Monday, March 4, 2024

 वृत्त क्र. 201


राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून

5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली

 

·  विविध प्रकरणांत 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपयांची तडजोड

 

नांदेड दि. 4 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व समजावून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन केले. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नांदेड जिल्हयामध्ये एकुण 5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून यात 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपये इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.

 

तडजोड प्रकरणात दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार मंच येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दूरसंचार विभागाची टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणे इत्यादींचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 858 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.

 

कौटुंबिक वादाची 26 प्रकरणे आपसात मिटविण्यात आली

तर 2 जोडप्यांनी घेतला एकत्र नांदण्याचा निर्णय

 

विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पती-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 26 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. त्यापैकी 2 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या लोक अदालतीच्या निमित्ताने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, नांदेड विभागीय अधिकारी कालीदास व जगताप यांनी त्यांचे विभागातर्फे नांदेड जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी भव्य पेंडालची व्यवस्था करुन मोलाचे सहकार्य केले. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व पॅनल सदस्य आणि सर्व सन्माननिय विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

 

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व सन्माननिय विधिज्ञ आणि भूसंपादन अधिकारी, आयुक्त मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड व प्रबंधक, जिल्हा न्यायालय नांदेड व सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर , मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले तसेच ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले तसेच यापुढेही अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

 00000





 वृत्त क्र. 200

तांत्रिक शिक्षणातून सक्षम देश उभारणीचा पाया घाला : मृदसंधारण मंत्री संजय राठोड

 

संगणक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन, विद्यार्थ्यांशी संवाद

 

नांदेड, दि 4 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन राज्याचे मृदसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

 

नांदेड येथील ग्रामीण टेक्नीकल अॅन्ड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णूपुरी व कंधार येथील तांत्रिक व कृषी महाविद्यालयात भेट दिल्यानंतर नांदेड येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय पवार,प्राचार्य डॉ. विजय पवार,जिल्हा मृद संधारण अधिकारी हनुमंत खटके, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी एल. शरमन, श्रीमती मीनाताई पवार,डॉ. राजेंद्र पवार, प्रोफेसर डॉ. पी. बी. उल्लागडी,उपप्राचार्य संजय देऊळगावकर,विभाग प्रमुख प्रा. गुरुदीपसिंघ वाही, डॉ. निलेश आळंदकर, डॉ. सुनिल कदम, प्रा. देवयानी कापसे तसेच मंत्री महोदयाच्या सुविद्य पत्नी शीतल राठोड उपस्थित होत्या.

 

बांधकाम क्षेत्र,संगणक क्षेत्र, दोन्ही विभाग देशाच्या जडणघडणीत महत्व ठेऊन आहे. या दोन्ही क्षेत्रात करियर घडविण्यास अग्रेसर असणारे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे.मराठवाडा परिसरातील ही एक चांगली संस्था आहे.सिव्हील व संगणक क्षेत्रात भरारी घेऊन आपल्या प्रदेशासाठी देशासाठी काम करणे आवश्यक आहे, मोठमोठ्या स्टार्टअप या क्षेत्रात सुरू करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मृद व जलसंधारण खात्याची माहिती यावेळी दिली. या विभागाच्या गेल्या काही दिवसातील उल्लेखनीय कामामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढत आहे. कोणत्याही गावात पाणीटंचाई राहणार नाही अशा पद्धतीची मृदसंधारणाची कामे आपल्या विभागाने हाती घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या . संस्थेचे संस्थापक सचिव कै. शिवरामजी पवार साहेबाना अभिवादन केले. त्यांच्या दूरदृष्टीतून नांदेड सारख्या शहरात तांत्रिक शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक यांनी केले.

00000







 वृत्त क्र. 199 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

 

नांदेडवरून चेन्नईला रवाना

 

नांदेड दि. 4 :  श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले.

 

विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, आ.श्यामसुंदर शिंदे, आ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000





















Sunday, March 3, 2024

वृत्त क्र. 198

 जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकास मान्यतेची बैठक आता 5 मार्चला

नांदेड दि. 3 :- जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून घेण्यात येणाऱ्या योजनेचे सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चे मूळ अंदाज पत्रकास मान्यता देण्याबाबतची बैठक सोमवार 4 मार्च रोजी दुपारी 1.वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली होती. परंतु सदर बैठक आता 5 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कळविले आहे. संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी, असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

वृत्त क्र. 197

 जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

·     2 हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस 

नांदेड दि. 3 :- संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. या मोहीमेत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षाखालील बालकांना एकूण 3 लाख 99 हजार 698 पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. आज या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस पाजून संपन्न झाले.

 

यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेभाऊ बुट्टे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे, प्रा.आ.कें. वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, विस्तार अधिकारी लतीफ पठाण, सिकलसेल समन्वयक दिपाली इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

 

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भाग तसेच महानगरपालिका क्षेत्रातही लस 5 वर्षापर्यतच्या बालकांना देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने राज्य नोडेल ऑफिसर तथा सह संचालक डॉ. रेखा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बुथला भेट देवून पाहणी केली आहे. या मोहिमेत ग्रामीण भागातून 2 हजार 236 शहरी भागातून 255 तर महानगरपालिका भागात 276 असे एकूण 2 हजार 767 बूथ उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत असून 25 हजार 862 लसीचे व्हायल उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000












Saturday, March 2, 2024

 वृत्त क्र. 196 

बेनामी वाहनांचा आरटीओ मार्फत लिलाव

उत्सुकांसाठी नोटीस फलकावर यादी

 

नांदेड दि. 2 :- मोटार वाहन कर जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुली योग्य असलेल्या रकमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा वाहनधारकांना तीन नोटीस देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यांना सदर पत्र अपूर्ण पत्ता, वा इतर कारणाने पत्र पोच झाले नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची परवानगी घेवून दावा न केलेल्या प्रकरणामध्ये समाविष्ट करण्याच्या मंजूरीस्तव व न्यायालयाची परवानगी घेवून या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोटीस बोर्डवर अशा बेनामी वाहनांची यादी लावण्यात आली आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.

00000

Friday, March 1, 2024

वृत्त क्र. 195

 5 मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन

 

नांदेड दि. 1 :- जिल्हयातील उद्योजकांसाठी व उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन 5 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वा. हॉटेल मिडलॅड येथे करण्यात आले आहे. या परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, औद्योगिक समुह, सनदी लेखापाल, उद्योग व्यवसायाशी संबंधित शासकीय विभाग यांनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी कळविले आहे.

 

या गुंतवणूक परिषदेतंर्गत जिल्हयातील प्रमुख उद्योग क्षेत्र असलेल्या कृषी क्षेत्रातील उद्योगांमध्ये तसेच इतर उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या उद्योगांना गुंतवणूकीच्या संधीबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच याअंतर्गत ‍एक खिडकी योजना प्रस्तावित असून सेवा, वैद्यकीय सेवा,  शैक्षणिक प्रकल्प इ. पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांना उद्योगांसाठी लागणारे विविध परवाने, अनुदान इ. अनुषंगिक बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जातील.

या परिषदेचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे.

 

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. ही परिषद 5 मार्च रोजी हॉटेल मिडलॅड हॉटेल, स्टेशन रोड, नांदेड येथे घेण्यात येत आहे.  

जिल्ह्यातील होतकरु व उत्सुक उद्योजक संघटना, औद्योगिक समुहातील उद्योग घटक व इतर उद्योग व्यवसायाशी संबंधीत सर्व संस्थांनी उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी येणाऱ्या अडचणी व संधी इ. बाबींच्या माहिती व चर्चेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...