Saturday, November 4, 2017

"राजे यशवंतराव होळकर महामेष" योजनेसाठी
15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 5 :- पशुसंवर्धन विभागामार्फत मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी "राजे यशवंतराव होळकर महामेष" या राज्यस्तरीय योजनेसाठी बुधवार 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत सायं. 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज http://mahamesh.in/schemeinfo.aspx या संकेतस्थळावर भरता येणार आहे. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची पावती संबंधीत तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी वि. पंचायत समिती यांचेकडे सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.  
ही योजना सन 2017-18 साठी मेंढी पालन करणाऱ्या भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव व नांदेड ही तालुके वगळून इतर तालुक्यातील पात्र शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. यासाठी कायमस्वरुपी एका ठिकाणी राहुन मेंढी पालन करणारे व स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करणारे असे दोन्ही प्रकारचे लाभार्थी पात्र राहतील. भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना, पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणुन प्राधान्य देण्यात येईल. मेंढीपालन करण्याबाबत स्थायी व स्थलांतरीत याबाबत कार्यक्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अपत्य दाखला, प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
0000000


Friday, November 3, 2017

वाचनाशी एकरुपता देते वेगळीच अनुभूती
--- नयन बाराहाते
नांदेड, दि. 3:- वाचन करतांना तल्लीन होऊन वाचना-यास आणि जे आपण वाचतो त्यात तेवढया कमालीची ताकद असल्यास त्यातील वातावरणाचा आपल्या सभोवती प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. एकदंरीत वाचनाशी एकरुपता ठेवल्यास वेगळीच अनुभूती होत असल्याचे प्रतिपादन चित्रकार नयन बाराहाते यांनी केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेडच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.
जेष्ठ साहित्यिक डॉ.भगवान अंजनीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कथाकार मधुकर धर्मापुरीकर,जेष्ठ साहित्यिक डॉ.केशव देशमुख,प्रकाशक दत्ता डांगे,संपादक राम शेवडीकर,गजलकार बापू दासरी,निवेदक देवदत्त्‍ साने,जेष्ठ कवी महेश मोरे,साहित्यिक दिलीप पाध्ये,कवी अमृत तेलंग यांची उपस्थिती होती.
दत्ता डांगे यांनी दिवाळी अंक मराठी साहित्याचे वैभव असून प्रत्येक वाचकांनी दिवाळी अंक आवर्जून वाचावयास हवे असे सांगितले. देवदत्त साने यांनी काही ठराविक दिवाळी अंकामधील कोणत्या विषयावरील लिखाण वाचकांनी वेळात वेळ काढून वाचावे या बाबत त्यांनी सागितले.बापू दासरी व महेश मोरे यांनी मनोगता सोबत आपल्या कवितेतून उपस्थितीतांशी संवाद साधला.कथाकार मधुकर धर्मापुरीकर यांनी आपल्या मनोगतातून दिवाळी अंकांमध्ये  आपल्या जिल्हयातील साहित्यिकांचा सहभाग लक्षणीय असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतातून डॉ.भगवान अंजनीकर यांनी दिवाळी अंकाच्या समृध्दशाली परंपरेचा उल्लेख  करुन विविध विषयाला  वाहिलेले दिवाळी अंक वाचकांसाठी दिवाळी पूरतीच नव्हे तर वर्षभर पुरणारी बौध्दीक मेजवानी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी तर सुत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक प्रताप सुर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमास ग्रंथपाल आरती कोकूलवार,यशवंत राजगोरे,रामगढिया,ॲड श्रीनिवास शेजूळे,गजानन कळके, संजय पाटिल,भानूदास पवळे,मुक्तीराम शेळके,बालाजी कदम,नवनाथ कदम  इ.सह विदयार्थी व वाचक उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय कर्वे,अजय वटटमवार,कोडिंबा गाडेवाड यांनी सहकार्य केले.             
****  


संस्थेच्या विश्वस्तांना सुचना
नांदेड, दि. 3:- सर्व संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, संस्था स्थापन केल्यापासून ज्या संस्थांची हिशोब पत्रके (ऑडिट रिपोर्ट) दाखल करण्यात आलेली नाहीत. त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी कार्यालयातर्फे यादी तयार करण्यात आलेली असून सदरची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. तरी सर्व संबंधित संस्थेच्या विश्वस्तांना सुचित करण्यात येते की, त्यांनी कार्यालयातील प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीचे निरीक्षण करुन घ्यावे. तसेच आपल्या संस्थेची नोंदणी का रद्द करण्यात येवू नये. या बाबतचा खुलासा खालील नेमून दिलेल्या तालुक्याच्या दिवशी व कार्यालयातील न्याय कक्षात प्रत्यक्ष हजर राहून अथवा वकीलामार्फत सकाळी ठिक 11-00 वाजता सादर करावा.
कार्यालयात वरील ठिकाणी सुनावणीच्या वेळी आपल्या सबळ पुराव्यासह आपले म्हणने मांडण्यासठी सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, अन्यथा आपण गैरहजर राहिल्यास आपले कांहीही म्हणने नाही, असे गृहीत धरुन आपली संस्था नोंदणी रद्द करण्यासंबंधिची नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे नांदेड विभागाचे सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी कळविले आहे.

****
 कंधार येथे शैक्षणिक परिसरात तंबाखू जप्त करून केली होळी
             
        
नांदेड, दि. 3:-  तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे हा गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय, कंधार येथे अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये सदरील परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या निदर्शनास आले.  तेंव्हा सदरील विक्रेते हे प्राप्त तक्रारीनुसार कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. करिता कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकामार्फत सदरील तंबाखू विक्रेते यांच्याकडून प्रत्येकी २०० प्रमाणे एकूण १४०० रुपये इतका दंड आकारण्यात आला तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. उपस्थित जनसमुदाय यांच्यासमक्ष जनजागृती करून सदर जप्त केलेला साठ्याची होळी करण्यात आली.  सदरील पथकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप  बोरसे, डॉ. राहुल अन्नापुरे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक  प्रकाश आहेर व स्थानिक पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक  एस. एस. भारती व सहकारी होते. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास १८००११०४५६ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा शल्य चकित्सक डॉ. बी.पी.कदम यांनी केले आहे.

