Saturday, December 31, 2016

माजी सैनिकी मुलांचे वसतीगृहात
कंत्राटी अधीक्षक पदासाठी भरती
नांदेड, दि. 31 :-  माजी सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी नांदेड येथे कंत्राटी पद्धतीने वसतीगृह अधिक्षक पद 12 हजार 465 या मानधनावर भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता जेसीओ (सुभेदार, नायब सुभेदार). शारिरीकदृष्टया सुदृढ असावा. वसतीगृहामध्ये राहण्याकरीता स्वतंत्र क्वार्टर उपलब्ध. इच्छूक माजी सैनिकांनी या पदाकरीता मंगळवार 10 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे.

0000000
दिवंगत सेवारत सैनिकाच्या
पत्नीस 75 हजार रुपयांची मदत
नांदेड, दि. 31 :-  जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शैलाळी येथील रहिवासी दिवंगत सैनिक चंद्रकांत केंद्रे यांचा सैन्य सेवेत असतांना मृत्यू झाला.  त्यांनी 323 फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) मध्ये 12 वर्ष सेवा केली होती. त्यांच्यापत्नीस सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून 75 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आले. आर्थिक मदतीचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सादर करण्यात आले होते. त्यानुसार 75 हजार रुपयाचा धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती मिनाक्षी चंद्रकांत केंद्रे यांना निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी वडील रघुनाथ केंद्रे, कल्याण संघटक कमलाकर शेटे  हे उपस्थित होते.

000000
संजय गांधी निराधार अनुदान
योजना समितीची सोमवारी बैठक
नांदेड, दि. 31 :-  नांदेड शहर मनपा हद्दीतील संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना या विशेष सहाय्य योजने अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी संगायो समिती अध्यक्ष जम्मूसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोमवार 2 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. संबंधीत अर्जदारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बी. एस. मोरे, तहलिसदार संगायो शहर नांदेड यांनी केले आहे.

000000
अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी मंगळवारी
पोलिस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण निवड चाचणी
नांदेड, दि. 31 :- पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजामधील इच्छूक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलिस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी अल्पसंख्याक समाजामधील उमेदवारांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत असून या संदर्भातील निवड चाचणी मंगळवार 3 जानेवारी 2017 रोजी जिल्हा मुख्यालयातील पोलिस कवायत मैदान, नांदेड येथे होणार आहे. त्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील- प्रशिक्षणार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयापेक्षा जास्त नसल्याचा दाखला. उमेदवार अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि ज्यु समाजातील असावा. उमेदवार 18 ते 28 या वयोगटातील असावा. उमेदवाराची उंची पुरुष 165 सेंमी व महिला 155 सेंमी, छाती पुरुष 79 सेंमी फुगवून 84 सेंमी असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारानी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारिरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
प्रशिक्षणाचे स्वरुप- निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने प्रशिक्षण दिले जाईल. या दरम्यान दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासाचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान 1 हजार 500 प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपाहर देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थींना गणवेश साहित्यासाठी गणवेश, बूट, मोजे, बनियन इत्यादी एक हजार रुपये एवढे एकरकमी अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. इच्छूक उमेदवारांनी मंगळवार 3 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10 वा.  अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतींसह जिल्हा मुख्यालयातील पोलिस कवायत मैदान येथे उपस्थित रहावे.
00000000


