महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
Saturday, October 14, 2023
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा
18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा
· मराठा-कुणबी बाबत नोंदी, पुरावे समितीला सादर करण्यासाठी विशेष व्यवस्था
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 7 सप्टेंबर 2023 अन्वये मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य हे समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेऊन भेट देणार आहेत. सदर समिती ही नांदेड जिल्हयात बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहे. बुधवार 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, परीसर नांदेड येथे समितीची बैठक होईल.
नागरिकांना कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी अनुषंगाने पुरावे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षात कार्यालयीन वेळेत नागरिकांना त्यांच्याकडील कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कु
याचबरोबर ज्या व्यक्तींना मा. न्या. संदीप शिंदे (निवृत्त) व समिती यांच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यात प्रत्यक्ष निवेदन, पुरावे, सूचना द्यावयाच्या असल्यास नागरिकांना दुपारी 2 ते 4 यावेळेत सादर करता येतील. नियोजन भवन, कॅबिनेट हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वर नमूद केलेले राष्ट्रीय दस्ताऐवज, सनदी व नमूद पुरावे सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0000
Friday, October 13, 2023
नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध
नवरात्र उत्सवाच्या काळात
डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध
नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 15 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यतच्या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्याही व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास / चालविण्यास याद्वारे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 12 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला आहे.
00000
सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मोफत औषधांची मदत
सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मोफत औषधांची मदत
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- सचखंड गुरुव्दारा बोर्डातर्फे डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाहयरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी 12 ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक औषधींचा मोफत पुरवठा करण्यात आला.
या रुग्णालयामध्ये मोठया प्रमाणात गोर-गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यांना गुरुव्दारा बोर्डाकडून पुरविण्यात आलेल्या औषधीमुळे रुग्णसेवेस मदत होईल. अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढाकाराने मिळालेल्या औषधींच्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सचखंड गुरुव्दारा बोर्डाचे धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे, गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक एस.ठान.सिंगजी बुंगई, दशमेश हॉस्पिटल चे डॉ.एस.परमविर सिंग, डॉ.अभिजीत देवगरे, उपवैद्यकीय अधीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
0000
महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर, विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम. सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आगमन व पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : प्रेक्षागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड . दुपारी 1.15 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या आढावा व समन्वय बैठकीस उपस्थिती. (अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा. नुकसानीच्या अनुषंगाने ई पिक पाहणी, पिकविमा आढावा. गौण खनिज आढावा. वहिवाट रस्ते, पाणंद रस्ते. लम्पी आढावा) स्थळ: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड . दुपारी 3 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.40 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंह जी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.50 वा. श्री. गुरु गोविंद सिहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. सायंकाळी 4 वा. विमानाने अकोला कडे प्रयाण करतील.
00000
अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन
अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 16 ऑक्टोबर रोजी
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (GEM) पोर्टलवरुन खरेदीत अधिकाधिक वापर करण्यासाठी तसेच पोर्टलवर नोंदणी तसेच पोर्टलच्या संपूर्ण वापरासाठी प्रशिक्षण देण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय विभागातील खरेदी धोरणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालये, औद्योगिक संघटना, औद्योगिक समुह, उत्पादक घटक, पुरवठादार यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
शासनाचे सर्व विभाग, शासकीय उपक्रम/महामंडळे व त्याअंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदी प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (GEM) पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचा अधिकाधिक वापर करुन पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्ती धोके न्युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्ती धोके
न्युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने 13 ऑक्टोंबर हा जागतिक आपत्ती न्युनिकरण दिन घोषित केला आहे. दिनांक 8 सप्टेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये राज्यातही दरवर्षी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजीत आग या आपत्ती सदंर्भात महानगरपालिका नांदेडच्या अग्नीशमन दलामार्फत रंगीत तालीम व प्रात्याक्षीके सादर करण्यात आली. यावेळी आगीपासून बचाव करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच हाय बिल्डींग रेस्क्युचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिक पत्रकार यांच्या हस्ते प्रत्यक्ष अग्नीरोधक उपकरण Fire Extinguisher कशा प्रकारे हाताळावेत याबाबत प्रात्याक्षीकही देण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून अपर जिल्हाधिकारी एस.बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती संतोषी देवकुळे, उपजिल्हाधिकारी सामान्य संदीप कुलकर्णी, तहसिलदार विजय अवधाने, रामदास कोलगणे, शंकर लाड, अग्नीशमन अधिकारी केरोजी दासरे व अग्नीशमनदलाचे कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे, कोमल नागरगोजे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पत्रकार आदींची उपस्थिती होती.
00000
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...