****  
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
र‍विवारी डॉ. आशालता गुट्टे यांचे व्याख्यान
नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार 5 नोव्हेंबर 2017 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सायं. 4.30 वा. हे शिबीर होणार आहे. यावेळी प्रा. डॉ. आशालता गुट्टे या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात "मराठी व्याकरणाची तयारी" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले आहे.

00000
अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना
90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरची योजना
नांदेड दि. 3 :- अनुसुचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरची योजना कार्यान्वित आहे. अटी शर्ती व शासन निर्णयातील तरतुदींची पुर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचतगटांनी परिपूर्ण अर्ज संपुर्ण कागदपत्रांसह सोमवार 20 नोव्हेंबर 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर, नांदेड  येथे अर्ज सादर करावीत, असे अवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. तसेच शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. बचत गटांतील  सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असावेत, तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. सक्षम अधिकाऱ्यानी दिलेले सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र असावेत. बचत गटाची नोंदणी सक्षम अधिकाऱ्याकडून केलेली असावी. बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे व त्या गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे त्या खात्यास सलग्न केलेले असावेत. सर्व सदस्यांची बँकेने प्रमाणित केलेली यादी असावी. या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांची निवड झाल्यानंतर बचतगटाने Ministry of Agriculture and Farmers  Welfare Deparment of Agriculture, Co- operation and Farmers Welfare. यांनी निर्धारित केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व  त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इंस्टीटयूट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावीत. तसेच निवड झालेल्या लाभार्थी बचत गटाने परिमाणानुसार मान्यता प्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर, व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपर्यंत खरेदी करणे आवशक आहे. मीनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा  3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. स्वयंसाह्यता बचतगटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतींच्या 90 टक्के ( कमाल 3 लाख 15 हजार रुपये ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. एकूण किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरण्याचे हमीपत्र व गटातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे हमी पत्र अर्जासोबत जोडावे. आरटीओ कार्यालयातील नोंदणी बचत गटाने स्वतः करून घेण्याचे हमीपत्र शंभर रुपये बॉंडवर असावे. इतर अटीं व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयाच्या सुचना फलकावर डकविण्यात आलेला आहे.
यापूर्वी निवड न झालेल्या बचत गटानीसुद्धा नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. यापुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही अवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

00000
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 3 :- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती , शिक्षण फी, निर्वाह भत्ता , विद्यावेतने विषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी पोर्टलमार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सुचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल.
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात आणि शिक्षण फी-इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. परंतू आता देय होणारी वित्तीय लाभाची सर्व रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पुढील योजना ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क परीक्षा प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ( इयत्ता अकरावी , बारावी ), राज्य शासनाची मॅट्रिकपुर्व शिक्षण फी परिक्षा फी प्रतीपुर्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी , माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने कोअर बँकीग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, दहावी , बारावी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण रहिवास दाखल , उत्पन्न दाखला , प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स , आधार कार्ड , दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधा पत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी : - आपण कोणत्याही ब्राऊझरचा वापर करुन ( उदा. internet Explorer (I.E) Google Chrome / Mozilla Firefox etc.) , https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जावून नवीन नोंदणी बटनावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांने ( ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी e-scholarship पार्टलवर नोंदणी केली होती त्यांनी सुध्दा) mahadbt पार्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. तयासाठी आधार कार्ड आहे ? असेल तर होय वर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी हा पर्याय निवडा , वैध आधार क्रमांका टाकल्यानंतर ओटीपी पाठवा बटन क्लिक करा, मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी ( वन टाईम पासवर्ड) टाकून पडताळणी करा हे बटन क्लिक करावे. उपलब्ध विंडोमध्ये नाव, जन्म दिनांक , फोन नंबर , पत्ता आपोआप दिसेल, आधार क्रमांक नसल्यास आधार कार्ड नाही हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व  कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणी अर्जाच्या विंडोमधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा :- महाडीबीटी पार्टलवर लॉगइन करण्यासाठी सिलेक्ट युजरनेममध्ये जावून विद्यार्थी हा पर्याय निवडा, युजर नेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा, लॉगइन झाल्यावर विंडोमधील योजना तपशील यावर क्लिक करा. त्यानंतर विभागवार योजना अपाण पाहू व निवडू शकाल  आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर पहा क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना ( मॅट्रीकपूर्ण / मॅट्रीकात्तर ) साठी आपण पात्र आहात त्यांची खात्री करा व पर्याय क्लिक करा. ( उदा. शालेय विद्यार्थ्यांनी मॅट्रीकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर हा पर्याय निवडावा ). आवश्यक ती सर्व माहिती शाळा, महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. ( रहिवास दाखला, उत्पन्न दाखला, एसएससी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक , आधार क्रमांक इ. ) . अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेजमधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी / पालकाना काही अडचणी असल्यास त्यानी 18001025311 या टोल फ्री वर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.
महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबइटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम घेवू नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे , कोअर बँकिग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यलयाचे नाव , महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पार्टलवर मॅप करण्यासाठी आपआपल्या आयुक्तालयास / संचालनालयास / विद्यापीठास / परिषदेस सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्याची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कालावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल. त्यासाठी त्यामध्ये ज्या प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

****

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...