Saturday, December 31, 2016

आयकरपात्र निवृत्ती वेतनधारकांना
कोषागार कार्यालयाचे आवाहन
नांदेड, दि. 31:-  जिल्ह्यातील राज्य शासकी निवृत्ती वेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालयाने आयकर गणनेविषयी आवाहन केले आहे. या आवाहनानुसार संबंधित आयकरपात्र निवृत्ती वेतनधारकांनी आपल्या बचतीचे विवरण दाखल करणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष 2016-17 धी निवृत्ती वेतनधारकांच्या उत्पन्नावरील  कर आकारणी करून माहे जानेवारी व फेब्रुवारी 2017 च्या मासिक निवृत्ती वेतनातून आयकर कपात करावयाचा आहे. ही आयकर गणना अच करण्यासाठी नांदेड जिल्हयातील ज्या निवृत्ती वेतनधारकांना आयकर लागु होतो अशा सर्व निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या बचतीचे विवरण शुक्रवार 21 जानेवारी 2017 पर्यंत कोषागार कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...