वृत्त क्र. 792
इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद
नांदेड, दि. 2 सप्टेंबर : इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार (आरओएस) 1 ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार इसापुर धरणाची पाणी पतळी 440.74 मी. इतकी ठेवावयाची आहे. आज 2 सप्टेंबर 2024 रोजी सायं 4 वा. इसापुर धरणाची पाणी पातळी 439.40 मी. इतकी असुन उपयुक्त पाणी साठा 816.75 दलघमी (84.72 टक्के) इतका आहे. सद्यस्थितीत इसापुर धरणामध्ये येणारा पाण्याचा येवा कमी होत आहे व इसापुर धरणाची सर्व वक्रद्वारे बंद आहेत.
इसापुर धरणाच्या खालील बाजुस काल 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असुन त्यामुळे पेनगंगा व
कयाधु नदीला पूर आला आहे. आज 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय
महामार्ग क्रंमाक 361 हदगाव-उमरखेड
रोड वरील मार्लेगाव पुलावरुन पाणी जाण्यास सुरुवात झाली असून नदीने धोकापातळी ओलांडली आहे. सदरची पूरस्थिती ही इसापूर धरणाच्या खालील
बाजुस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत यावर्षी इसापुर धरणामधुन
अद्याप पर्यंत विसर्ग सोडण्यात आला नाही. नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास
ठेऊ नये, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी
अभियंता ब. बा. जगताप यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment