Friday, August 29, 2025

 

काल रात्रीपासून #नांदेड जिल्ह्यात #अतिवृष्टी झाली आहे.यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले यांना #पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावात पाणी शिरले आहे. यामुळे खबरदारीचा #इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळाना सुट्टी दिली आहे. तसेच नागरिकांनी अती आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.


Nizamsagar Project :-
Dt :- 29-08-2025 (6:00 AM)
Water Level:- 1402.92 ft/1405.00 ft
Capacity :- 14.881 TMC /17.802 TMC
Inflow:-1,63,043 Cusecs
Discharge through Floodgates:-1,67,541 Cusecs
Irrigation Gates :-
Escape Regulator:- Nil
Main canal:- Nil
Evaporation losses:- Nil
Total outflow:- 1,67,547 Cusecs
No.of gates opened:-23

निजाम सागर चे विसर्ग 53000 cusecs ने कमी झालेला आहे. त्याच बरोबर पोचमपाड येथील विसर्ग 5 लाख cusec करण्यात आलेला आहे . त्यामळे मांजरा व गोदावरी नदी ची पूर परिस्तिथी नियंत्रण काही काळात होईल ही अपेक्षा

अतिवृष्टीमधील करावयाच्या कामाचे योग्य नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्यासाठी झोननिहाय उपआयुक्त/वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे त्यांनी तात्काळ उचित उपाययोजना करन्याच्या सूचना दिल्या आहेंत

1) झोन 3 श्री सूनकेवार 9860872320

2)झोन 4 श्री संधू 9011000965

3)झोन 5 श्री सुमंत पाटील 9767175999

4) झोन 1,2 व 6 श्री गाढवे 9764230628


मन्याड नदी पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने.. मनसकर्गा,मानूर , नंदुर, शेवाळा गावालगत पाणी आल्याने .. नंदुर गावचा संपर्क तुटला आहे.. परंतु लोक उंचावर सुरक्षित आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामूळे आज दिं २९.०८.२०२५ शुक्रवार रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.  सर्व संबंधित यांनी याची नोंद घ्यावी  - जिल्हाधिकारी नांदेड.


S.C.V.P.  Nanded

R/s sir,

One more gate is opened at 8.55AM 

No.of gates open:  09

Gate no :5,8,9,15,16,17,3,14,13

Discharge : 3006 cumecs 

(106,153Cusecs)


S.C.V.P.  Nanded
R/s sir,
One more gate is opened at 11.10 AM 
No.of gates open: 11
Gate no :5,8,9,15,16,17,3,14,13,7,10
Discharge : 3674 cumecs 
(129,743 Cusecs)

🚫 विसर्ग वाढ सुचना🚫
ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस सूरू असल्यामुळे येणा-या येव्या नुसार  आज दि.29/08/2025 रोजी 12.00 वाजता चालू असलेल्या विसर्गात सांडव्याचे  आणखी दोन गेट उघडून एकूण विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
तसेच येणा-या येवा नुसार विसर्गा मध्ये टप्याटप्याने वाढ / घट करण्यात येईल.
तरी पेनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरीकांनी सूरक्षीत स्थळी रहावे.

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नांदेड आकाशवाणीवरील मुलाखत आता सकाळी ११.३० वाजता प्रसारित होणार आहे.


Thursday, August 28, 2025

 ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

वृत्त क्रमांक 910 

नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून

नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर

नांदेड दि. 28 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात 28 ऑगस्ट 2025 रोजी 17 मंडळात अतिवृष्टी व पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नायगाव खै तालुक्यात 5 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे. बिलोली नरसी रोड बंद झाला आहे. या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जलसंपदा विभागाच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील नदी, नाल्यांना येणाऱ्या पूरपरिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील दत्तनगर/शंकरनगर भागातील घरामध्ये पाणी शिरले. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दोन ते तीन कुटूंबातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यानंतरही दोन कुटूंबे अडकली होती. या दोन कुटूंबातील नागरिकांना नांदेड येथील मनपाच्या अग्नीशामक बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलविले. यामध्ये एकनाथ वाघमारे, सोनी एकनाथ वाघमारे, प्रज्ञा एकनाथ वाघमारे, प्रशिक एकनाथ वाघमारे, अनुसया भुजंगराव वाघमारे, कवीता सुभाषराव वाघमारे, सुशांत सुभाषराव वाघमारे, चाँद पठाण, आसमा चाँद पठाण, मोहम्मद  चाँद पठाण, ऐशिया चाँद पठाण यांची सूटका या पथकाने केली. 

तसेच नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर स्कुलबस मध्ये 18 विद्यार्थी एक शिक्षक व ड्रायव्हरसह गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती. नाल्यावरुन भरपूर पाणी वाहत असल्यामुळे गावातील नागरिक, महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांनी मानवी साखळी निर्माण करुन या सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलविले. आता परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंम्बे यांनी दिली आहे.  

हवामानाचा व पावसाचा अंदाज घेवून काल संध्याकाळी एसडीआरएफची टीम देगलूर येथे पाठविण्यात आली होती. या टीमने सांगवी उमर, मेदनकल्लूर, शेळगाव, तमलूर या पूरपरिस्थीती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी 2 हजार 251 नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे कार्य या टीमने केले आहे. आज सीआरपीएफची टिम नायगावला बचाव कार्य करुन धर्माबादला गेली आहे. तसेच  एसडीआरएफची टिम कंधारला बचाव कार्यासाठी पाठविली आहे. तसेच मनपाचे शोध बचाव पथक नायगाव तालुका येथे पोहोचून दोन यशस्वी बचावकार्य केले आहेत. 

