Saturday, December 31, 2016

रब्बी हंगाम पिक विमा योजनेस
10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
नांदेड , दि. 31 - प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम 2016-17 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेअंतगत रब्बी हंगाम 2016-17 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभागाची अंतिम मुदत ज्या पिकांकरिता दि. 31 डिसेंबर, 2016 अशी होती. फक्त त्याच पिकांसाठी (शासन निर्णय क्र. प्रपीवियो 2016/ प्र.क्र.326/11-अे, दिनांक 31 डिसेंबर 2016 अन्वये) शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढवून ती दिनांक 10 जानेवारी , 2017 अशी करण्यात आली आहे, असे कृषि विभागाने कळविले आहे.
अधिक माहितीसाठी नॅशनल इन्शुरन्स कं.लि. यांचे जिल्हानिहाय प्रतिनिधी तसेच संबंधित विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा. नॅशनल इन्शुरन्स कं.लि. यांचे जिल्हानिहाय प्रतिनिधींचे दुरध्वनीचा तपशील उपरोक्त कार्यालयात पहावयास मिळतील. शेतकऱ्यांनी पिक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 31 59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे 11 ते 13 जानेवारी दरम्यान ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजन जेष्ठ शास्त्रज्...