वृत्त क्रमांक 517
येळी घाटावर अवैध वाळू उत्खननाविरोधी पोलिस व महसूल प्रशासनाची धडक कारवाई
दिनांक 20 मे:- आज सकाळी येळी घाटावर पोलीस व महसूल प्रशासानाने अवैध वाळू उत्खनना विरोधी धडक कारवाई करुन 9 इंजिन 3 जेसीबी एक हायवा ट्रॅक आणि एक टिपर जप्त करुन पोलीस स्टेशन उस्माननगर येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्याविरुध्द पोलीस विभागा तर्फे फौजदारी कारवाई करण्यात येणार असून महसूल विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई ही जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधिक्षिक अबिनाश कुमार यांच्या मागर्दशनाखाली तहसिलदार लोहा तसेच खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुणे शाखा नांदेड श्री. मुळीक सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्माननगर तसेच मंडळ अधिकारी कटारे, सहारे, तलाठी एकाडे, तलाठी बोधने, तलाठी आस्कुलकर, तलाठी रायाजी, तलाठी बोधगीरे, तलाठी परशुराम जाधव, तलाठी डी.जी. शिंदे, तलाठी मोतीराम जाधव, तलाठी मेवणकर, तलाठी लाडेकर यांनी उपरोक्त कारवाई केली,अशी माहिती तहसीलदार लोहा यांनी दिली.
०००००
No comments:
Post a Comment