सुक्ष्म सिंचन योजनेत अनु.जाती, जमातीच्या
शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 31 :-   प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन 2016-17 साठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज ऑनलाईन www.mahaagri.gov.in व www.mahaethibak.gov.in वर भरावयाचे आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचे असल्यास त्यांनी आँनलाईन अर्ज भरुन घ्यावेत तसेच भरलेल्या अर्जाची एक प्रत सातबारा उतारा, 8 अ उतारा, आरटीजीएसची सुविधा असलेल्या बँकेतील खाते पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे. या कार्यक्रमांतर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 60 टक्के व सर्वसाधारण भुधारकांसाठी 45 टक्के तर अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 45 टक्के व सर्वसाधारण भुधारकासठी 35 टक्के अनुदान  देय आहे. या योजनेअंतर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऊस, कापूस यासारखी सर्व नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळींब यासारखी सर्व फळपिके, याशिवाय सर्व कडधान्य, तृणधान्य, गळीत पिके तसेच हळद, आले इत्यादी पिकांसाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुक्ष्म सिंचन पद्धतीला अनुदान अनुज्ञेय आहे. या योजनेचा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या लाभार्थीने लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000
“रुग्णवाहिकांना वाट द्या आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’
या मोहिमेचे उदघाटन
नांदेड दि. 31 :-  “रुग्णवाहिकांना वाट दया आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’ या मोहिमेचे उदघाटन वैधमापन शास्त्र विभाग, पेट्रोलपंप असोसिएशन, फामफेडा व राधी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने आज नॅशनल एक्स सर्व्हिस को-ऑ. गॅरेज लि. हिंदूस्थान पेट्रोल पंप, 141 मंत्रालय येथे करण्यात आले.
यावेळी अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरिक्षक तथा नियंत्रक, वैध रुग्णांना अती तातडी व गंभीर प्रसंगी रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेत पोहचविणे गरजेचे असते. प्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान असल्याने रुग्णवाहीकांना मोकळी वाट देण्याच्या चळवळीमध्ये प्रत्येक वाहन चालकाने सहभागी होणे गरजेचे आहे.  या करिता रुग्णवाहिकांना वाट दया, या मोहिमेंअर्तगत पत्रके तसेच पेट्रोलपंपवर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले. यावेळी एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑईल कंपनीचे पदाधिकारी म्हणाले की, राधी फाऊंडेशनच्या या समाजपयोगी कार्यामध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑईल यांनी पेट्रोलपंपवर “रुगवाहिकांना वाट दया” याविषयाचे फलक लावण्यास सहमती दीली आहे. या उपक्रमामध्ये सर्वच लोकांना सहभागी होण्यासाठी फेसबूकवर “Give way to Ambulance” यापेजची निर्मिती केली असून टवीटरव्दारे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अशी माहिती संजीव कबरे, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नांदेड यांनी दिली.

000000
सोलापूर येथे पाच फेब्रुवारीपासून सैन्यभरती
नांदेड जिल्ह्यातील इच्छुकांनी संधी
नांदेड, दि. 31:-  सोल्जर नर्सींग असिस्टंट AMC व सोल्जर ड्रेसर RVC  या पदासाठी  सैन्यभरतीचे आयोजन  सोलापूर  SRPF कवायत मैदान सोरेगांव  येथे 5 फेब्रुवारी ते 18  फेब्रुवारी 2017 दरम्यान आयोजीत  करण्यात आले आहे.
  या भरतीसाठी  ऑनलाईन अर्ज  www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर शुक्रवार 20 जानेवारी 2016 पर्यंत  भरणे आवश्यक आहे.      त्यासाठीची पात्रता  -  12  विज्ञान  शाखेत  फिजीक्स,  केमीस्ट्री,  बॉयलॉजी व इंग्रजी विषयात  सरासरी 50 टक्के व  प्रत्येक विषयात  40 टक्के गूण असणे  आवश्यक आहे.  तसेच  उमेदवाराची   उंची 167 सेमी,  वजन  50 किग्रॅ,   छाती  77-82  सेमी, तसेच  वय  17-1/2  ते 23 वर्षे या दरम्यान असावे .   ही सैन्य भरती   नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धूळे, नंदूरबार, औरंगाबाद, बुलढाणा व जळगाव  या  जिल्हयांसाठी  आहे.    त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी  पात्रतेसंबधी संकेतस्थळावरून तपशीलवार माहीती घेवून  ऑन लाईन अर्ज भरावेत. यामध्ये,  नांदेड जिल्हयातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण   अधिकारी  नांदेड   मेजर  व्ही व्ही पटवारी  यांनी  केले आहे.

000000

दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांचा आढाव...