Tuesday, May 20, 2025

 वृत्त क्रमांक 516

तांत्रिक पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी  

नांदेड दि. 20 मे :- भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध असून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) ची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही अधिसुचना www.joinindianarmy.nic.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

तांत्रिक पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी ही योजना खुली आहे. सर्व विद्यार्थी www.joinindianarmy.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 29 मे 2025 पर्यंत भरता येतील, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर सैन्य भारती कार्यालयाचे कर्नल डायरेक्टर रिक्रूटिंग यांनी केले आहे. 

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 716   वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना   नांदेड दि. 10 जुलै : - प्रादेशिक ...