Saturday, December 31, 2016

सुक्ष्म सिंचन योजनेत अनु.जाती, जमातीच्या
शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 31 :-   प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन 2016-17 साठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज ऑनलाईन www.mahaagri.gov.in www.mahaethibak.gov.in वर भरावयाचे आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचे असल्यास त्यांनी आँनलाईन अर्ज भरुन घ्यावेत तसेच भरलेल्या अर्जाची एक प्रत सातबारा उतारा, 8 अ उतारा, आरटीजीएसची सुविधा असलेल्या बँकेतील खाते पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे. या कार्यक्रमांतर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 60 टक्के व सर्वसाधारण भुधारकांसाठी 45 टक्के तर अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 45 टक्के व सर्वसाधारण भुधारकासठी 35 टक्के अनुदान  देय आहे. या योजनेअंतर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऊस, कापूस यासारखी सर्व नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळींब यासारखी सर्व फळपिके, याशिवाय सर्व कडधान्य, तृणधान्य, गळीत पिके तसेच हळद, आले इत्यादी पिकांसाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुक्ष्म सिंचन पद्धतीला अनुदान अनुज्ञेय आहे. या योजनेचा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या लाभार्थीने लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...