Wednesday, May 21, 2025

वृत्त क्रमांक 520

खतांची उपलब्धता पाहण्यासाठी

शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा कृषि विभागाचे आवाहन

नांदेड दि. 21 मे : खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळया प्रकारची खते बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही यासाठी कृषिक ॲप महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील दुकानात कोणत्या खताचा साठी किती आहे हे या ॲपच्या माध्यमातून कळणार आहे. तरी या ॲपचा उपयोग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत यांनी केले आहे.

कृषिक ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील पध्दतीचा अवलंब करावा. प्ले स्टोअरवर जाऊन कृषिक ॲप सुरुवातीला डाऊनलोड करावे व त्यात चावडी या फोल्डर वर जाऊन खत उपलब्धतता या फोल्डरवर जाऊन क्लीक करावे. त्यानंतर जिल्हा व तालुका निवडावा त्यानंतर सर्व दुकानातील यादी व मोबाईल नंबर, कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे व ते किती प्रमाणात त्या दुकानात उपलब्ध आहे हे कळण्यास मदत होईल. या ॲपचा उपयोग सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा, जेणेकरुन आपल्या तालुक्यात किती खत कोणत्या दुकानात उपलब्ध आहे हे कळण्यास मदत होईल.

00000

वृत्त क्रमांक 519

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड दि. 21 मे : जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या बियाणे, खते व किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी नांदेड जिल्हयामध्ये जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर 16 असे एकुण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्रचालक किंवा खाजगी एजंटामार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते  बियाणे व किटकनाशके शेतकऱ्यांना विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत असते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थित वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, शेतकऱ्यांची निविष्ठासाठी अडवणुक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे. त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्य करण्यात येतील. तसेच गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.

मागील वर्षात कृषि विभागामार्फत नांदेड जिल्हयात बोगस खते विक्री केल्यामुळे 03 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चालू वर्षात एक फौजदारी गुन्हा हिमायतनगर येथे दाखल झाला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणीत बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषि सेवा केंद्रचालक यांच्या विरुध्द 32 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहिम राबवून रॅडमली कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडून अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 518

एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड दि. 21 मे : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अं व द) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क मुंबई, विभागीय उपआयुक्त नांदेड विभाग बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार मंगळवार 20 मे रोजी रमेश लक्ष्मण गड्डमवार व रामदास जालमसिंग येरवाळ यांना स्थानबध्द केले आहे.

मुदखेड येथील रमेश लक्ष्मण गड्डमवार (वय 51 वर्षे)  हा वारंवार क्लोरल हायड्रेट हे घातक रसायन मिश्रित बनावट ताडी विक्री करताना आढळून आला होता. या इसमाकडून महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी भोकर यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते. तरी या इसमाने त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न आणता वारंवार क्लोरल हायड्रेट हे घातक रसायन मिश्रित बनावट ताडी विक्री करीत असल्याने त्याच्या विरुध्द अनेक गुन्हे नोंद केले आहेत. त्याअनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भोकर यांनी या कार्यालयामार्फत सादर केलेल्या एमपीडीए प्रस्तावास जिल्हाधिकारी नांदेड यांनी 20 मे 2025 रोजी मान्यता देवून स्थानबध्दतेचे आदेश पारित केले. या आदेशानुसार या इसमाची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

किनवट तालुक्यातील बोधडी येथील रामदास जालमसिंग येरवाळ (वय-35 वर्षे)  हा वारंवार अवैध हातभट्टी दारु निर्मिती, विक्री करतांना आढळून आला होता. या इसमाकडून महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीयदं डाधिकारी किनवट यांनी एका वर्षाच्या कालावधीकरिता चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते. तरी ही या इसमाने त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न-आणता वारंवार अवैध हातभट्टी दारुनिर्मिती, विक्री करित असल्याने त्याच्या विरुध्द अनेक गुन्हे नोंद केले आहेत. त्याअनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट यांनी या कार्यालयामार्फत सादर केलेल्या एमपीडीए प्रस्तावास जिल्हाधिकारी नांदेड यांनी 20 मे 2025 रोजी मान्यता देवून स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.

त्यानुसार सदर आदेशानुसार या इसमाची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची शिक्षा अथवा दंडाची भिती नसणाऱ्या अवैध मद्य व्यवहारातील आरोपींना याव्दारे सक्त ताकीद देण्यात येते की, वारंवार गुन्हा करून अथवा महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत घेण्यात आलेल्या बंधपत्राचे उल्लंधन केल्यास किंवा कुठल्याही प्रकारचे अवैध मद्यविक्री केल्यास त्यांची ही रवानगी वरीलप्रमाणे MPDA प्रस्ताव दाखल करून थेट कारागृहात करण्यात येईल.