सध्या सर्व जिल्ह्यात काही मंडळात मोठया प्रमाणात पाऊस सुरु असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000













 *विशेष लेख:*

 वृत्त क्रमांक 909 

सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम  

नांदेड दि. 28 ऑगस्ट :-  नांदेड ज‍िल्हयात व‍िव‍िध ठ‍िकाणी सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 15 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झाली. या जनजागृती रथाची शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी "सुरक्षित फवारणी जनजागृती रथ" कृषी व‍िभाग व धानूका कंपनी ही नोडल एजन्सी म्हणून नांदेड ज‍िल्हयासाठी नेमण्यात आलेली असून यांच्या संयुक्त व‍िघमानाने सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीमेची सुरवात  झालेली आहे. या अभियानाचा शुभारंभ ज‍िल्हा अध‍िक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अभ‍ियानाचा रथ मार्गस्थ केला. 

या रथाच्या माध्यमातून ज‍िल्हातंर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षाविषयक उपाययोजना, योग्य फवारणी पद्धती, वैयक्तिक संरक्षक साधनांचा, पीपीई किट वापर तसेच पर्यावरणपूरक पद्धतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी जिल्हा अध‍िक्षक कृषि अध‍िकारी नांदेड, उपव‍िभागीय कृष‍ि अध‍िकारी व तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सुलभ भाषेत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. 

जनजागृती रथ आतापर्यंत क‍िनवट तालुक्यात जलधारा, मा. कोलारी, सावरगाव, धानोरा, बोडखेंडा, इस्लापूर. ह‍िमायतनगर तालुक्यात कोसमेट, मुळझरा, वासी. लोहा तालुक्यातील सोनखेड, सुनेगाव, मडकी, कलंबर, भोपाळवाडी. कंधार तालुक्यातील ब‍िजेवाडी, शेकापूर, बाचोटी, फुलवळ, घोडज इत्यादी ठ‍िकाणी सदर जनजागृती रथाद्वारे जनजागृती करण्यात आली असून ज‍िल्हयातील व‍िव‍िध उर्वरीत तालुक्यातील गावामध्ये जनजागृती रथाद्वारे शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसाठी मास्क, हातमोजे, चष्मा, गमबूट यासारख्या साधनांचा वापर कसा करावा, औषधांची मात्रा योग्य कशी ठरवावी, तसेच फवारणीनंतर शरीर स्वच्छता व कपड्यांची निगा कशी ठेवावी याविषयी प्रात्यक्षिकासह विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून मोठया प्रमाणात जनजागृती होणार असून सुरक्ष‍ित फवारणी जनजागृती मोह‍िमेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 908 

गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम  

नांदेड दि. 28 ऑगस्ट :- जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंडामधून स‍िजेंन्टा इंड‍िया ल‍ि. कंपनी व महाराष्ट्र शासन कृष‍ि व‍िभाग यांच्या संयुक्त व‍िघमानाने गुलाबी बोंडआळी अभ‍ियान जनजागृती रथाची 15 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. या जनजागृती रथाचे उद्घाटन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या जनजागृती मोह‍िमाचा ज‍िल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी यांनी केले आहे. यावेळी कृष‍ि उपसचांलक श्री वानखेडे, ज‍िल्हा गुणन‍ियंत्रण न‍िरीक्षक श्री पेकम व प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती गुंजकर यांच्या उपस्थ‍ितीत पार पडले. यावेळी कंपनीचे प्रत‍िन‍िधी सुद्धा उपस्थ‍ित होते. 

सदर मोहिमेची आत्तापर्यंत नांदेड, धर्माबाद, उमरी, ब‍िलोली, नायगाव या तालुक्यामधील व‍िव‍िध गावांमध्ये गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माह‍िती पत्रक वाटून जनजागृती रथाद्वारे जनजागृती केलेली आहे. ज‍िल्हयातील उर्वरीत सर्व तालुक्यात वेगवेगळया गावामध्ये टप्याटप्याने जनजागृती रथ फ‍िरणार असून मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. गुलाबी बोंडआळी संदर्भांत शेतीशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये शेतक-यांनी गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व‍िव‍िध उपयोजनेची माह‍िती सदर शेतीशाळेत म‍िळणार असून त्या शेतीशाळाचा सुद्धा शेतक-यांनी लाभ घ्यावा. एक ज‍िल्हास्तरीय व तीन तालुकास्तरीय गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यशाळा आयोज‍ित करण्यात येणार आहेत.

0000





वृत्त क्रमांक 907

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 28ऑगस्ट :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर 450 रुपये तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745रुपये इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्ट 2025 रोजीपर्यत 1 लाख 8 हजार 968 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली असून 52 हजार 340 इतक्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे.  एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 30 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक प्रगती महिला बचत गटातील 130 महिलांना शास्त्रीय पशुपालन व चारा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण • किनवट येथे दोन दिवसीय प्रशिक्षण • ...