Monday, September 2, 2024

वृत्त क्र. 793

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 नांदेड, दि. 2  सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्व सूचना कळवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात शिरून पिके जलमय होऊन, पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर इत्यादी कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. वरील नुकसानीची भरपाई ही पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत देण्यात येते. 

वरील कारणांमुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी यांनी गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 14447 याद्वारे विमा कंपनीस नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. पूर्वसूचना दिल्यानंतर विमा कंपनी मार्फत किंवा केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेला डॉकेट आयडी सांभाळून ठेवावा. क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये पूर्वसूचना देताना अतिवृष्टी, जास्तीचा पाऊस या कारणांचीच निवड करावयाची आहे, इतर कारणे नमूद करू नये. 

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्व सूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा, असेही कृषि विभागाने कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 792 

इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद  

 ·  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये

नांदेड, दि. 2  सप्टेंबर : इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार (आरओएस) 1 ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार इसापुर धरणाची पाणी पतळी 440.74 मी. इतकी ठेवावयाची आहे. आज 2 सप्टेंबर 2024 रोजी सायं 4 वा. इसापुर धरणाची पाणी पातळी 439.40 मी. इतकी असुन उपयुक्त पाणी साठा 816.75 दलघमी (84.72 टक्के) इतका आहे. सद्यस्थितीत इसापुर धरणामध्ये येणारा पाण्याचा येवा कमी होत आहे व इसापुर धरणाची सर्व वक्रद्वारे बंद आहेत. 

इसापुर धरणाच्या खालील बाजुस काल 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असुन त्यामुळे पेनगंगा व कयाधु नदीला पूर आला आहे. आज 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 361 हदगाव-उमरखेड रोड वरील मार्लेगाव पुलावरुन पाणी जाण्यास सुरुवात झाली असून नदीने धोकापातळी ओलांडली आहे. सदरची पूरस्थिती ही इसापूर धरणाच्या खालील बाजुस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत यावर्षी इसापुर धरणामधुन अद्याप पर्यंत विसर्ग सोडण्यात आला नाही. नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता ब. बा. जगताप यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 791 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा

 

·  उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती

·   नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारासही भेट

 

नांदेड, दि. 2  सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 

उदगीर येथील कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.35 वाजता राष्ट्रपती महोदयांचे नांदेड विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी 4.45 वाजता नांदेड विमानतळ येथून वाहनाने गुरुद्वारा रोड, यात्री निवास रोड नांदेड येथे आगमन. सायं 5 ते 5.05 वाजेपर्यत टीबीसी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.5 ते 5.15 राखीव. सायंकाळी 5.15 ते 5.40 पर्यत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे भेट.  सायं. 5.40 वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे वाहनाने प्रयाण. सायं. 5.55 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. त्यानंतर सायंकाळी 6.05 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

 

राष्ट्रपतींच्या  नांदेड येथील 4 सप्टेंबर 2024 रोजीच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. राष्ट्रपती महोदयांच्या नांदेड येथील दौऱ्यानिमित्त संबंधित विभागानी आपआपली जबाबदारी पूर्ण पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

00000


 वृत्त क्र. 790 


#नांदेड येथील शंकरराव चव्हाण #विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे #गोदावरीनदी दुधडी भरून वाहत आहे. आतापर्यंत १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. नागरिकांनी #सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 





#नांदेड शहरात जोरदार पावसामुळे #विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे #गोदावरीनदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जुन्या नांदेड मधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून लाकडाची बॅरिकेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. छायाचित्र - पुरुषोत्तम जोशी




 

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती बाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.











#नांदेड मधील #गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. #विष्णूपुरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्राच्या पुढील भागातील व सकल भागातील नागरिकांनी
#सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.








वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...