या कारवाईत निरीक्षक, जावेद कुरेशी, दु.निरीक्षक रामप्रसाद पवार, अमित आढळकर, बळीराम इथ्थर, शिवदास कुबडे, स.दु.नि. मो.रफी, जवान विकास नागमवाड, अरविंद जाधव, निशिकांत भोकरे, श्रीमती धनश्री टेंभुर्णे, अमोल राठोड, ज.नि.वा. यांचा सहभाग असून स.दु.नि. बालाजी पवार यांनी या कारवाईसाठी विशेष परिश्रम घेतले.

00000

Tuesday, May 20, 2025

 वृत्त क्रमांक 517

येळी घाटावर अवैध वाळू उत्खननाविरोधी पोलिस व महसूल प्रशासनाची धडक कारवाई 

दिनांक 20 मे:- आज सकाळी येळी घाटावर पोलीस व महसूल प्रशासानाने अवैध वाळू उत्‍खनना विरोधी धडक कारवाई करुन 9 इंजिन 3 जेसीबी एक हायवा ट्रॅक आणि एक टिपर जप्‍त करुन पोलीस स्‍टेशन उस्‍माननगर येथे ठेवण्‍यात आल्‍या आहेत. त्‍याविरुध्‍द पोलीस विभागा तर्फे फौजदारी कारवाई करण्‍यात येणार असून महसूल विभागामार्फत दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे.

ही कारवाई ही जिल्‍हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधिक्षिक अबिनाश कुमार यांच्‍या मागर्दशनाखाली तहसिलदार लोहा तसेच खंडेराय पोलीस निरीक्षक स्‍थानिक गुणे शाखा नांदेड श्री. मुळीक सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्‍माननगर तसेच मंडळ अधिकारी कटारे, सहारे, तलाठी एकाडे, तलाठी बोधने, तलाठी आस्‍कुलकर, तलाठी रायाजी, तलाठी बोधगीरे, तलाठी परशुराम जाधव, तलाठी डी.जी. शिंदे, तलाठी मोतीराम जाधव, तलाठी मेवणकर, तलाठी लाडेकर यांनी उपरोक्‍त कारवाई केली,अशी माहिती तहसीलदार लोहा यांनी दिली.

०००००

 वृत्त क्रमांक 516

तांत्रिक पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी  

नांदेड दि. 20 मे :- भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध असून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) ची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही अधिसुचना www.joinindianarmy.nic.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

तांत्रिक पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी ही योजना खुली आहे. सर्व विद्यार्थी www.joinindianarmy.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 29 मे 2025 पर्यंत भरता येतील, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर सैन्य भारती कार्यालयाचे कर्नल डायरेक्टर रिक्रूटिंग यांनी केले आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 515

मधुमित्र व मधुसखी पुरस्काराचे नाशिक येथे वितरण   

नांदेड दि. 20 मे :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा मधुमित्र व मधुसखी पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधुन आज 20 मे रोजी हा कार्यक्रम नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. मधुमित्र पुरस्कारसाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सचिन उगले व राजु मंडळ (कोसबाड, डहाणु, पालघर) तर कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तेजा घोरपडे यांची मधु सखी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मधमाशी पालन करण्याऱ्या मधपालनास प्रोत्सहान देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने 2023 पासुन ही योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि बसंवत हनी पार्क नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा हा कार्यक्रम घेण्यात आला. 20 मे रोजी बसंवत हनी पार्क, पिंपळगाव नाशिक येथे सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आली. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी काही उपस्थित मधपालना उत्तेजनार्थ पुरस्कारही दिले. या कार्यक्रमास बहुसंख्येने मधपालानी व याविषयात रुची असणारे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. 

0000

वृत्त क्रमांक 514

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे नांदेड विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेस प्रारंभ

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसी प्राधिकरणाला केल्या विविध सूचना

तीन महिन्यानंतर हस्तांतरणाची कार्यवाही

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केली विमानतळ व परिसराची पाहणी

नांदेड दि. 20 मे : नांदेड येथून सध्या अनेक मोठया शहरात विमानसेवा सुरु आहे. नांदेड येथील विमानतळ सध्या एमआयडीसीच्या ताब्यात असुन लवकरच ते महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व  व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करुन औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे एसआर मॅनेजर रोहित राहपाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत देशपांडे, नियोजन अधिकारी भक्ती चितळे,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता  कल्पेश लहीवाल, मो जावेद व बेग उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.

विमानतळावरील विविध सुविधांबाबत औद्योगिक विकास महामंडळाने येत्या तीन महिण्यात सुधारणा करावी. विमानतळावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व  व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे केली. तसेच विमानतळावरील मनुष्यबळ भरती प्रक्रीया, पाणीपुरवठा तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईल यांची दक्षता घेणे. विमानतळावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधामध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येत्या तीन महिण्यात या सर्व सुविधा उपलब्ध केल्या नंतर  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे विमानतळ हस्तातंरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विमानतळावरील धावपट्टी, ॲब्युलन्स, अग्निशामक व इतर आवश्यक त्या वाहनाची, तसेच स्कॅनर मशिन अशा सर्व बाबीची पाहणी केली.   

00000










वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...