Wednesday, May 21, 2025

वृत्त क्रमांक 520

खतांची उपलब्धता पाहण्यासाठी

शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा कृषि विभागाचे आवाहन

नांदेड दि. 21 मे : खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळया प्रकारची खते बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही यासाठी कृषिक ॲप महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील दुकानात कोणत्या खताचा साठी किती आहे हे या ॲपच्या माध्यमातून कळणार आहे. तरी या ॲपचा उपयोग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत यांनी केले आहे.

कृषिक ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील पध्दतीचा अवलंब करावा. प्ले स्टोअरवर जाऊन कृषिक ॲप सुरुवातीला डाऊनलोड करावे व त्यात चावडी या फोल्डर वर जाऊन खत उपलब्धतता या फोल्डरवर जाऊन क्लीक करावे. त्यानंतर जिल्हा व तालुका निवडावा त्यानंतर सर्व दुकानातील यादी व मोबाईल नंबर, कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे व ते किती प्रमाणात त्या दुकानात उपलब्ध आहे हे कळण्यास मदत होईल. या ॲपचा उपयोग सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा, जेणेकरुन आपल्या तालुक्यात किती खत कोणत्या दुकानात उपलब्ध आहे हे कळण्यास मदत होईल.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...