Sunday, January 12, 2025

11.1.2025

 ​वृत्त क्रमांक 40

लेखा कोषागारे कल्याण समितीच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाटन

आठ जिल्ह्यातील 500 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग

नांदेड दि. 11 जानेवारी :- दैनंदिन कामासोबत प्रत्येकांनी एक तरी खेळ आपल्या आयुष्यात जोपासावा हीच दिर्घायुषाची गुरुकिल्ली आहे. तसेच खेळाडुंनी खेळभावनेने खेळून आपआपसातील संवाद वाढवावा, असे आवाहननांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. आज वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे सायन्स कॉलेज क्रीडा संकुलात त्यांच्या हस्ते उदघाटन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतूक केले.

यावेळी सिनीयर स्टेट वेटलिफ्टींग चॅपियनशिप सुवर्णपदक विजेते परमज्योतसिंग सिद्धु संचालक किरणकुमार धोत्रे, कोषागार कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहसंचालक स्थानिक निधी लेखा छत्रपती संभाजीनगर श्रीमती दिपाराणी देवतराज यांनी क्रीडा स्पर्धेचा आनंद, खेळभावना व शिस्तीचे पालन करत खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या क्रीडा स्पर्धासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्याचे लेखा व कोषागारे , स्थानिक निधी लेखा कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी इतर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धाना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन खेळाडू अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले व स्वत: ही खेळाचा आस्वाद घेतला.  या स्पर्धामध्ये छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 8 जिल्ह्याचे एकूण 500 अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा प्रकारात भाग घेतला आहे. या क्रीडा स्पर्धा आज व उद्या दोन दिवस चालणार असून उद्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ  सायन्स कॉलेज येथे होणार आहे.

0000

































































10.1.2025

  ​वृत्त क्रमांक 39

21 जानेवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 10 जानेवारी :-  नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक व इतर आस्थापनांच्या वतीने मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 21 जानेवारी 2025 रोजी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

000000

 ​राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती
(अ.क्र. पुरस्काराचे नाव, पारितोषिक)

1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)- 1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक)

2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

7. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

10. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

13. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

15. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

16. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)- 51अ.क्र हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

20. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

Friday, January 10, 2025

 ​वृत्त क्रमांक 38 

​उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन

 

नांदेड दि. 10 जानेवारी :- उमरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रविवार 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच उद्योजकांचे मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. माजी प्रशिक्षणार्थी, नियमित प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक यांनी या उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 37

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन

नांदेड दि. 10 जानेवारी :-  स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. व्ही सुर्यवंशी यांनी केले आहे.


यात विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, क्रीडा स्पर्धा इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्राची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना व्हावी यासाठी प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदाची जयंती असल्यामुळे हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. युवक हे देशाचे भविष्य व आधारस्तंभ आहेत. स्वामी विवेकानंद हे भारताचे महान आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले आयुष्य युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी तसेच त्यांचे विचार आणि आदर्श आजदेखील लाखो युवकांना मार्गदर्शक आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 36

21 जानेवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 10 जानेवारी :-  नांदेड जिल्ह¬Éतील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक व इतर आस्थापनांच्या वतीने मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह¬Éतील बेरोजगार उमेदवारांनी 21 जानेवारी 2025 रोजी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...