राष्ट्रीय
ग्राहक दिन उत्साहात साजरा
तज्ज्ञांची
व्याख्याने, प्रदर्शनाद्वारे माहिती
नांदेड, दि.
31 :-
ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायदा यांच्या विषयी जनजागृती होण्याच्या
उद्देशाने दरवर्षी प्रमाणे गुरुवारी (29) रोजी जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन
तहसिल कार्यालय नांदेड येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा
पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी अखिल
भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य डॉ. विजय लाड, प्रांत
उपाध्यक्ष डॉ. बा. दा. जोशी, विभागीय संघटक आर. एस. कमटलवार, सहायक जिल्हा पुरवठा
अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे, तहसिलदार पी. के. ठाकूर, अरविंद बिडवई, सुषमा
माढेकर, ॲड. शलाका ढमढेरे, डॉ. सखाराम भोसकर, सुनिल रामदासे, नारायण पांचाळ,
बुलबुले, श्रीमती संघारेड्डीकर, लता केसराळे, रमाकांत घोणसीकर, प्रा. संध्या
खरवडकर, सौ. शीरपुरकर, काशिनाथ येसगे, श्रीमती कविता जोशी उपस्थित होते.
ग्राहकांना
सेवा पुरविण्यास नांदेड प्रशासन राज्यात अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा पुरवठा
अधिकारी वेणीकर यांनी यावेळी दिली. ते
पुढे म्हणाले की, जिल्ह्यात दोन गावांमध्ये शिधावाटप केंद्रावर पीओसी मशीनद्वारे करण्यात
येत असून, त्याद्वारे नांदेड जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वामी विवेकानंद आणि भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू
माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
ॲड. राजेश्वर
कमटलवार यांनी प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास विशद केला. विभागीय
उपाध्यक्ष डॉ. जोशी यांनी जाहिरातीद्वारे ग्राहकांची होणारी फसवणूक यावर माहिती
दिली. डॉ. लाड यांनी ग्राहक संरक्षण कायदाविषयी माहिती दिली. तसेच ग्राहक
मार्गदर्शन सेवा केंद्राद्वारे समाज सेवा करत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी
ग्राहकांच्या हितासाठी व प्रबोधनासाठी कार्यरत असलेली मल्लीकार्जुन गुनगुने यांचा
ग्राहक तीर्थ स्व. बिंदु माधव जोशी स्मृती पुरस्कार व प्रमाणपत्र देवून हस्ते
सत्कार करण्यात आला. जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी एम. एम. काकडे यांनी आभार
मानले.
यावेळी
ग्राहक सेवा आणि वस्तू पुरविणाऱ्या वैदयमापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासन, एसटी
महामंडळ, परिवहन, गॅस पुरवठा अशा विविध स्टॉलद्वारे माहितीपत्रके देण्यात आली. कार्यक्रमाची
सांगता पसायदानाने झाली.
0000000
No comments:
Post a Comment