Saturday, December 31, 2016

रुग्णवाहिकांना वाट द्या आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’
या मोहिमेचे उदघाटन
नांदेड दि. 31 :-  रुग्णवाहिकांना वाट दया आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’ या मोहिमेचे उदघाटन वैधमापन शास्त्र विभाग, पेट्रोलपंप असोसिएशन, फामफेडा व राधी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने आज नॅशनल एक्स सर्व्हिस को-ऑ. गॅरेज लि. हिंदूस्थान पेट्रोल पंप, 141 मंत्रालय येथे करण्यात आले.
यावेळी अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरिक्षक तथा नियंत्रक, वैध रुग्णांना अती तातडी व गंभीर प्रसंगी रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेत पोहचविणे गरजेचे असते. प्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान असल्याने रुग्णवाहीकांना मोकळी वाट देण्याच्या चळवळीमध्ये प्रत्येक वाहन चालकाने सहभागी होणे गरजेचे आहे.  या करिता रुग्णवाहिकांना वाट दया, या मोहिमेंअर्तगत पत्रके तसेच पेट्रोलपंपवर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले. यावेळी एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑईल कंपनीचे पदाधिकारी म्हणाले की, राधी फाऊंडेशनच्या या समाजपयोगी कार्यामध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑईल यांनी पेट्रोलपंपवर रुगवाहिकांना वाट दया याविषयाचे फलक लावण्यास सहमती दीली आहे. या उपक्रमामध्ये सर्वच लोकांना सहभागी होण्यासाठी फेसबूकवर Give way to Ambulance यापेजची निर्मिती केली असून टवीटरव्दारे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अशी माहिती संजीव कबरे, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नांदेड यांनी दिली.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...