Friday, December 18, 2020

 

23 कोरोना बाधितांची भर तर

25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  शुक्रवार 18 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 23 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 11 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 177 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 966 एवढी झाली असून यातील 19 हजार 935 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 272 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 562 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 9, अर्धापूर तालुक्यात 1, हिंगोली 2 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, हदगाव तालुक्यात 2, देगलूर 2, यवतमाळ 1 असे एकुण 11 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 272 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 26, मुखेड कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 9, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 102, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 34, हैदरबाद येथे संदर्भीत 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 21 आहेत.   

शुक्रवार 17 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 160, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 68 हजार 537

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 43 हजार 535

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 966

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 935

एकुण मृत्यू संख्या-562

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-452

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-272

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.           

000000

 

निर्यातक्षम फळे व भाजीपाला वाणांची शक्य / अशक्यता

तपासणीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यामध्ये फळे व भाजीपाला क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. केळी, आंबा, पेरु, मोसंबी या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. तसेच फळपिके भाजीपाला निर्यातीसाठी मोठा वाव नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. निर्यातक्षम दर्जाची फळे व भाजीपाला उत्पादन करुन निर्यात करणेसाठी शेतीमाल असणे आवश्यक आहे. आशा मागणीची पुर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची शेतकऱ्यांनी शक्य / अशक्यता नेटद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी आंबा फळपिकासाठी मँगोनेट, डाळिंब पिकासाठी अनारनेट, मिर्ची, भेंडी, टोमॅटो व इतर पिकासाठी व्हेजनेट व लिंबु, मोसंबी, संत्रा फळपिकासाठी सिट्रसनेट ही प्रणाली विकसीत केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने नोंदणी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे अर्ज सादर करावा. ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी फलोत्पादन विभाग अपेडा मार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये स्वत:ची माहिती, नाव, मोबाईल क्रमांक भरुन ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकारी यांचेकडे अर्ज दाखल करण्याची सुविधा ऑनलाईन पध्दतीने करता येईल. यासंदर्भात काही अडचणी उद्भवल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

00000

Thursday, December 17, 2020

 

32 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

38 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  गुरुवार 17 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 38 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 215 अहवालापैकी 1 हजार 182 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 943 एवढी झाली असून यातील 19 हजार 910 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 276 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 16 डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील मांडवी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 562 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 38 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 14, अर्धापूर तालुक्यात 1, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 1 असे एकुण 19 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, हदगाव तालुक्यात 1, मुखेड 2, देगलूर 3, कंधार 1 असे एकुण 13 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 276 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 13, हदगाव कोविड रुग्णालय 4, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 119, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 27, हैदरबाद येथे संदर्भीत 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 20 आहेत.   

गुरुवार 17 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 161, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 67 हजार 208

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 42 हजार 198

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 943

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 910

एकुण मृत्यू संख्या-562

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-487

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-276

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16.           

000000

 

दहावी, बारावी परीक्षा अर्जातील

माहितीच्या अनुषंगाने शिक्षण मंडळाकडून खुलासा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य शिक्षण मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून हिंदू शब्द वगळल्याबाबतच्या काही बातम्या विविध प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने राज्य शिक्षाण मंडळाकडून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधीत माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने भरुन घेण्यात येतात. या आवेदनपत्रामध्ये विविध माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये Minority Religion अल्पसंख्याक धर्म हा रकाना सन 2014 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन या Minority Religion अल्पसंख्याक धर्माचा उपरकान्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी Non-Minority  अल्पसंख्याक इतरहा रकाना सन 2014 पासूनच समाविष्ट करण्यात आलेला आहे. तेंव्हापासून याबाबतची प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जामध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरुन घेण्यात येत आहे.

 

सन 2013 मध्ये अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी तसेच अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र शासन यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा तपशील मंडळाकडे मागितला. मंडळाच्या परीक्षा समितीच्या दिनांक 7 सप्टेंबर 2013 च्या सभेतील विषय क्रमांक 54 अंतर्गत झालेल्या ठरावान्वये उपरोक्त उपरकान्यांचा समावेश परीक्षा फॉर्ममध्ये करण्यात आलेला आहे. या रकान्यात नमूद केलेले मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन हे अल्पसंख्यांक समुदाय महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मंडळाच्या आवेदनपत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना या रकान्यातील माहिती भरण्यासाठी Non – Minority अल्पसंख्याक हा रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या रकान्यातील माहितीचा उपयोग उपरोक्त नमूद केलेल्या कारणांसाठी करण्यात येतो. सदर माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येत नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 

सुधारीत वृत्त क्र. 948

18 डिसेंबर रोजी “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस”

वेबीनारद्वारे साजरा करण्यात येणार

नांदेड (जिमाका) दि. 17 :- अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव माहिती देण्यासाठी शुक्रवार 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. ऑनलईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत. 

संयुक्‍त राष्‍ट्रसंघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्‍ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्‍पसंख्‍याकांच्‍या हक्‍काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्‍तृत केला आहे. त्‍यानुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांची संस्‍कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्‍यादींचे संवर्धन करता यावे यादृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याबाबत राष्‍ट्रीय आयोगाने सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रत्‍येकवर्षी दि. 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून राबविण्‍यात येतो. 

अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी कोविड-19 च्‍या विषाणुच्‍या संसर्गाची पार्श्‍वभूमी विचारात घेता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत देखील योग्‍य खबरदारी घेवून 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून ऑनलाईन / वेबिनार इत्‍यादी पद्धतीने साजरा करण्‍याबाबत सूचना दिल्‍या आहेत. तसेच या दिवसाच्‍यानिमित्ताने अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती करुन दिली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता पुढील ऑनलाईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत. 

Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/7044496169?pwd=djVOY0RISNIEUFhVQVdMTjRrcGtLQT09

Meeting ID: 7044496169

Passcode: 2uvRH8         

अल्‍पसंख्‍यांक समाजातील नागरीकांनी वरील लिंकवर जॉईन होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...