Saturday, December 31, 2016

सोलापूर येथे पाच फेब्रुवारीपासून सैन्यभरती
नांदेड जिल्ह्यातील इच्छुकांनी संधी
नांदेड, दि. 31:-  सोल्जर नर्सींग असिस्टंट AMC व सोल्जर ड्रेसर RVC  या पदासाठी  सैन्यभरतीचे आयोजन  सोलापूर  SRPF कवायत मैदान सोरेगांव  येथे 5 फेब्रुवारी ते 18  फेब्रुवारी 2017 दरम्या आयोजीत  करण्यात आले आहे.
  या भरतीसाठी  ऑनलाईन अर्ज  www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर शुक्रवार 20 जानेवारी 2016 पर्यंत  भरणे आवश्यक आहे.      त्यासाठीची पात्रता  -  12  विज्ञान  शाखेत  फिजीक्स,  केमीस्ट्री,  बॉयलॉजी व इंग्रजी विषयात  सरासरी 50 टक्के व  प्रत्येक विषयात  40 टक्के गूण असणे  आवश्यक आहे.  तसेच  उमेदवाराची   उंची 167 सेमी,  वजन  50 किग्रॅ,   छाती  77-82  सेमी, तसेच  वय  17-1/2  ते 23 वर्षे या दरम्यान असावे .   ही सैन्य भरती   नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धूळे, नंदूरबार, औरंगाबाद, बुलढाणा व जळगाव  या  जिल्हयासाठी  आहे.    त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी  पात्रतेसंबधी संकेतस्थळावरून तपशीलवार माहीती घेवून  ऑन लाईन अर्ज भरावेत. यामध्ये,  नांदेड जिल्हयातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण   अधिकारी  नांदेड   मेजर  व्ही व्ही पटवारी  यांनी  केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...