्र आवश्यक असून कृषि विज्ञान केंद्र हे शेतीचा दवाखाणा असून बदलत्या वातावरणात पिकाच्या निवडीसाठी विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून केंद्राचे काम महत्वाचे आहे. त्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. मागील 60 वर्षापासून ही संस्था शिक्षणासह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
            आमदार साबणे यांनी येथील संस्था शेतकऱ्यांसाठी एकरूप होऊन काम करीत असल्याचे म्हणाले. संस्थेचे चेअरमन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हिताची जाणीव असलेले राज्यमंत्री खोत यांची ओळख असून राज्य सरकार वंचितासाठी चांगले काम करत असल्याचे नमूद केले.
सुरुवातीला राज्यमंत्री श्री. खोत यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट देऊन पीकशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून पिकांची माहिती घेतली. त्यानंतर केंद्रातील कृषि निविष्टा विक्री केंद्र, प्ररीक्षण प्रयोगशाळेची पाहणी केली.    
यावेळी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका व बियाणांचे वाटप करण्यात आले. महिला उद्योजक श्रीमती सीताबाई मोहिते व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे यांनी बचत गट व शेतकरी महिलांना  मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन माधुरी देवणवार तर आभार व्यंकट शिंदे यांनी मानले. या परिसरात कृषि अवजारे व शेतीपुरक उत्पादने, माती नमुना, कीड व्यवस्थापन, रोपवाटिका आदी विषयी माहिती तसेच विक्रीचे दालने उभी आहेत. याठिकाणी शेतकरी, महिला, परिसरतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
000000

Saturday, February 9, 2019


हमीभावाने तूर खरेदी नोंदणी सुरु
नांदेड, दि. 9 :-  केंद्र शासनाचे किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सहा ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.
नांदेड तालुक्यात नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था : कृषि उत्पन्न बाजार समिती संगणक विभाग नवामोंढा नांदेड. मुखेड- मुखेड तालुका खरेदी विक्री संघ संस्था : तालुका खरेदी विक्री संघ मुखेड यांचे कार्यालय. देगलूर- पूर्वारेश्वर ॲग्रो प्रोड्यूस कं. लि. करडखेड संस्था : आर्य समाज मंदिर रोड जुनी तहसिल जवळ देगलूर. भोकर- भोकर तालुका खरेदी विक्री संघ संस्था : खरेदी विक्री संघ कार्यालय भोकर. नायगाव- कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव संस्था : कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव कार्यालय. किनवट- तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट : कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट कार्यालय हे नोंदणीचे ठिकाण राहिल.
शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीसाठी येतांना सोबत ऑनलाईन पीकपेरा नोदं असलेला सात/बारा आधार कार्ड झेरॉक्स व आधार लिंक असलेल्या बँक पासबूकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
0000

 कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 11 फेब्रुवारी 2019 रोजी हैद्राबाद (तेलंगणा राज्य) येथून मोटारीने सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह सगरोळी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आयोजित कृषि तंत्रज्ञान महोत्सव जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- सगरोळी ता. बिलोली. दुपारी 1.45 वा. सगरोळी येथून मोटारीने बिलोलीकडे प्रयाण. दुपारी 2 वा. कृषि, पणन व पाणीपुरवठा विभाग व दुष्काळ परिस्थितीबाबत देगलूर व बिलोली उपविभागाची आढावा बैठक. स्थळ- उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालय बिलोली. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथून मोटारीने मांजरम ता. नायगावकडे प्रयाण. सायं 4 वा. रयतक्रांती संघटना शाखा उद्घाटन कार्यक्रम. स्थळ- मांजरम ता. नायगाव. सायं 5 वा. मांजरम गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा व भव्य शेतकरी मेळावा. स्थळ- मांजरम ता. नायगाव. रात्री 8 वा. मांजरम येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
0000
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
मंत्री गिरीष महाजन यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
रविवार 10 फेब्रुवारी 2019 मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.05 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. हिंगोली येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण करतील.

0000000

Friday, February 8, 2019


मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा ;  
आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 8 :- प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेऊ येत आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी याबाबत सखोल माहिती घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिपाली मोतीयेळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागू शकते. याकाळात आयोगाने दिलेल्या निर्देशाचे योग्य पालन करुन निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, भयमुक्त, पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. निवडणूक आयोगाने दिलेली आवश्यक माहिती यंत्रणेला सोप्या शब्दात समजेल अशी दिली जाणार आहे. मतदानासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर आता होणार असून मतदारांचे नाव तपासण्यासाठी विविध माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याच्या स्ट्रॉग रुमची दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करुन त्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. मागील निवडणुकांचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सज्ज राहून काम केले पाहिजे, अशीही सूचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिली. 
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पाटील म्हणाले, निवडणूक काळात आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करतांना सर्व बाबी तपासून कराव्यात. निवडणुकीची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत होण्यासाठी आयोगाने दिलेले निर्देश चांगल्या प्रकारे समजून घेणे महत्वाचे आहे. आवश्यक त्या सुविधांबाबत माहिती घेऊन व्यवस्था केल्यास निवडणूक परिस्थिती चांगली हाताळता येते. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निवडणुका पारदर्शक चांगल्या पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे नाव चांगले राहील असे काम सर्वांना करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री जाधव यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देऊन गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कार्यवाही करावी. तसेच शस्त्र परवाना धारकांनी नियमाचे पालन करावे. याकाळात अवैध कामे होणार नाहीत याची काळजी घेऊन मतदान प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे सांगितले.  
आयोगाकडून निवडणूक संदर्भात वेळोवळी आढावा घेतला जात असून मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही यासह मतदार जागृतीसाठी उपक्रम, आचारसंहिता पथक, मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रॅम, मतदारांना सुविधा, टेलीकॉम कनेक्टीव्हीटी, विद्युत, पिण्याचे पाणी, फर्निचर व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था, वाहन, मतमोजणी केंद्र, निरीक्षकांसाठी सुविधा, विश्रामगृहे, हेलीपॅड, सभा मैदानाची माहिती यासह विविध विषयांवर चर्चा करुन उपाययोजनांबाबत संबंधितांना निर्देश व जबाबदारी देण्यात आली.  
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती मोतियेळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील व्यवस्थेबाबत माहिती संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी पोलीस, महसूल अधिकारी यांचेसह संबंधीत विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000000


Thursday, February 7, 2019

हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 7 :-जिल्हयात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस.जी 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. मररोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी  झाडे उपटुन नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी.  सुखदेव यांनी केले आहे.
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...