Monday, March 4, 2024

 वृत्त क्र. 199 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

 

नांदेडवरून चेन्नईला रवाना

 

नांदेड दि. 4 :  श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले.

 

विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, आ.श्यामसुंदर शिंदे, आ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000





















No comments:

Post a Comment

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...